Skip to main content

**** चांडाळ चौकडी ****

लेखक वपाडाव
शुक्रवार, 10/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
परवा, राजश्री मराठीच्या तुनळीवरील पोतडीत ढुंकुन पाहताना, चित्रपटाची लिंक गवसली. म्हटले चेपु-चेपु करण्याऐवजी, क्लासिक सिनेमा आहे बघावे दोनेक तास खर्ची घालुन. _____________________________________________________________ तर मंडळी चित्रपट आहे चांडाळ चौकडी.... चित्र : आंतरजालावरुन साभार... या चित्रपटाची कथा एका गावातील काही पात्रांच्या अवतीभोवती फिरते. अन्ना देशमुख (निळु फुले) व त्याचे इतर साथीदार यांच्या वाइट वर्तणुकीमुळे (हे साहजिकच) पुर्ण गाव त्यांना चांडाळ चौकडी म्हणुन ओळखुन असतो. सहसा कुणीही त्यांच्या वाट्याला जाण्यास धजावत नसते. चित्रपटाची सुरुवात होते ती एका गाण्यापासुन, ज्यात चित्रपटाची सहनायिका-अवसा, तिन्ही सांजेला, "बिगी बिगी चला" असे गाणे गात घरी परतत असते. वाटेत तिला अन तिच्या सोबत असलेल्या बायांना अन्नांचा एक माणुस अडवुन संध्याकाळी वाड्यावर येण्याचं अन्नांचं बोलावणं कळवतो. अवसा त्याला नकार देउन झिडकारते. ह्या घटनेचा अन्ना व त्यांच्या साथीदारांना राग येतो. त्याच रात्री अन्ना व सहकारी तिला उचलुन आणुन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्लॅन आखतात व ते यात यशस्वी होतातही. दुसर्‍या दिवशी अवसेची आजी बाहेर गेलेली असताना अवसा स्वत:ला पेटवुन घेते. आजी अन काही शेजारी गावच्या पाटलाची मदत मागायला जातात पण व्यर्थ. पाटील शेपुट घालुन बसतो. तालमीतील काही तरणी, जवान मुलं याविरुद्ध आवाज उठवतात पण अन्नाच्या बंदुकीपुढे कुणाचेही चालत नाही. उलटपक्षी अन्नाच ह्या सर्वांना खोट्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खाउ घालतो. तर असा हा अन्ना, वाटेल तेव्हा अन वाटेल तिची अब्रुची लक्तरे वेशीवर टांगत असतो. अन्ना एकदा शाळेत झेंडा फडकवण्यासाठी गेलेला असतो. तिथे त्याला समुहगान करत असलेली मुलगी (छबु) आवडते. छबु गावातील हरणाबाइची मुलगी असते. अन्ना छबुला दर शन्वारी घरी गाउन दाखवायला बोलावतो. अन तिच्या गाण्याबद्दल मासिक १० रु. शिष्यवृत्ती देण्याचे कबुल करतो. अन्नाच्या घरी छबुचे जाणे-येणे सुरु होते. ती गर्भार झाल्यावर तिचं स्वयंवर दामदुटीने तिच्याच गायन मास्तराशी लावुन देतो. इतकेच नाही तर अन्ना दबावतंत्र वापरुन लोकांच्या जमिनीही हुसकावत असतो अन त्यांच्या शेतातुन वाटाही बनवतो. त्यातील एक वाट आवडाआक्काच्या शेतातुनही जात असते. अन्नाला आवडाआक्का समजावुन सांगते. पण अन्ना काही ऐकत नाही. मग ह्या दोहोंमध्ये