Skip to main content

आस्वाद

रान संपत्ती

लेखक जागु यांनी बुधवार, 01/09/2010 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
पावसांच्या सरी चालू झाल्या की निसर्ग आपली ही संपत्ती उधळायला सुरुवात करतो. त्या संपत्तीपैकीच ही काही रान फुले व झाडे. निसर्गाकडू आपल्याला ही संपत्ती विनामुल्य, विनाकष्ट मिळत असते. ही छोटी मोठी रानफुले, झाडे आपल्या नजरेला, मनाला अगदी गारवा देउन जातात. मनाचा, शरीराचा थकवा ह्यांच्या सहवासाने कुठे दुर पळतो त्याचा पत्ता लागत नाही. फक्त आपण त्यांच्याकडे डोळसपणे पाहील पाहीजे. निसर्गाने दिलेल्या ह्या संपत्तीची नजरेने लूट करुन पहा.

संगणकाच्या मदतीने उत्कृष्ट लेखक बनण्याची कळा

लेखक संतोषएकांडे यांनी मंगळवार, 31/08/2010 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
विषय नक्की करा. संगणक चालू करा. गूगल ओपन करा. निवडलेला विषय त्यांत टाका. अँटर द्या. कमीत कमी सात आठ फाइली तरी आढळतील. प्रत्येकीतून दोन चार पॅरेग्राफ कॉपी करून ' एक्सेल वर्ड ' मधे पेस्ट करा. नविन फाइल ओपन करून त्यात सेव केलेले पॅरेग्राफ्स इकडे तिकडे कुठेही जागा मिळेल तिथे पेस्त करा. आणी ब्लोग वर प्रकाशित करा बरेचशे वाचतील. बर्याचशांनां कळणार नाही. पण घाबरायचे कारण नाही. ते समजतील, ' लेखक उंच दर्ज्याचा आहे....' बरेचशे प्रतिभाव मिळतील. आणि एक उत्कृष्ट लेखक म्हणून प्रसिध्ध व्हाल. एकदम पक्की ग्यारंटी.

मिपावरची दर्जेदार लेखनाची उदाहरणे.

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 31/08/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
दर्जेदार लेखन म्हणजे काय? हा अत्यंत गहन प्रश्न आहे. चांगल्या लेखनाची व्याख्या करताना भल्याभल्यांची दमछाक होते. कारण काहीही व्याख्या केली, तरी उत्कृष्ट लेखन ती व्याख्या छेदून दशांगुळे वर उरतंच. मग ते सामावून घेण्यासाठी पुन्हा व्याख्या बदलायची आणि पुन्हा पुढची दहा अंगुळं पसरणारं काहीतरी सापडलं की ये रे माझ्या मागल्या सुरू होतं. पण कधी कधी चांगलं लेखन म्हणजे काय, याचं उत्तर अश्लील म्हणजे काय याला एकाने दिलेल्या उत्तराप्रमाणे होतं "चांगलं लेखन म्हणजे काय हे मला सांगता येणार नाही, but I will know it when I see it". आपल्यापैकी बहुतेकांना हा आतला आवाज असतो - जो चांगल्या लेखनाला दाद देतो.

एका तेलियाने

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 29/08/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय राजकारण हे जितकं रोचक तितकंच क्लिष्ट. तिथे एकाच वेळी प्रत्येक जण आपला पट मांडतो, आपली चाल खेळतो आणि त्याच वेळी प्रत्येक जण इतरांच्या पटावरचे प्यादे असतो. अश्या ह्या बहुआयामी राजकारणात जसजसं जग जवळ येऊ लागलं तसतशी अधिक क्लिष्टता व प्रसंगी अधिक रोचकता येऊ लागली. त्याच बरोबर हा पट शांत डोक्याने मांडून व इतरांच्या पटांवरील आपली परिस्थिती लक्षात घेऊन ज्यांनी हा खेळ खेळला ते त्या त्या मार्गाने पुढे गेले व इतर अनेक जण त्या खेळात वाईट प्रकारे भरडले गेले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर कोणत्या एका गोष्टीभोवती आंतरराष्ट्रीय राजकारण फिरलं हा प्रश्न विचाराल तर "तेल" हे उत्तर कोणीही देईल.

बहुगुणी वडे

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी रविवार, 29/08/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! आज आपण बहुगुणी वडे तयार करून पाहाणार आहोत. ही पाककृती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे स्वत:च्या जोखमीवरच या पाककृतीला हात घालावा. ही पाककृती फसल्याने पट्टीच्या खवय्यांनाही बध्दकोष्ट, अजीर्ण, कफ आणि बर्‍याच वेळा वात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खाणार्‍यांना उबळ, उलटी, मळमळ, अंगाचा दाह, माथेशूळ उठणे इत्यादी त्रास झाल्यास तात्काळ पाककृती गुंडाळावी आणि काढता पाय घ्यावा - त्यांच्या पचनशक्तीला दोष देऊ नये आणि समजूत काढण्याच्या तर बिलकुल भानगडीत पडू नये.

बेहती हवा सा था वो..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 29/08/2010 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
बेहती हवा सा था वो...(येथे ऐका..) ३ इडियटस् चित्रपटातलं हे अप्रतिम गाणं. एका हरवलेल्या मित्राबद्दलचं हे मनोगत.. विशुद्ध, निरपेक्ष मैत्रीसारखं या दुनियेत दुसरं काही नाही.

केव्हा तरी पहाटे..

लेखक इला यांनी रविवार, 29/08/2010 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
असंच एकदा मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना एका मैत्रिणीने केव्हा तरी पहाटे हे गाणं म्हटलं...तर त्यावरून एका मैत्रिणीला याच गाण्यासाठी काही ओळी सुचल्या. मग त्यानंतर सगळ्यांनाच हा फीवर चढला...हे माझेही काही प्रयत्न - ही कडवी चालीत बसत नसली तरीही त्यातील भावार्थ गाण्याला अनुरूप असा आहे या शांतशा क्षणांनी मागितली साथही कुणाची ती साथ मागताना ही रात सरून गेली.. शब्द माझे भिजताना सजवून रात्र गेली हे शब्द वेदनांचे सुचवून रात्र गेली.. बघा तुम्हालाही अजून काही सुचतंय का?

सिनेमा आस्वाद - पॅटन

लेखक शुचि यांनी रविवार, 29/08/2010 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
सहसा मी युद्धाचे सिनेमे बघायच्या भानगडीत पडत नाही. याचं कारण जेव्हा जेव्हा नवरा युद्धाचे सिनेमे लावून बसतो,तेव्हा तेव्हा तोफांच्या, बंदूकींच्या, रणगाड्यांच्या आवाजानी माझं डोकं उठतं. परत कोकलून कोकलून नवर्‍याला "आवाज कमी कर" हे सांगावं लागतं ते वेगळच. ना भक्तीगीतं, भावगीतं लावता येतात ना झोप काढता येते, ना घरी कोणी कुणाशी बोलू शकतं. पण आमच्या घरात सध्या झालीये एक फितुरी. मी ज्या पिल्लाला माझं समजत होते इतकी वर्षं , अगदी टेकन फॉर ग्रांटेड ते निघालय पप्पाचं. तिनी फादर्स डे ला माझ्या नवर्‍याला एक वॉर मूव्ही - "पॅटन" भेट दिली. आता तिनी दिली म्हणजे पहायलाच पाहीजे मला.