Skip to main content

आस्वाद

डिफायन्स

लेखक यकु यांनी शनिवार, 22/01/2011 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ साली आलेला हॉलीवूडचा डिफायन्स हा सिनेमा दुसर्‍या महायुध्दातील एका सत्यकथेवर आधारीत आहे. जर्मनीच्या ताब्यात आलेल्या पोलंड आणि बेलोरूशियामध्ये एसएस स्क्वाड स्थानिक पोलीसांच्या मदतीने ज्यूंच्या धरपकडी आणि अमानुष हत्या सुरू करते. बेलोरुशियामधील एका खेडेगावातील बेल्स्की कुटुंबातील तिघे भाऊ या हत्यासत्रातून वाचतात; पण त्यांच्या वडीलांचा यात बळी जातो. ज्यू दिसला, की त्याला पकडून यातना शिबिरात टाकणे किंवा तिथल्या तिथे गोळ्या घालणे असे धोरण असते. बेल्स्की कुटूंबातील तिघे भाऊ जंगलात पळून जाण्यात यशस्वी होतात.

सिनेमा...सिनेमा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 22/01/2011 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
`भानुविलास' टॉकीजची परवाच्या अंकातली बातमी आणि आजचा म.टा.मधला अभिजित थिटेचा लेख वाचून माझ्याही आठवणींना धुमारे फुटले. अभिजितनं "भानुविलास'च्या आठवणी छानच जागवल्या आहेत. आपली गोची हीच असते, की जुन्या आठवणी सोडवत नाहीत आणि नव्याही हव्याशा वाटतात. आपल्या बालपणाच्या वेळची शाळा, मित्र-मैत्रिणी, घरं, रस्ते, ते वातावरण, तो गणवेश, सगळं सगळं तसंच राहावंसं वाटत असतो. आपण मात्र खूप बदललेलो असतो. आणि ही बदललेली स्थिती आपल्याला सोडायची नसते. पण जुनंही सगळं हवंहवंसं वाटत असतं.

लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 22/01/2011 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन आजच्या सामनात पुन्हा एकदा आपले आघाडीचे सभासद प.रा उर्फ प्रसाद ताम्हणकर याचा एक लेख प्रसीध्द झाला आहे. विषय आहे. "लग्न डॉट कॉम" लग्नाळुंना प.रा.ने मार्गदर्शन केले आहे. प्रथमतः त्याचे पुन्हा एकदाअभीनंदन. सामनात फुलोरावर क्लिक करा आणि इच्छुकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. (इतरांनी काय करायचे हे मी सांगायला नको) http://www.saamana.com/

वनराणी ..३

लेखक प्राजु यांनी शनिवार, 22/01/2011 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
वनराणी २ "शबरी...! चल! माझ्यासोबत चल. माझ्या आश्रमात चल. उठ बालिके. जे व्रत घेतलं आहेस ते पुर्ण कर. " अतिशय गंभीर आणि निर्णायक आवाजात हे काय ऐकतेय मी!! आनंदाने डोळे भरून आलेत... "मुनीवर.. मुनीवर.. मी आपली..." अरे!! हे काय!! मुनीवर... मुनीवर... !! मुनीवर अरण्याकडे चालू लागले!! मलाही जायला हवं. ....मलाही जायला हवं.... "थांबा मुनीवर! मुनीवर थांबा.. मी येतेय.. थांबा मुनीवर..

तीन प्रकारचे डेव्हलपर्स

लेखक शुचि यांनी गुरुवार, 20/01/2011 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
व्यवस्थापनाबद्दलचा विशेसषतः संगणक क्षेत्रातील व्यवस्थापनाबद्दल खूप मस्त लेख वाचनात आला. यामध्ये कोणत्याही आय टी कंपनीमधील डेव्हलपर्स ची प्रमुख ३ व्यक्तीमत्वे अधोरेखित केलेली आहेत. त्यांचा कंपनीवर होणारा परीणाम आणि दुष्परीणाम टाळण्याचे उपाय सुचविले आहेत. लेख मूळातून वाचण्यासारखा आणि उल्लेखनिय आहे. प्रथम व्यक्तीमत्व - वेठीस धरणारे डेव्हलपर्स या पठडीत येणारे डेव्हलपर्स हे बरेचदा स्ट्रॅटेजिक प्रॉड्क्टवरती अनेक मुख्य निर्णय स्वतःचे स्वतः घेतात मग भलेही त्यांना परवानगी असो वा नसो.

प्रार्थना किटक

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 19/01/2011 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारी सकाळी येऊरच्या डोंगरात भटकताना हे महाशय दिसले. प्राणी नुसता धीटच नाही तर हौशी निघाला. बेट्याने स्वतःचे मनसोक्त चित्रण करुन घेतले. पायवाटेने जाताना लक्ष गेले तर हा मस्त कोवळे उन खात बसला होता.

मिपा - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/01/2011 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, तयार आहात ना जल्लोशाला ? तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ? तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ? तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ? काय म्हणता ? कशाची तयारी करायची ? अहो 'क्रिकेट हा धर्म' असलेल्या आपल्या देशात अजुन महिन्याभरात क्रिकेटचा कुंभमेळा भरतो आहे.

[आघात ] : एक उल्लेखनीय प्रयत्न

लेखक पारा यांनी मंगळवार, 18/01/2011 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच विक्रम जोशी दिग्दर्शित 'आघात' हा चित्रपट पाहण्याचा योग आला. ज्यांना तो पाहायचा होता त्यांनी आत्ता पर्यंत तो पहिला असेलच असे गृहीत धरून मी विषयाला हात घालणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या इस्पितळाच्या तोडफोडीच्या अनेक घटना आपण ऐकतो. त्यावर त्यांच्या असंस्कृतपणाबद्दल त्यांना बोलही लावतो.