द्वंद्व लागते अन आपसुकच नायकाची एंट्री होते. (आवडाआक्काचं माहेर शेजारच्या गावी असते, तिचा नवरा हयात नसल्याने ती आपल्या भावाच्या घरी राहत असते. ह्या अन्नाच्या झेंगाटामुळे ती परत गावी येण्याचं ठरवते.) गावच्या जत्रेचे दिवस जवळ आलेले असतात. पंच व गावकरी, मुलं तुरुंगात असल्याने ह्या वर्षी जत्रा करायला नको या निर्णयाप्रत येतात. पण अन्नाचा ह्याला विरोध असतो. तो सर्वांकडुन अव्वाच्या सव्वा वर्गणी गोळा करुन जत्रेच्या काळात गावभर निव्वळ तमाशाचे फड उभे करवतो. इकडे आवडाक्काच्या शेतातुन बैलगाड्या नेणे सर्रास चालु असते. मग लोहबाजीराव (आवडाक्काचा मुलगा-यशवंत दत्त) व चांडाळ चौकडी नेहमीच एकमेकांना खुन्नस देण्याचा बहाणा शोधत असतात. पण लोहबाजीराव नेहमीच काही न काही क्लृप्त्या काढुन त्यांच्या समोरुन निघुन जातो. या दरम्यान लोहबाजीराव गावच्या दृष्टीने काही चांगली कामं करतो व गावकर्‍यांचा विश्वास संपादन करतो. तसेच याच्या घराशेजारी राहणार्‍या "सुगंधा"सोबत याचे तार जुळत असतात. एके दिवशी लोहबाजीराव बाजारात काही कामानिमित्त फिरत असतो. अचानक एक मारका बैल पळत सुटतो व रेटारेटीत लोहबाजीरावाच्या खांद्यावरील बंदुक निसटून त्यातुन एक गोळी जाउन अन्नाच्या छाताडात घुसते. अन्ना जागीच गतप्राण होतो. त्याच्या इतर तीन मित्रांना हा धक्का सहन होत नाही. अन ते लोहबाजीरावाचा काटा काढण्याचा प्लान बनवतात. इकडे पोलिस लोहबाजीरावाला खुनाच्या बदल्यात अटक करुन नेतात. आता, लोहबाजीराव तुरुंगातुन सुटुन येतो का? हे तिघे त्यांचा बदला घेण्यात सफल होतात का? सुगंधा अन लोहबाजीराव यांचं मिलन होतं का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर चांडाळ चौकडी पाहावाच लागेल. १९७८ च्या मानाने चित्रपट बर्‍यापैकी गतिवान आहे. सर्व घटना एकानंतर एक घडत असल्याने कुठेच संथ पडत नाही. प्रभाकर नायक यांचं दिग्दर्शन दमदार आहे. गीत-संगीत पुन्हा एकदा जगदीश खेबुडकरराम कदम या सुपरहिट जोडगोळीचे आहे. साजणा-साजणी नावाचे एक ड्युएट (मराठी ?), कळी गुलाबाची हे प्रेमगीत अन गेला गर्दीत मारुन धक्का ही लावणी एकदम मस्त. चित्रपटातील गाणी इथे ऐकायला मिळतील. अन संपुर्ण चित्रपट इथे बघायला मिळेल. तर मग मंडळी पाहणार की नै हा चित्रपट. ------------------------------------------------------------------------------------------------------- परीक्षण लिहिण्याची पहिलीच वेळ. समीरसुर अन फारएण्ड यांच्या सल्ल्यांच्या प्रतिक्षेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11824
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

