शिवरात्र-नरहर कुरुंदकर...
आज मनात आलं,मी तर तात्विक अर्थानं काही धार्मिक उरलेलो नाही.त्यामुळे आज मी काही कुठे स्वतःसाठी शिवरात्री निमित्तानं स्वतः शंकराची पूजा उपासना वगैरे करायला बसणार नाही.पण असं असलं तरी व्यावहारिक अर्थानं अश्या दिवशी काही चांगलं करावं,असं वाटण्या इथपर्यंत मी धार्मिक आहेच...मग काय करायचं..?
झटकन लक्षात आलं,की आपण जर का शिवरात्र या दिवसाचा एक चांगला अनुषंग मनात ठेवत आहोत.तर नरहर कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकाची आपल्याला जमेल तशी ओळख का करवुन देऊ नये...? अलिकडेच सागर यांनी कुरुंदकरांचं एक पुस्तक वाचकां समोर ठेवलच आहे. तसाच माझाही हा एक अल्पमती प्रयत्न....
शिवरात्र-नरहर कुरुंदकर...
तर ओळख करुन घेऊया शिवरात्र या पुस्तकाची...कुरुंदकरांनी प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे हे पुस्तक म्हणजे त्यांनी लिहिलेल्या राजकिय लेखांचा संग्रह आहे.एकंदर नऊ लेख या पुस्तकात आहेत...
१)श्री.गोळवलकर गुरुजी आणी महात्मा गांधी...
हा लेख, गोळवलकर गुरुजी आणी संघ परिवार यांनी गांधिजिंना ज्याकाळी प्रातःस्मरणीय राष्ट्रपिता म्हणण्यास सुरवात केली त्यावेळच्या परिस्थितीचे आकलन करवुन देणारा आहे.यात कुरुंदकर असे दाखवुन देतात की, गोळवलकर व संघ परिवाराला गांधीना प्रातःस्मरणीय.राष्ट्रपिता असे म्हणण्याचा अधिकार आहे..पण ते तसे का म्हणत आहेत? तर त्याकाळची एक राजकिय सोय म्हणुन...! जनता ज्या ज्या व्यक्तिंना/घटनांना आपलं मानते,त्या त्या व्यक्ति घटनांना-आपला आदर्श म्हणुन घोषित करणारे,तिच्यावर आपला हक्क सांगणारे-लोक/पक्ष/प्रवाह स्वतः तसे वागतात काय..? याचा परामर्श या लेखात घेण्यात आला आहे... एकेकाळचे गांधीविरोधक आज गांधिंचे भक्त का बनत आहेत..? हा त्यातला मुख्य मुद्दा आहे...
२)गोळवलकर गुरुजी आणी चातुर्वण्य...
हा लेख गोळवलकरांच्या चातुर्वण्य भक्तिचे चहुबाजुनी बिंग फोडणारा लेख आहे...एखाद्या राष्ट्रीय म्हणवल्या जाणार्या संघटनेचा नेता कोणकोणत्या पातळीवर आणी किती दांभिक असू शकतो....तसेच तो असे का वागतो,त्या मागची गरज काय आसते..? अश्या अनेक मुद्यांना कुरुंदकारांनी त्यांच्या साध्या सोप्या आणी संयमित शैलीने उत्तरे दिली आहेत...किंबहुना गोळवलकर गुरुजी संघ परिवार आणी चातुर्वण्य या तिनही गोष्टी म्हणजे परंपरानिष्ठ असलेल्या हिंदू समाजावार पसरलेला दंभाचा केवढा मोठ्ठा मुखवटा आहे...हे या लेखातुन अतिशय उत्तम व मार्मिकतेने समजते
३)गांधीहत्या आणी मी...
हा लेख,गोपाळ गोडसे यांनी लिहिलेल्या गांधीहत्या आणी मी... या पुस्तकाचा टिकात्मक परामर्श आहे...यात गोपाळ गोडसेंनी अनेक खोट्या आणी दिशाभूल करणार्या घटना,तसेच मुद्दाम संदेह निर्माण करुन ठेवणार्या गोष्टी/विधानं कशी घातली आहेत,हे कुरुंदकरांनी अत्यंत तपशिलवार पद्धतीने दाखवुन दिले आहे.
४)खान अब्दुल गफारखान...
