'ट्रेसी चॅपमन'
खूप वर्षांपूर्वी टीव्ही वर पाहिलेला एक 'ग्रॅमी अॅवॉर्ड'चा प्रोग्राम अचानक आठवला. वय लहान, अगम्य भाषा, शब्द फक्त दोन समजतायत, 'फास्ट कार' पण लक्षात राहतेय केवळ अप्रतीम संगीत आणि एक जबरदस्त आवाज....
हे ऐकताना अगदी मोहून गेल्यागत झालेलं....
गायिका होती 'ट्रेसी चॅपमन' आणि गाणं होतं "फास्ट कार".
संपूर्ण व्हिडिओ मध्ये एक गंभीर बाई, कुठलाही भडकपणा न करता आपल्या संगीतात ऐकणार्याला झुलवत ठेवतेय असं काहीसं जे तेव्हा जाणवलेलं ती भावना आजही कमी झालेली नाही....
तुम्हाला काय वाटतं....?
http://www.youtube.com/watch?v=Orv_F2HV4gk
ट्रेसी मूळची क्लीव्हलँडची. एकट्या आईने वाढवलेली. गरीबीतही तिची संगीताची आवड तिच्या आईने जोपासली. शाळेत खास वर्गासाठी ती निवडली गेली आणि तिच्या प्रतिभेला एक चांगली वाट मिळाली. शिक्षणाचं महत्त्व जाणणार्या ट्रेसीने ट्रफ्ट विद्यापीठातून कला शाखेत पदवी मिळवली. याच विद्यापीठाने पुढे तिच्या सांगितिक आणि सामाजिक योगदानासाठी मानद डॉक्टरेट दिली.
वयाच्या आठव्या वर्षापासूनच ट्रेसी गाणी लिहायला लागली. ट्रेसीची सर्व गाणी तिने स्वत:च लिहिलेली आहेत आणि संगीतही तिचेच आहे. ती स्वत: गिटार फार छान वाजवते. तिच्यातली गीतकार सामान्यांच्या जीवनातील अनुभवांना कवितेचे रूप देते तर तिच्यातली संगीतकार त्या कवितेला गाणं बनवते जे जनसामान्यांच क्रांती-गीतच बनून जातं.
ट्रेसी चं "Talkin' about a Revolution" हे गाणं खरोखर क्रांतीचं 'अॅन्थम' बनण्याइतकं सुंदर आहे.
जरूर ऐका....
http://www.youtube.com/watch?v=7rZbvi6Tj6E&feature=related
ट्रेसी चापमन एक जबरदस्त कवयित्री आहे. ती अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे. प्रेमाच्या नात्यातील चढ-उतार यांची तिला जाणीव आहे. प्रेमीजन कधी काही कारणांनी दूर जातात आणि काही काळाने पुन्हा जवळही येतात. अशांच्या भावभावनांच्या कल्लोळांचे विचार ती इथे किती हळूवारपणे व्यक्त करते ते "Baby can I hold you" या तिच्या अत्यंत लोकप्रिय गाण्यातच ऐका.
http://www.youtube.com/watch?v=kjRo_CHSdt0&feature=related
तसेच काहीसे विचारही इथे "Give me one reason" या गाण्यात ऐकण्यासारखे आहेत.
http://www.youtube.com/watch?v=y2kEx5BLoC4&feature=related
ट्रेसी मधली कवयित्री वाढत्या वयाची मुलं असलेल्या आईच्या भावना "Sing for you" या गाण्यात फार छान व्यक्त करते. यातले शब्द आणि त्याबरोबरचं ते डू डू डू.... फारच सुंदर परीणाम करून जातं तेव्हा जरा इथेही कान द्या.......
http://www.youtube.com/watch?v=90oKvAhO25A&feature=related
समाजामधल्या अपप्रवृत्तीन्च्याविरुद्ध ती स्वत:च्या गाण्यांमधून आणि कवितांमधून आवाज उठवते. तिच्या शब्दांनाच अशा वेळी धार येते आणि कोणत्याही वाद्य-संगीताशिवाय तिचा आवाज या अपप्रवृत्तींवर घाव घालू लागतो.
याचं मूर्तीमंत उदाहरण तिचं "Behind the wall" हे गाणं आहे. यातील शब्द न शब्द समाजातील घरगुती हिंसेच्या (Domestic violence) प्रवृत्तीवर आसूड ओढू लागतो.
ऐकाच........
http://www.youtube.com/watch?v=1iUoqTaowaI&feature=related
समाज कुठेही असला तरी त्यातील स्त्रियांची स्थिती काही फार वेगळी नसते, मग तुम्ही भारतात असलात, युरोपात असलात किंवा अमेरिकेत.... ट्रेसी आपल्या एका गाण्यात हेच अधोरेखित करते.
कधीही केव्हाही स्त्रीकडे तिची स्वत:ची अशी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे तिचा आत्मा! या आत्म्यावर तिच्याशिवाय इतर कोणाचाही अधिकार नसतो. पण ती स्वत:च हे विसरते आणि जीवनातील अनुभवांचे टक्के-टोणपे खाल्यानंतर तिला पुन्हा हे ज्ञान होते. अशी स्त्री आपल्या मुलीला मात्र आधीच याची जाणीव करून देते आणि ज्या अनुभवांतून तिला जावं लागलेलं असतंय त्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवायचा प्रयत्न करते. हे सर्व सांगताना ट्रेसीचे शब्द आणि संगीत अगदी काळजाला हात घालतात.
http://www.youtube.com/watch?v=CoNtYC_XDC8&feature=related
सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये राहणारी ट्रेसी आजही अनेक ठिकाणी सामाजिक कार्यांसाठी आपले कार्यक्रम करते. मात्र तिने आपले व्यावसायिक आणि खाजगी आयुष्य यांची सरमिसळ केलेली नाही. ट्रेसीसारखे कलाकार आपल्या शब्दांनी आणि सूरांनी आपलं जीवन खरंच खूप समृद्ध करत असतात. ट्रेसीची गाणी ऐकल्यावर तुम्ही नक्कीच माझ्याशी सहमत असाल याची खात्री आहे.
वर्गीकरण
कूल.
ट्रेसी चापमन एक जबरदस्त
In reply to ट्रेसी चापमन एक जबरदस्त by मनिष
+१
In reply to +१ by गोगोल
ही गाणी बाळाबद्द्ल नसून
In reply to ही गाणी बाळाबद्द्ल नसून by मेघवेडा
सपशेल मान्य दोस्तहो.....!
लेख
In reply to लेख by मुक्तसुनीत
तेच म्हणतो मी
"Give me one reason" सगळ्यात बेश्ट
Great.. Drivin in your car,
एक अपेक्षा....!!
In reply to एक अपेक्षा....!! by इन्द्र्राज पवार
आभारी आहे इन्द्राजी! तुमच्या