चांगले कथाकथन केलेत. आवडले. मात्र चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही युट्युब वर असलेली फुकट प्रत शिफारस करत आहात. ते योग्य नाही. या चित्रपटाची प्रत विकत घ्या आणि पाहा असे आवाहन योग्य आहे. आपण मराठी लोकांनीच मराठी चित्रपट विकत नाही घेतले तर अजून कोण घेईल बरे? आणि ज्यांनी हा चित्रपट बनवण्याची मेहेनत घेतली त्यांना मोबदला कसा मिळेल?

In reply to by निनाद

ह्या चित्रपटाची तबकडी अजून विक्रिसाठी उपलब्ध आहे का???

In reply to by मी-सौरभ

तबकडी नक्कीच मिळत असणार. वर ५४ रुपये किंमत पण दिली आहे की... न मिळाल्यास फाउंटन म्युझिक कडे विचारणा करा, नक्की मिळेल... दुवा : http://fountainmusiccompany.com/category.asp?Type=3&Genre=Film&Language… मी मागे ठाण्याच्या आर मॉल मधून अनेक जुन्या चित्रपटांच्या तबकड्या घेतल्या होत्या...

पहिले चित्रपट परीक्षण आवडले.. पु.ले.शुभेच्छा..

परिक्षण आवडले रे वप्या. चित्रपट आधीही पाहिलेला होताच. निळू फुलेच्या अभिनयाबद्दल तर बोलायलाच नको. शेवट सुखांत होणारा टिपिकल ग्रामीण बाजाचा मराठी चित्रपट.

छान प्रयत्न. जम्याच रे तुझको. निनाद यांच्या मताशी किंचित असहमत. सदर लेखात लेखकाने कुठेही चित्रपटाची सीडी/डीव्हीडी विकत घेऊ नका व फक्त तुनळीवरच पहा असे म्हणलेले नाही. त्यामुळे कुठलीही शिफारस केल्याच्या आपल्या वाक्याचे खंडन आपोआप होत आहेच. ज्यांना मराठी चित्रपट पाहण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध नाही त्यांनी काय करावे बरे? चित्रपट पाहणे व त्याचा आस्वाद घेणे बंद करावे काय?

In reply to by अन्या दातार

शिवाय सदर लेखक हा सध्या पर्भणीत असल्याने तिथे त्याला ह्या चित्रपटाची सीडी/डिव्हीडी/ब्लू रे मिळणे पण दुरापास्त आहे.

In reply to by स्पा

शमत आहे. उत्तम प्रयत्न. असं अचानक ग्रामीण बाजाच्या चित्रपटाबद्दल आवर्जून लिहीलंस म्हणजे नक्कीच गावाची आठवण सतावत असणार. ;-)

In reply to by यकु

गावाची आठवण ..??? यकु तुला माहित नाही पण "गावा" वरून एक फर्मास किस्सा झाला होता वप्या बरोबर. काय वप्या, (महानगरपालीका असलेल्या) गावाची आठवण जास्त येते आहे का..? अधिक माहिती साठी संपर्क, धन्या, किसन व दस्तुर्खुद्द - वप्या. ;-)

In reply to by अन्या दातार

ज्यांना मराठी चित्रपट पाहण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध नाही त्यांनी काय करावे बरे? येथे पाहा मोझर बियरवर चित्रपट विकत घेता येतात. तेथून ऑनलाईन तबकडी विकत घेता येईल... http://www.moserbaerhomevideo.com/browsebyinterest.htm?keyid=1&langid=8 शिवाय झालेच तर मायबोली आहे http://kharedi.maayboli.com/shop/Marathi-Movies/

चांगले कथाकथन केलेत. आवडले.पण,,,,,,,, तेवढे पुढिल दोन प्रकार कसे करतात ते कळले तर बरे ............ ती गर्भार झाल्यावर तिचं स्वयंवर दामदुटीने तिच्याच गायन मास्तराशी लावुन देतो. इतकेच नाही तर अन्ना दबावतंत्र वापरुन लोकांच्या जमिनीही हुसकावत असतो

ग्रामिण राजकारण आणि तत्सम ह्यावर आधरित असलेला निळू फुले ह्यांचा चित्रपट म्हणुन फार अपेक्षेने अगदी हुडकुन हुडकुन पाहिला होता. पण चित्रपट बरा होत एवढेच म्हणु शकतो. निळूभाउंची अ‍ॅक्टिंग सोडलीतर चित्रपटात फारसे काही इतर उरत नाही. - छोटा डॉन

पहिलाच परीक्षणाचा प्रयत्न असुनहि छान जमलंय.... शिवाय हा एक स्तुत्य उपक्रम आहे असं मला वाटतं... मराठी चित्रपट व नाटकांचे परीक्षण अल्याने कदाचित मराठी कलेचाहि प्रसार होईल...त्यातल्या त्यात मराठी जुने चित्रपट पहायला मजा येते... ते गावा़कडचे वातावरण, ति संस्कृती आणि शिवाय त्या काळचे दिग्गज कलाकार ह्याचंहि त्या निमीत्ताने दर्शन घडतं... :) (कधी कधी जुन्या चित्रपटांमधील कलाकरांचा 'अतिशययोक्ती'अभिनय व मुळातच चित्रपटाची कथा हे ही पहायला मजा येते... काहिही चालु असतं : P)

