Skip to main content

लाभले आम्हास भाग्य..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 02/10/2010 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
'लाभले आम्हास भाग्य.. ' भटसाहेबांच्या सिद्ध लेखणीतून उतरलेलं, अभिमानानं उर भरून यावा असं मायमराठीचं यथार्थ गुणगान करणारं हे काव्य आणि कौशल इनामदारचं संगीत असलेलं हे समूहगीत.. कौशलच्या हातून घडलेलं एक खूप चांगलं काम, मोठं काम! उत्तम हार्मोनियम वादक आदित्य ओक हा आम्हा दोघांचा कॉमन मित्र.. काही वर्षांपूर्वी एकदा आदित्यच्या घरी कौशल आला होता तेव्हा मलाही जेवायचं आमंत्रण होतं.. मला आठवतंय, जेवणानंतर हार्मोनियम पुढ्यात घेऊन कौशलने अगदी हौशीहौशीने त्याच्या डोक्यात घोळत असलेल्या अनेक चाली मला ऐकवल्या होत्या.

तेथे वेधलिसे बाळी

लेखक शरद यांनी शुक्रवार, 01/10/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण ज्ञानेश्वर महाराजांची एक कविता बघणार आहोत.विसाव्या शतकांत मनोविज्ञान संशोधिकांनी केलेल्या प्रयोगाचा वापर सातशे वर्षांपूर्वीच्या कवितेत आढळतो.प्रथम कविता बघू. निळिये मंडळी निळवर्ण सावळी तेथे वेधलिसे बाळी ध्यानरुपा ! वेधू वेधला निळा पाहे घननिळा विरहिणी केवळा रंगरसने ! निळवर्ण अंभ, निळवर्ण स्वयंभ वेधे वेधू न लभे वैकुंठीचा ! ज्ञानदेव निळी हृदयी सावळी प्रेमरसे कल्लोळी बुडी देत ! बाळी- गोपी, अंभ- आकाश, स्वयंभ- विष्णु/कृष्ण, कल्लोळ - लाटा संशोधकांनी केलेला प्रयोग असा : एका कुत्र्याला खाणे द्यावयाच्या आधीं शिट्टी वाजवावयाची आणि लगेच खाणे द्यायचे.

लतादिदी ची एक आठवण.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 29/09/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त्य अनेक लेख वाचण्यात आले आणि अनेक गाण्यांचा आस्वादही घेण्यात आला. १९६४ च्या सूमारास लतादिदींना गीतेच्या अध्यायावर गायन करण्यासाठी एका संगितमंडळीने सांगितले. लतादिदी आपल्या प्रघातानूसार त्यावर चिंतन, मनन आणि वाचनाची तयारी सुरु केली. उच्चारावर लतादिदींचे खास लक्ष असते. उच्चारात कोणताही दोष असु नये यासाठी त्यांनी गोनिंदा यांना तातडिने येण्यासाठी पत्र पाठविले. गोनिदा यांच्या देखरेखीखाली लतादिदी यांच्या सरावासाठी सुरवात झाली. लता एकनंतर एक असे अध्याय वाचत आणि गोनिंदा त्यात र्‍हस्व आणि दिर्घाच्या उच्चारात काही त्रुटी राहत तर नाही ना यावर लक्ष देत.

फ....फ....फ....फ्लोरिडा

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 24/09/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
दोन-तीन विकांतापुर्वी फ्लोरिडाला जाण्याचा योग आला.. त्यातले काही निवडक फोटू खाली देत आहे. १. क्लीयरवॉटर बीच - सुर्यास्त २. क्लीयरवॉटर बीच - सुर्यास्त ३. सेंट पीट्स बीच ४.