Skip to main content

वॅलेंटाईन वॅलेंटाईन

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 24/03/2011 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
"संत वॅलेंटाईन, काय माणूस होता सांगू ! एकदम झक्कास. प्रेमास अमर करून गेला बेटा! त्याची समाधी कुठे आहे सांगाल का? ऑर्किडची फुलं सजवायची होती त्यावर मला.", आता हे मी लिहित नाहीये किंवा लिहितच असेन तर माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल हे सुज्ञास सांगणे नलगे. "वॅलेंटाईनविषयी लिही ना", असं विनंतीवज फर्मान माझ्या गुलबक्षीने (गर्लफ्रेण्ड हो!) गेल्या आठवड्यात काढल्यावर मी माझं मराठी टायपिंगचं सॉफ्टवेयर कॉम्प्युटरमधून काढून टाकलं होतं.

अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 24/03/2011 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
‘मराठी ऐतिहासिक कादंबरी’ असं म्हटलं की काही ठराविक नावं समोर येतात. त्यांचा एक साचादेखील जवळपास ठरलेला असतो. एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आणि अभिमानास्पद वाटतील अशा, म्हणजे मराठ्यांचं शौर्य वगैरे उदात्त गोष्टींची त्या कादंबरीत भलामण करायची. असं केलं म्हणजे मराठी लोक तिच्याविषयी भरभरून बोलतात.

....आणि तरीही मी!

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 23/03/2011 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
....आणि तरीही मी! खरे तर सौमित्र यांच्या कवितांचे आकर्षण फार पुर्वी पासुनच आहे. म्हणजे जेव्हापासुन गारवा ऐकले होते तेव्हापासुन त्यांचा पंखा (गारव्यामुळे पंखा झालो ;) ) झालोच होतो. गारवा प्रकाशित झाला तेव्हा नुकतेच मिसरुडे फुटुन महाविद्यालयात दाखल झालो होतो, आणि त्यात असा सुंदर प्रेमकाव्य असलेला अल्बम म्हणजे काही विचारालाच नको. ;) असो. सौमित्र यांचा '....आणि तरीही मी!' कविता संग्रह काही दिवसांपुर्वी वाचनात आला. आत्तापर्यंत त्याची बरीच पारायणे झाली. यातील प्रत्येक रचना ही खुप तरल आणि स्वाभाविक वाटते. या सर्व कवितांनी मनात घर केले.

परिश्रमांती रसग्रहण

लेखक लंबूटांग यांनी मंगळवार, 22/03/2011 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या ठिकाणी टारझनने एका प्रतिसादाचे रसग्रहण करण्याचे आव्हान केल्याने मी माझा कधी नव्हे ते मिळालेला रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे ठरवले. सर्वप्रथम अन्वर चित्रपटावरून लेखकाला लंडनची आठवण येते म्हणून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला धन्यवाद.

बातमी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 22/03/2011 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही हिस्स बघितला आहे का? हा तोच तो. मल्लिका शेरावतचा. बघितला आहे असे उघड उघड मान्य करणारे लोक या पृथ्वीतलावर फार कमी सापडतील. तसा हिस्स मीही बघितलेला नाही आहे. खरेच सांगतो. पण मल कथा महिती आहे. तिच ती जुनी कथा. इच्छाधारी नागिण आणि तिचा प्रतिशोध. विषयही तसा जुना आहे. यापुर्वी नागिन (सुनील दत्त, संजय खान, फिरोज खान रेखा, रीना रॉय फेम), जानी दुष्मन (डझनावारी हीरो फेम) असे बरेच चित्रपट नाग / नागिणींच्या प्रतिशोधावर येउन गेले आहेत. या सगळ्या चित्रपटातले एक समान सूत्र असे आहे की हे सगळे चित्रपट नेहेमी मल्टिस्टारर असतात. (मल्लिका शेरावतचा हिस्स सोडुन.

सजदा..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 21/03/2011 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
माय नेम इज खान सिनेमातलं एक वेगळंच गाणं. सुफी संगीताची पार्श्वभूमी असलेलं.. (येथे ऐका) रोम रोम तेरा नाम पुकारे एक हुए दिन रैन हमारे.. मिश्र खमाज म्हणता यावा अशी गाण्याची खानदानी सुरवात. (चूभूदेघे.) 'सजदा..' ख्यालसंगीताची उत्तम बैठक असलेला राहत फतेचा आणि रिचा शर्माचा अविष्कार. आवाजाची जात, फेक ही सारी सुफी गायकीत जमा होणारी. सुरवतीची बोल आलापी संपल्यानंतर गाणं छानशी लय पकडतं.. तेरी काली अखियोसे जिंद मेरी जागे धडकन से तेज दौडू सपनो से आगे.. शब्द आणि त्यांचा लहेजा उत्तमच.. अब जा लुट जाए ये जहा लुट जाए..

मीपा करांची कविता.....

लेखक पियुशा यांनी सोमवार, 21/03/2011 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी पा करांची कविता कधी आहे मस्ती ,कधी धिंगाणा , तर कधी कधी राडा मीपा सदस्यांचा वाचते हो मी पाढा ............. ,धमाल मुलगा ,कमाल मुलगा काहीपण इचारा लगेच सांगणार उत्तर , मीपा चे आहेत हे जुने मास्तर ........... छोटा डॉन........ कायम बीजी असणारे हे व्यक्ती कुणावरही करत नाही बोलण्याची सक्ती ढवळ्या शेजारी बांधला पवळा.. वान नाही पण गुण लागला गप्प गप्प असलेला छोट डॉन पर्या सारखा गु लु गु लु बोलायला लागला जागु ,अमिता ,गणपा , मृणाल अन निवेदिता ताई , यांना रेसेपी बनविण्याची