वा वा.. भलता मनोरंजक असणार हा चित्रपट. निळू फुले, राघवेंद्र कडकोळ यांच्या चेहर्‍यावरचे त्या फोटो-पोस्टरमधले भाव बघूनच खूप हसू आलं आहे. "पाखरु" वगैरे असा तरुण मुलीचा उल्लेख करुन बोलणारा फरकॅपवाला गावचा (चित्रपटातला स्पेशल) पाटील डोळ्यासमोर आला. वप्याने वर्णन केलेल्या या "रात्री वाड्यावर बोलावण्या"वरुन असलेली मृत्युंजयची अफलातून प्रतिक्रिया इथे: http://www.misalpav.com/node/15483#comment-259859 आणि मराठी सिनेमाच्या या कालखंडावरुन समीरसूर यांनी पूर्वी प्रतिक्रियेत लिहिलेला धमाल मजकूर आठवला. मूळ धाग्यापेक्षा प्रतिक्रिया धमाल झाली होती... ती इथे वाचता येईल : http://www.misalpav.com/node/15483#comment-260009

चित्रपट नाही पाहीलाय, पण ही कथा वाचली होती शंकर पाटलांच्या एका पुस्तकात.. त्यात ती गर्भार पोरगी गायनमास्तराच्या गळ्यात टांगण्याची घटना होती.. बघायला लागेल हा चित्रपट.. परीक्षण बर्‍यापैकी जमलंय की हो पाटील..

In reply to by चिगो

ही कथा वाचली होती शंकर पाटलांच्या एका पुस्तकात....
जेव्हापासुन चित्रपट पाहिला होता, हाच विचार करत होतो की कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय... धन्यवाद चिगो...

पहिलाच प्रयत्न स्तुत्य आहे. :) डान्रावांशी सहमत आहे. चित्रपट तसा टिपिकल ग्रामिण तमाशापट लाटेतला आहे, मात्र कथा तशी दमदार आणि निळूभाऊंचा अभिनय या मुख्य जमेच्या बाजू असल्याने एकदा बघण्याइतपत तर नक्कीच आहे. बाकी प्रताधिकारावरूनची चर्चा अनाठायी आहे या चित्रपटाच्याबाबतीत. युट्युबवर हा चित्रपट स्वतः 'राजश्री'नेच उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्याकडे या चित्रपटाचे संबंधित हक्क असावेत, त्याशिवाय हे असे आंतरजालावर उपलब्ध करून देणे घडले नसते. शिवाय, तिथे काही जाहिरातीही दिसत आहेत. त्याचे पैसे मिळतच असतील. मग वर उल्लेख केलेली सगळीच मतं गैरलागू ठरत नाहीत का?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका, सहमत आहे... थोडंसं अजुन सांगतो... चित्रपटाच्या सुरुवातीला सेन्सॉर बोर्डातुन चित्रपट सहीसलामत पास झाल्याचे सर्टीफिकेट मिळते. त्यावरच त्याच्या बाजारीकरणाचे हक्क किती दिवसांकरिता असावेत हे ही लिहिलेले असते. पुर्वी लोक १०-१५ किंवा २० वर्षांसाठी ते हक्क राखुन ठेवायचे. सध्या हा काळ सरसकट २० वर्षांचा करण्यात आला आहे. म्हणुनच नवे चित्रपट दाखवायला दुरदर्शनची पंचाइत व्हायची/आजही होते. पण त्यादरम्यान जर चित्रपट दाखवायचा असेल तर वितरकाशी बोलुन, योग्य तेवढे पैसे मोजुन हे करता येते. ह्या चित्रपटाची मुदत १९८८ ला संपते. त्यामुळे त्यानंतर फुकट खाजगीतही ह्या प्रिंट्स कुणी वाटल्या तर काही प्रॉब्लेम नाही. राजश्री फक्त १००-५० रु देउन ती प्रिंट लोकांना सुविधा म्हणुन एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देते. त्यातुन तुनळी त्यांना पैसे देत असेल तर म्हैत नाही. यात काही कमी-जास्त असेल तर चु.भु.दे.घे.

