Skip to main content

तव नयनांचे दल हलले ग

लेखक शरद यांनी शनिवार, 09/10/2010 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून मला आवडलेल्या काही कवितांची ओळख करून देत आहे. तेव्हा या कविता किमान पन्नास वर्षांपूर्वीच्या असणार हे तर आलेच. पण चांगली कविता नेहमीच ताजी तवानी असते ( हे माझे मत !) सुरवात श्री. बा.भ.बोरकरांच्या एका भावकवितेपासून करू. तव नयनाचें दल हललें ग कवीवर्य बा.भ. बोरकर हे बालकवींप्रमाणेच निसर्गात रंगणारे. त्यामुळे त्यांची एक कविता द्यावयाची म्हटले तर त्यांच्या अनेक निनांतसुंदर निसर्गकविता समोर येतील. पण आज मी आज एक भावकविता देत आहे. हीच का ? तर तुमच्या आवडत्या कवीच्या अनेक कविता तुम्हाला प्रिय असल्या तरी दोन चार तुमच्या स्वत:च्या असतात. त्या नेहमी वाचण्याकरिता नसताच मुळी.

ढग - १

लेखक जिप्सी यांनी शनिवार, 09/10/2010 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगरात उनाडताना नेहमीच ढगांची वेगवेगळी रूपं,आकार बघायला मिळतात्,असे अनेक फोटो माझ्या संग्रहात आहेत्,जर आपल्याला आवडतं असेल तर माझा संग्रह तुमच्यापुढं खुला करीनं. आभाळातलं पाखरू (हरिहर) मेघअश्व (प्रबळ्गड)

लहान मुलांच्या जर्मन पुस्तकांतील चित्रांचे प्रदर्शन

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 08/10/2010 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
तोच तोच काथ्या पुन्हा पुन्हा कुटून, फुटक्या कौलांवर पुन्हा पुन्हा दगड मारून कंटाळा आला असेल आणि वीकेंडला थोडा रुचिपालट हवा असेल तर हा घ्या... Sybille Hein सध्या पुण्यात पुस्तकांशी संबंधित एक गोड प्रदर्शन सुरू आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा. शक्य असल्यास आपापल्या (किंवा इतरांच्याही) बच्चेमंडळीसह जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं हा फार महत्त्वाचा भाग असतो.

वारियाने कुंडल हाले

लेखक शरद यांनी गुरुवार, 07/10/2010 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
श्री.ज्ञानेश्वर,नामदेव व तुकाराम यांच्या पदांनंतर आपण आज श्री. एकनाथ महाराज यांचे एक पद घेऊन संतांच्या कविता या मालिकेचा निरोप घेऊ. एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लिखाणातील विविधता. गौळणी,भारुड आदी लोकवाङ्मय लिहावे तर एकनाथांनीच. इतर कवी या क्षेत्रांत त्यांच्या जवळपासही येऊ शकत नाहीत. त्यांची एक अतिशय लोकप्रिय गौळण म्हणजे : वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले ! फ़णस जंबीर कर्दळी दाटा हाती घेऊन नारंगी फ़ाटा ! हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता !

रात्र काळी, घागर काळी

लेखक शरद यांनी सोमवार, 04/10/2010 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
आजपावेतो घेतलेली तीन पदे तशी अप्रचलित म्हणावयास हरकत नाही.शेवटची दोन पदे प्रचलित व अतिशय लोकप्रिय अशी आहेत. सुंदर चाली व आकर्षक आवाज यांची भुरळ पडून शब्दांकडे व त्यांतील सौंदर्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी हा धोका लक्षांत घेऊन श्रोत्यांना विनवणी केली आहे की. शब्द सौंदर्याकडॆ लक्ष देऊन विषयाकडे दुर्लक्ष करूं नका.