कशाला?
कशाला?
नि:शब्द भावनांचे इमले फुका कशाला?
नसतेच अमृताची गोडी कधी विषाला
या भाबड्या जिवाला केलेस तू निराश
ऐश्वर्य अन् सुखाची सुरई तुझ्या उषाला !
जाणून घेतले कां कधी सांग प्रेम माझे?
नांदीशिवाय सांग , ही सांगता कशाला?
काळीज पत्थराचे , चेहेरा जरी झकास
बेशर्म त्या जिवाचा शृंगार हा कशाला?
हृदयांत कंडलेल्या भावनांचा निखारा
फुकतोय येथ आता , राखेमधे कशाला?
कधी वाचशील का गं , तू आर्त ही कहाणी?
शब्दांत गुंफलेल्या कविता इथे कशाला?
जे एकदांच मरती , त्यांच्या परी उदास
मी सारखाच मरतो , अश्रू मला कशाला?
ढाळू नकोस आता अश्रू मढ्यावरी या
ते पेलणार नाही , आता , सखे खिशाला !
वर्गीकरण
अप्रतिम
In reply to अप्रतिम by चन्द्रशेखर गोखले
चंद्रशेखर साहेब,
विरोधाभास
In reply to विरोधाभास by बेसनलाडू
एकदम बाऊन्सर राव !
In reply to एकदम बाऊन्सर राव ! by उदय सप्रे
लेखनाची/आकलनाची
ठीक तर्....म्हणजे कवी सरखे तुम्ही पण अस्वस्थ झालात तर !
अगदी अप्रतिम
जे एकदांच
छान!
मला आवडली.
मस्त ----------------
वा!
फारच सुंदर!