In reply to by वपाडाव

माहिती बद्दल धन्यवाद ! वरील आक्षेप मागे हे वेसानल ;) पण मग ६० वर्षे मर्यादेचा प्रताधिकार कायदा येथे गैर लागू ठरतो का? कोण कुणाला सुपरसीड करते?

In reply to by निनाद

ह्याबद्दल सध्या जरा शोध घेतो आहे. आणि जसजशी महिती मिळत जाइल एकेका शंकेचं निरसन करत जाइन. बरीचशी माहिती माझ्याकरिताही नविन आहे. इतर कुणाला याबद्दल माहिती असेल तर त्यांनी प्रकाश टाकावा.

परिक्षण वाचून मन आपोआपच श्वेतधवल जमान्यात पोचले. लहाणपणी निळू फुलेंचा किती राग यायचा..... आया बाया बोटे मोडायच्या निळूभाऊंना.......पण आता कळ्ते की खरा कलावंत म्हणजे निळू फुले.... गविंना खुप धन्यवाद, जुना धागा वर काढल्याबद्द्ल........एखादं घबाड मिळाल्यासारखे सगळं वाचून काढ्ले. त्यात सांगत्ये एका चा सकाळ मध्ये प्रकाशित झालेला धागा मिळाला. माझ्या आईचा व कै. वडिलांचा अत्यंत आवड्ता सिनेमा आहे/होता. दूरदर्शनला कुठ्ला सिनेमा लागला अन कुणी विचारले त्याचे नाव विचारले की ते गमतीने म्हणायचे "सांगत्ये एका". तसेच बुगडी माझी....मधे साता-याचा उल्लेख असल्याने खूप अभिमान वाटायचा त्यांना. असे धागे नेहमी येउ द्या.

In reply to by स्वातीविशु

पण आता कळ्ते की खरा कलावंत म्हणजे निळू फुले
होच्च मुळी. दोनेक वर्षांपुर्वी जेव्हा गोष्ट छोटी xxxx पाहिला अन कळाले की निळु फुले गेले तेव्हा आपोआपच डोळे भरुन आले. (जे की लक्ष्याच्या वेळेस झाले नाही) आत्ता, लडच लावलीये कृष्णधवल सिनेमांची (७०-८० चा काळ). रोजचा एक पाहण्याचा ठरवलंय... अन तेही मराठी... बघुयात या पठडीतील सिनेमे किती आवडतात ते...

In reply to by प्रचेतस

सामना: मास्तर, असले प्रश्न सारखे सारखे विचारलेलं आवडत नाही आम्हाला सिंहासनः नव्या मुख्यमंत्र्याला मी मंत्रालयासमोर जोड्याsने मारेन ही २ वाक्ये अखंड चित्रपटात भाव खाऊन जातात राव. बास, पुढे बोलवत नाही.

In reply to by प्रचेतस

@सामना आणि सिंहासन जरुर बघ रे वप्या>> पूर्ण अनुमोदन...आणी आम्ची भर--गारंबीचा बापू,शेजारी,तांबडी माती

In reply to by अत्रुप्त आत्मा

गारंबीचा बापू अपवाद हो भटजी. श्री.नां.च्या सुरेख कादंबरीची वाट लावलीय ह्या चित्रपटानं (जरी काशिनाथ घाणेकरांसारखा सशक्त अभिनेता असला तरी) असं आमचे प्रांजळ मत. :)

In reply to by प्रचेतस

@श्री.नां.च्या सुरेख कादंबरीची वाट लावलीय ह्या चित्रपटानं>>> खरच...:-( सालं वाचायला पाहिजे कादंबरी... मला वाचायला द्या प्लीज...

निळु फुलेंना मानाचा मुजरा !!
असा खलनायक मराठी सिनेमाला मिळणे, केवळ अशक्य. या सम हाच. न कळणा-या वयातसुद्धा कृष्णधवल सिनेमे खोल ठसा ठेवून गेले आहेत.:smile: शेजारी, माणूस, संत तुकाराम, सांगते एका, इ. इ. (अजून बरेच आहेत, नावे आठवत नाहीत.:sad:) ते आधीच आवडून गेले आहेत. :smile: पु. ले. शु.

