Skip to main content

Paths of Glory

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 14/09/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही चित्रपट पाहुन झपाटल्यासारखे होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आपण नि:शब्द होतो. स्टेनली कुब्रिक दिग्दर्शित पाथ्स ऑफ ग्लोरी हा असाच एक चित्रपट. लोलिता, आइज वाइड शट, क्लोकवर्क ऑरेंज असे एकापेक्षा एक वादग्रस्त आणि भडक चित्रपट बनवणार्‍या कुब्रिकने पाथ्स ऑफ ग्लोरी सारखी दर्जेदार कलाकृती देखील सादर केली आहे. पाथ्स ऑफ ग्लोरी याच नावाच्या Humphrey Cobb लिखीत कादंबरी वर आधारीत आहे. चित्रपटाला पहिल्या महायुद्धातील जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामधल्या एका लढाईची पार्श्वभूमी आहे. पण हा युद्धपट मात्र नाही. लढाईमागचे राजकारण हाच या चित्रपटाचा विषय आहे.

'आदिम ते हायटेक'

लेखक श्रावण मोडक यांनी सोमवार, 13/09/2010 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
"(आदिवासी भाग दुर्गम असतात) लेकीन मोबाईल और इंटरनेट की वजहसे इट इज नो मोअर अ रिमोट एरिया... जव्हारमें शायदही कोई ऐसा बच्चा हो जिसने ये क्लिपिंग नही देखी." "(आदिवासी स्त्रीचं शोषण सुरूच आहे). प्रमाण कमी झालं, पण पद्धत बदलली."
पहिलं उद्धरण आहे पोलीस उपअधीक्षकांचं (इन्सिडेंटली, त्या एक महिला आहेत), आणि दुसरं आहे आदिवासी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्याचं. जव्हार. ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील आदिवासी भाग. फेब्रुवारीत हा भाग ढवळून निघाला. अजूनही ढवळलेला आहेच. जव्हारच्या शिवाजीनगर भागातील एका महिलेचे अश्लील लैंगीक चित्रीकरण करण्यात आले. त्याचे व्हायचे तेच झाले.

काट्याच्या अणीवर वसली तीन गावे

लेखक शरद यांनी रविवार, 12/09/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
संतांच्या कविता ..२ प्रथम थोडे अवांतर. भोज राजाच्या दरबारात कालिदासासारखी रत्ने होती तसेच बरेच विद्वानही होते. काही एकपाठी, काही द्विपाठी,काही त्रिपाठी . म्हणजे पहिल्याने एकदा वाचले-ऐकले की पाठ व्हावयाचे, दुसर्‍याला दोन वेळात तर तिसर्‍याला तीनदा ऐकून. भोज राजाने एकदा गंमत करावयाचे ठरवले.त्याने दवंडी पिटवली की "कोणी कवी नवीन कविता करेल तर त्याला एक लाख रुपये बक्षिस मिळेल".कवींना वाटले झालोच आपण लक्षाधीश. दरबारात ही रांग. मजा अशी की कोणत्याही कवीने नवीन कविता म्हटली की एकपाठी ती लगेच म्हणून दाखवावयाचा. दोनदा ऐकून झाली की द्विपाठी उठावयाचा.तो म्हणावयाचा. झाले.

'सायलेन्स प्लीज'

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 10/09/2010 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
'सायलेन्स प्लीज' हे दोन शब्द ऐकू आले आणी पुर्ण स्टेडीयम मधे शांतता पसरली... टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप १५-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप टक टक टक ३०-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप ४०-० टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप टक टक टक टक टक टक टक टक ६०-० परवा सहा तारखेला यु एस ओपन याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला.....नशीब बलवत्तर म्हणावे की रॉजर फेडररची मॅच आमच्या लॉट ला आली...

मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 10/09/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज न्यूयॉर्कमधे बुद्धीबळाचा एक डाव सुरु होतोय. अजून बरोब्बर साडेतीन तासांनी अमेरिकन वेळेनुसार दुपारी १२ वाजता. वयाच्या तेराव्या वर्षी ग्रँडमास्टर झालेला आणि आता बिल्बाओ इंटरनॅशनल मधे विश्वनाथन आनंदचा आव्हानवीर ठरवण्याच्या स्पर्धेतला खेळाडू नॉर्वेचा मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग! मॅग्नुस फक्त १९ वर्षांचा आहे आणि आज जगातला अव्वल दर्जाचा खेळाडू समजला जातो. फिडेच्या यादीत तो आत्ता पहिल्या क्रमांकावर आहे! न्यूयॉर्कमधल्या कूपर स्क्वेअर हॉटेलमधल्या पेंटहाऊस मधे हा सामना रंगेल.

संतांच्या कविता

लेखक शरद यांनी शुक्रवार, 10/09/2010 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
संतांनी फ़क्त अभंग व ओव्याच लिहल्या असे नाही. त्यांनी काही सुरेख कविताही लिहल्या आहेत. आज आपण लावत असलेले कोणतेही चांगल्या कवितेचे निकष लावले तरीही उत्तीर्ण होतील अशी काव्ये संत साहित्यांत मिळतात.तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा एक खेळकर कविता म्हणून आपण आस्वाद घेऊ. त्याचे असे झाले,कोंकणांत मीठ विकावयाला नेले ,व्यापारांत लाखाचे बारा हजार केले, म्हणून लोक टिंगल करावयाला लागले. म्हणून तुकारामांनी ठरवले की या वेळी नक्की खपेल असाच माल विकावयाचा. निवडक,’ युनिक",लोकप्रिय वगैरे. त्यांना एकदम आठवण झाली कृष्णाची,गोकुळांत सर्वांच्या,विशेषत: बायकांच्या,जरा जास्तच मर्जीत होता.

प्रेम

लेखक शुचि यांनी मंगळवार, 07/09/2010 03:04 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रेमाची व्याख्या कशी करशील?" मी मैत्रिणीला विचारलं एक जण आत्मविश्वासानी म्हणाली - "सोप्प आहे प्रेम अथांग समुद्रासारखं असतं. सर्व चूका पदरात घेणारं. परमेश्वराच्या कृपेसारखं" दुसरी जरा अवखळ होती, म्हणाली "शुचि प्रेम मला झर्‍यासारखं वाटतं ग. येणार्‍या वाटसरूला निर्मळता बहाल करणारं, सदोदीत खळखळून वहाणारं." ह्म्म .... माझं काही या उत्तरांनी समाधान झालं नाही. पुढे काही मैत्रिणींनी देखील अशीच उत्तरं दिली - कडक उन्हात सावली देणार्‍या वृक्षासारखं परोपकारी तर कुणी म्हटलं शीतल चांदण्यासारखं. मी ठरवलं व्यक्ती तितक्या प्रेमाच्या व्याख्या. पण मग माझी प्रकृती कशी?

आपणाला दुसर्‍याचा नवरा आवडतो का?

लेखक भीडस्त यांनी रविवार, 05/09/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर खूप विनोदी चर्चा चालू आहेत. त्यात गंभीर म्हणा विचारप्रवर्तक म्हणा. एक वेगळा विषय. बर्‍याच दिवसांनी आमचे बायकोबरोबर (नेहमीप्रमाणे) परत एकदा भांडण झाले. आज सकाळी मिपावर आलो आणि हा विषय सुचला विषयाचे नाव आहे.

पॅराडाइज नाऊ

लेखक सुनील यांनी रविवार, 05/09/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
नॅब्लूस हे पॆलेस्टाईनमधील एक शहर. सैद आणि खालेद हे त्या शहरात एकत्र वाढलेले जिवाभावाचे मित्र. सुहा ही सैदची मैत्रीण. तिचे वडील इस्रायलविरुद्धच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेले. परंतु पॅलेस्टाईनबाहेर वाढलेली सुहा आहे मध्यममार्गी! मूळात मोटर मेकॅनिक असलेल्या सैद आणि खालेद यांची तेल अवीववर आत्मघातकी हल्ला करण्याच्या मोहिमेवर निवड होते. मोहिमेला निघण्यापूर्वीचा शेवटचा दिवस ते आपल्या कुटुंबियांसमवेत घालवतात, त्यांना ह्या मोहिमेबद्दल कसलीही चाहूल लागू न देता! सैदला सुहाच्या शांतताप्रिय, मध्यमार्गी विचारांचा अंदाज येतो.