Skip to main content

पाहावेसे असे काहीतरी- नितळ!!!

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 24/09/2010 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्‍या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट. चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो.

सायकल चोर

लेखक तिमा यांनी बुधवार, 22/09/2010 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी, साधारण सात-आठ वर्षांचा असताना एक इटालियन चित्रपट पाहिला होता 'द बायसिकल थिव्हज' ! तेंव्हा तो फारसा समजलाही नव्हता पण घरी आल्यावर आईने त्याची गोष्ट सांगितली होती. नुकतीच त्या सिनेमाची आठवण झाली व प्रकर्षाने तो पुन्हा पहावा असे मनाने घेतले. मग मुलाच्या मदतीने तो नेटवर शोधला, त्याची सबटायटल्स शोधली आणि बघितला. एक अविस्मरणीय अनुभव घेतल्याचे समाधान मिळाले. या चित्रपटाला ऑस्कर व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत व जगभरातल्या समीक्षकांनी तो अद्वितीय असल्याचे मान्य केले आहे.

प्रेम......................

लेखक utkarsh shah यांनी मंगळवार, 21/09/2010 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे काय? आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? प्रेम म्हणजे काय? एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं, सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो? अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की. अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे? प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो. सिद्ध काय कसंही करू शकशील रे.

भेट तुझी......मंतरलेली!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी सोमवार, 20/09/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
.. क्षण मंतरलेले .. . तू येण्या आधीची ती हुरहूर ...अजून जाणवते मला. अस्वस्थ मन.....हृदयाची ती किंचित थरथर ....एखादा चुकलेला ठोका...आताही जाणवतो मला.. तूला पाहताक्षणी..मनभर आणि तनभर पसरत गेलेली गुलाबी सरसर .. ....माझ्याच गालांचा बदललेला वर्ण..ओठांवर अकारण उमलेले स्मित ...त्याही पेक्षा.. हे सारं जाणवलेली तुझी नजर, आणि तुझ्या त्या नजरेने पुन्हा सैरभैर आणि अस्वस्थ मी... अजून आठवते मला .. तू जवळ असतानाचा हवेचा गंध.... तुला स्पर्शून येणारी मंद रेशीम झुळूक.. सैलावलेलं मन..एखादा नकळत ...

अजून एक सिनेमा ओळख .. " टु बी ऑर नॉट टु बी" ( १९८३)

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 17/09/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
टु बी ऑर नॉट टु बी १९३९ सालातला पोलंड, नाझी आक्रमण, वॉर्सॉमधले चळवळ करणारे देशप्रेमी नागरिक, गेस्टापो अधिकारी, नाझी गुप्तहेर, वॉर्सॉमधून इंग्लंडला पळून जायच्या प्रयत्नात असलेले ज्यू नागरिक या सार्‍या गोष्टी घेऊन एक धमाल विनोदी सिनेमा बनवता येईल का? तर या प्रश्नाचं उत्तर "हो" असं आहे. तर ही गोष्ट आहे वॉर्सामधल्या सुप्रसिद्ध "ब्रॉन्स्की थिएटर्स" या नाटक कंपनीची.

द अंग्रेज

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 15/09/2010 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गणपाचे हैद्राबादी वाचले आणि सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली ती 'द अंग्रेज' ह्या तुफान विनोदी हिंग्लिश चित्रपटाची. 'बॉम्बे बॉईज' वगैरे चित्रपटानी पहिल्यांदा मल्टिप्लेक्स चित्रपटांची लाट आणली, त्याच लाटेतला हा एक नितांत सुंदर विनोदी चित्रपट. चित्रपटाचे अजुन एक वैशीष्ठ्य म्हणजे हिंग्लिश चित्रपट असुनही हा चित्रपट कौटुंबीक करमणुक करणारा आहे. कुठेही अश्लील दृष्यांचा, द्विअर्थी संवाद, शिव्या ह्यांच्या भडिमार नाही. नवा दिग्दर्शक, सर्व चेहरे फ्रेश आणि नविन पण चित्रपटाचा दर्जा नक्कीच उच्च करमणुक करणारा आहे.

कातीन हत्याकांड ... दडवलेला इतिहास...

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 15/09/2010 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
आन्द्रे वायदा (http://en.wikipedia.org/wiki/Andrzej_Wajda) नामक पोलिश दिग्दर्शकाचा हा २००७ सालातला सिनेमा. ( या सिनेमाला २००८चं फ़ॊरीन फ़िल्मसाठीचं ऒस्कर नॊमिनेशन होतं) कातीन हत्याकांड हा दुसर्‍या महायुद्धातला ( त्या मानानं कमी प्रसिद्ध पण ) प्रचंड अस्वस्थ करणारा इतिहास...

मेरे मौला करम हो करम....

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 14/09/2010 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे मौला करम हो करम... (येथे ऐका) मेरे मौला मौला, मेरे मौला मौला हो करम... मेरे मौला करम हो करम मेरे मौला करम हो करम... हे देवा, हे मौला, खुदा, तुझ्या दारी आलो आहे..रेहेम कर, कृपा कर. खूप थकलो आहे, दर दर भटकतो आहे, फाके पडले आहेत.. १ ली ओळ - मेरे मौला करम हो करम शुद्ध निषाद, शुद्ध रिखभ आणि कोमल गंधार यांचं राज्य. या तिघांनी मिळून साकारलेली करुणता. हात जोडले आहेत- प्रार्थनेकरता..! Low tone मध्ये. २ री ओळ - मेरे मौला करम हो करम डोकं ठेवतो बा तुझ्या पायावर..