हा सिनेमा नवीन होता तेव्हा आम्ही अशा सिनेम्यांची फक्त टिंगलच करायचो. आता णॉस्टेल्जिक म्हणून आवडतो की काय बघायला पहिजे. (वप्याने परीक्षण लिहून आमची विकेट काढली आहे. मला शीर्षक वाचून जरा भीती वटली होती, की मिपावरच्या कोण्या चौकडीबद्दल लिहिलय की काय म्हणून!)

In reply to by पैसा

मला शीर्षक वाचून जरा भीती वटली होती, की मिपावरच्या कोण्या चौकडीबद्दल लिहिलय की काय म्हणून!
पैसातै, हा प्रतिसाद तुमचा नसता तर... 'चोराच्या मनात चांदणे' साठी एक चांगला दाखला मिळाला असता.... ;)

बघावं म्हन्तोय पिच्चर.(हे वाक्य खास निळुभाउंच्या ष्टाय्लित वाचावं) बादवे, त्यांच्या खरोखर आवडलेल्या भूमिका योगायोगाने श्रीराम लागूंसमोर त्यांनी तोडिस्तोड पात्र म्हणून उभ्या केलेल्याच आहेत. "सामना" मधील स्वतःला राजा समजणारा सत्तंध हिंदुराव, सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेला "सिंहासन" मधील एक त्रयस्थ निरिक्षक पत्रकार, "पिंजरा" मधील तमाशाच्या फडात वाहून आलेला कारभारी अशा एकाहून एक भूमिका त्यांच्या आमच्या लक्षात आहेत. पण ह्या सर्वाहून खास म्हणजे "सातच्या आत घरात" मोजून पाच मिनिटेही नसलेला रोल कस्ला रंगवलाय ह्या "डोणजे पाटलांनी". असो. तर ह्यांच्यासाठी तरी शिनुमा पहावाच लागणार.

व.प्या . चित्रपट परिक्षण छान आहे पण माझ्याकडुन तरी मराठि चित्रपट जास्ती पाहिले जात नाहित काही छान अपवाद सोड्ले तर :)

परिक्षण आवडले आहे रे वप्या, निळू फुले यांच्याबद्दल काय बोलणार ? त्यांचा 'बाई सांच्याला या आमच्या वाड्यावर' असं म्हणणारा बेरकी पाटील पहिला कि डोळे जुन्या आठवणींनी पाणावतात. - मालोजीराव जगदाळे पाटील

पुढील वेळेस याहुन चांगला चित्रपट व याहुन चांगले परीक्षण लिहिण्याचा प्रयत्न केला जाइल... कृष्णधवल शिनुमाला अग्रक्रम देण्यात येइल... जय महाराष्ट्र... जय मराठी...

In reply to by वपाडाव

सामना किंवा सिंहासन यापैकी कुठल्याही किंवा दोन्ही शिनुमांचे परीक्षण लिहावे अशी मा. वपा यांना जाहिर विनंती करणेत येत आहे.

In reply to by प्रचेतस

घरगुती पुणेरी: बोंबला!! हा वपाडाव, सामना चं परीक्षण? अरे पंचनामा म्हण... जाहीर पुणेरी: मा. श्री. वपाडाव हे आमचे सन्मित्र. यांना चांगले चित्रपट बघून आपल्या पर्यंत पोचवण्याचा छंदच जडला आहे. (पर्भणीत वेळ जात नसेल, हे मनात बरं का) त्यांनी या लेखमालेतले पुढले पुष्प लवकरच सादर करावे अशी नम्र विनंती आहे.

In reply to by प्रचेतस

हे शिवधनुष्य मला पेलवेल की नाही याबाबत जरा साशंकच आहे, पण प्रयत्न करुन बघितल्या जाइल. आपल्या विनंतीला मान देउन...

In reply to by वपाडाव

एकट्यानेच पेलले पाहिजे असे काही नाही. शक्य तेवढी मदत करण्यात* येईल. :) *तुम्ही मागितल्यास, व आमचा मूड असल्यास ;)