Skip to main content

वो सांस हूं जो लबोंपे.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 28/02/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
रफीसाहेबांची अनेक गैरफिल्मी गाणी आपल्याला माहीत आहेत, असतील. त्याची मजा काही औरच आहे. मुख्य म्हणजे कमीत कमी संगीत व ह्रदयाला भिडणारा त्या गाण्यांचा अर्थ आणि सरळ ह्रदयात एखादी सुरी उतरावी तसा मनाला भिडणारा साहेबांचा आवाज...... त्यातच त्या गाण्यात भावनांची तडफड असेल तर ते गाणे खरच ह्रदय कापत जाते.

तेजोनिधि लोहगोल - छायाचित्रे

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 28/02/2011 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज हे दिनमणि व्योमराज कोटि कोटि किरण तु़झे अनलशरा उजळिती अम्रुतकण परि सेवुनि अणु रेणु उधळिती तेचातच जनन मरण तेजातच नविन ध्यास ज्योर्तिमय मुर्ती तुझी नभमंड्ल दिव्यसभा दाहक परि संजिवक तरुणारुण किरणप्रभा होव जिवन विकास वसुधेची राख लाज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज. हे गाणं दररोज सकाळी ऐकुन माझ्या दिवसाची सुरुवात करतो, काही फार जास्त महत्वाचं काम असेल दिवसभरात तर लगेच ' गगन सदन तेजोमय' ऐकुन घेतो, सगळी कामं झटपट होतात माझी. मागच्या आठवड्यात एका डोंगरावर गेलो होतो, म्हणजे हापिसातर्फे ट्रेनिंग होतं, त्या अंतर्गत डोंगरावर चढवलं होतं, अगदि सकाळि सकाळी.

आयुष्यावर बोलू काही ....

लेखक प्राजक्ता पवार यांनी गुरुवार, 24/02/2011 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी कलाकृती मग ती कविता असो , चित्रकाराने रेखाटलेले चित्र , गायकाने गायलेले गाणे वा एखादा लेख रसिक मनाला आवडला की त्या रचनाकाराला दाद ही मिळतेच.कधी ती टाळ्यांच्या स्वरुपात तर कधी बोलुन . आज या लेखनप्रपंचाचा उद्देशदेखील हाच. आयुष्यावर बोलु काही ( प्रयोग ५०० ) या सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी . तुमच्यापैकी बर्‍याचजणांना ही गाणी माहित असतील , आवडत असतील. मला मात्र जरा उशिराच का होइना पण या महफिलीचा आनंद लुटायला मिळाला. त्याला कारणही तसेच घडले. बर्‍याच दिवसांनी जरा दोन दिवस सवड काढून मी हॉस्टेलच्या मैत्रिणीला भेटायला आले होते.

रतनगड - एक सुखद अनुभव

लेखक गणेशा यांनी बुधवार, 23/02/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवरुन संध्याकाळी ६:३० ला गोदावरी गाडी ने नाशिक रोड ला उतरलो. सिन्नर चा माझा मित्र ह्रषिकेश यमाहा १३५ वर मला न्ह्यायला आलाच होता(मीच बोलावले होते, बिच्चारा मॅच सोडुन आला) .. नाशिक मधील जुने कलीग त्यांच्या फॅमीली बरोबर रात्री "छान" मध्ये जेवुन , जाताना मी चिकन खाल्ले म्हणुन २ शब्द मित्राकडुन उगाच ऐकुन आम्ही सिन्नर ला निघालो... रतनगड ला तसे नाशिक वरुन ही जाता आले असते पण सकाळी डबा घ्यायचा असल्याने नाशिक च्या मित्राला सोडुन आम्ही सिन्नर ला गेलो. रतनगड ला ही बाकीचे कॅन्सल झाल्याने आम्ही दोघेच जाणार होतो.. सकाळी लवकर उठुन .. २ ब्यागा भरण्यात आल्या.. डबा .. कांदे..

गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका - एक अभिजात मराठी पुस्तक

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 22/02/2011 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता.

'मदन गंधर्व'

लेखक प्रास यांनी मंगळवार, 22/02/2011 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण १९३७-३८ चा काळ. करमणूकीचं एक माध्यम म्हणून रेडिओ स्थिर झालाय. एका सकाळी दुकानातील रेडिओवर एक शास्त्रीय चीज लागते. एक किनारा आवाज ठुमरी अलगद उलगडू लागतो. गाणं ऐकू येताच भर बाजारातले व्यवहार अचानक ठप्प होतात. जो तो आपलं काम सोडून त्या आवाजाच्या दिशेने खेचला जातो. प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न कोण ही नवी गायिका? इतर गायिकांसारखा हा काही अनुनासिक आवाज नाही, मग गातंय कोण? गाणं सर्वजण स्तब्ध होऊन ऐकतात. आणि गाणं संपल्यावर निवेदक नाव सांगतो, 'मास्टर मदन'. लोकांच्या चेह~यावर एकच प्रश्न, बाईचं नाव 'मदन' कसं?

विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

लेखक सहज यांनी शनिवार, 19/02/2011 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ - इतिहास, संस्थळचर्चा इ इ एक चित्रपट अधुन मधुन वेगवेगळ्या चॅनेल्सवर लागतो आजकाल. म्हणले तर जुना म्हणले तर नवा आहे. नाव बहुतेक 'अभी तक पचपन्न' का कायसेसे आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. चित्रपट व कथा काल्पनिक आहे संबध लावायला गेलात तर चक्रवाल! एन्जॉय करा. सिनेमाची सुरवात दाखवली आहे साल १९४७. मुद्दाम ब्लॅक एन्ड व्हाईट दृश्य आहे. सेठ मोहनदासजी एक मोठ्या बिझनेस सामाज्याचे मालक आहेत. पण त्यांनी आता धंद्यात लक्ष कमी केले आहे.

गाणी मणिरत्नमची

लेखक निमिष ध. यांनी गुरुवार, 17/02/2011 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मिपा वर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तरी इथल्या रथी-महारथींना नमस्कार करून सुरुवात करतो. दिग्दर्शक मणीरत्नम सर्वाना एक सामाजिक आणि वेगळे विषय असणारे चित्रपट काढणारा म्हणून सुपरिचित आहेच. त्याच्या दहशदवादाच्या विषयावरील त्रिमूर्ती तर बहुतेकांनी पाहिली असेल ती म्हणजे रोजा, बॉम्बे (आता चित्रपटाचे नाव हेच होते) आणि दिल से . पण हाच दिग्दर्शक खूप अप्रतिम गाण्यांचे सादरीकरण आपल्या चित्रपटांमध्ये करतो.