भोग
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे.
मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.
चतुर सरदार.
एक सरदार रोज भारत पाक सिमा ओलांडुन स्मगलिंग (तस्करी)करत असल्याची खबर पाकिस्तानी पोलिसाला कळते.सरदार रोज आपल्या मोटारसायकलवरुन १ पोते भरुन माती घेउन जात असतो.पोलिसाला दाट संशय येतो कि त्या पोत्यातच काहीतरी गडबड असणार, तो खुश होतो.मग पोलिस सरदारच्या मागावार राहुन त्याला चेकनाक्यावर अडवतो.
नेहमीचीच संध्याकाळ
संध्याकाळचे ५.३० वाजतात. सगळेच पीसी बंद करुन उठतात. वर्गात काही लोक सोडून कुणालाच बसायची इच्छा नसते; तरीपण लॅब मध्ये काहीतरी काम करतोय असे मॅडमना दाखवावे लागते. त्याला पर्याय नाही. प्रत्येक शुक्रवारचा हाच दिनक्रम! मॅडमचा शाब्दिक मार, धमक्या सहन होत नाहीयेत, खर्या करुन दाखवल्या तर धडगत नाही. त्यातच मंगळवारच्या सेमिनारचे टेंशन. एक ना दोन, हजार लचांडे मागे लावून प्रोफेसर लोक मात्र निवांत चहा आणि सिगरेट प्यायला शहीद भवनात किंवा टिक्कावर!
सायकली काढून सगळेच टांग टाकून हॉस्टेलकडे. गप्पा नेहमीच्याच; मॅडमच्या कॉमेंट्स आणि पुढच्या आठवड्यात करायच्या असाईनमेंट्स. काय करायचे, कोणी करायचे याचा थांग नसतो.
सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.
भुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची.
निसर्गवेड्यांसाठी नवी भेट - पुण्याचे पक्षीवैभव
एनआरसीओतर्फे `पुण्याचे पक्षीवैभव’ फील्ड गाईडचे प्रकाशन २० मार्च रोजी
नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) या पुण्यातील संस्थेच्या वतीने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून दिनांक २० मार्च रोजी वनाधिकारी व वन्यजीव तज्ञ श्री. प्रभाकर कुकडोलकर यांनी लिहिलेल्या `पुण्याचे पक्षीवैभव’ या पक्षीनिरीक्षकांसाठीच्या फील्ड गाईडचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
नवे धडे
3
"पुष्पक "
राम राम, मिपाकर ,
न बोलता फटाके फोडण्या साठी मिपा संस्थळ प्रसिद्ध आणि म्हणून खूप लोकप्रिय आहे , अर्थात हे सांगण्याची काही गरज नाही म्हणा ,पण असेच एक माईल स्टोन स्थळ माझ्या आठवणीत आणि गुगल व्हिडिओ वर आहे त्याची आणि आपली भेट घडवावी म्हणून हे लेख पुष्प .

किसने बचाया मेरी आत्मा को - आलोक धन्वा
या जगात नानाविध भव्यदिव्य अनुभव आहेत. कर्तुत्व गाजविण्याच्या संधी आहेत. महत्त्वाकांक्षा, वक्तृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, वैराग्य आदि डोळ्यांचे पारणे फेडणारे गुण आहेत. अनेक प्रकारची व्यक्तीमत्वे या ना त्या कारणाने सतत आपल्या सहवासात येत असतात. यातील अनेक जण ज्ञानाने, धनाने, सामर्थ्याने आपल्यापेक्षा थोर असतात. आपल्याला असूया, दबदबादेखील वाटू शकतो.
पण थोडा अंतर्मुख होऊन विचार केला तर आपल्या लक्षात येते की - आपल्या जीवनात वरील भव्य गोष्टी या अळवावरच्या पाण्यासारख्या येतात आणि जातात.
मिसळपाव