खान अब्दुल गफारखान म्हणजे ज्यांना इतिहास सरहद्द गांधी म्हणुन ओळखतो ते...खरोखरच सरहद्द गांधी हे नामाभिधान सार्थ केलेलं हे व्यक्तिमत्व होते.यांची एकुणात कारकिर्द,वाटचाल या लेखात आपणाला वाचायला मिळते...
५)मौलाना आझादःएक स्मरण...
हा लेख म्हणजे मौलानांच्या भक्तिचा उत्कट पोवाडा नाही,तर मौलाना काय होते हे त्यात कळतेच.पण त्यांच्या अखंड भारताच्या एकंदर भुमिकेचा परामर्शही त्या अनुषंगानी कुरुंकरांनी यात घेतला आहे. मौलाना आझादांनी तफासिरुल कुराण नावाचे जे कुराण भाष्य लिहिले,त्याचा सगळ्याच इस्लामी/इस्लामेतर धर्मपंडितांवर कसा व कितिसा प्रभाव पडला हे या लेखात आपल्याला प्रामुख्यानी वाचायला मिळते.
६)अच्युत पटवर्धनांच्या सहवासात एक दिवस...
हा लेख ''भारतीय समाजवादी पक्षा''च्या संस्थापकांपैकी एक असलेल्या अच्युत पटवर्धनांविषयीचा आहे...एकंदरितच भारतीय समाजवादाची सुरवात,त्यातील टप्पे/भ्रमनिरास/सत्य/आकलन हे सगळे या लेखात आले आहे.
७)आधुनिक भारतीय राजकारणात मुसलमान...
भारतीय राजकारणात मुस्लिम प्रश्न हा खरा,म्हणजे पूर्णतः अल्पसंख्यांकांचा प्रश्न नाही,तर तो एक बहुसंख्यांकांच्या हिशोबात विचारात घेण्याचा प्रश्न आहे...हे सत्य अतिशय वस्तुनिष्ठपणानी या लेखात मांडण्यात आलेलं आहे.विशेषतः त्याकाळापासुन ते आजतागायतही मुस्लिम प्रश्न समजुन घेण्यात घडलेल्या चुका/मुद्दाम केली डोळेझाक इत्यादी मुद्द्यांवर स्वच्छ प्रकाश टाकण्याचं काम हा लेख करतो...
८)मुसलमानांच्या विचारासाठी काही प्रश्न...
हा लेख म्हणजे,,,१९६८ साली डिसेंबर महिन्यात नांन्देडला जमाते इस्लामीचं जे अधिवेशन झालं होतं,त्यात- ''राष्ट्रीय ऐक्य'' या विषयावर झालेल्या परिसंवादात मुस्लिम जनसमुदाया समोर दिलेलं भाषण आहे...यात प्रामुख्यानी मुस्लिम जनतेचं प्रबोधन तर आलेलं आहेच,तसेच त्यांना त्यांच्याच नेत्रुत्वाविषयी/धर्माविषयी विचार करायला भाग पाडणारं असं हे भाषण आहे...यात कुरुंदकरांनी उपस्थित मुस्लिम समुदायाला एक अतिशय मार्मिक प्रश्न विचारला आहे...''तुंम्हाला जर तुमचा मुसलमान असण्याचा हक्क प्रामाणिकपणे मान्य असेल,तर तेवढ्याच प्रामाणिकपणे माझा मुसलमान नसण्याचा हक्क तुंम्ही मान्य केला पाहिजे(तो तसा तुंम्ही कराल काय..?)...पुढे या आवाहन केलेल्या विषयाच्या अनुषंगानी सगळी साधक/बाधक चर्चा आलेली आहे... (हा लेख जरी दिसायला खासकरुन मुस्लिम जनतेसाठीचा दिसत असला,तरी मुस्लिमेतर जनतेनी,विशेषतः स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणार्या प्रत्येकानी तो अवश्य वाचला पाहिजे असे मला वाटते..)
९)श्री.बनातवाला यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने...
हा लेख म्हणजे बनातवालां सारखे मुस्लिम नेते राजकीय जिवनात स्वतःला आणी जनतेला कायम दुटप्पी वागुन कसे फसवतात,याचं उत्तम चित्रण आहे...स्वतःला राष्ट्रीय उदारमतवादी म्हणवणारे अनेक नेते राजकीय जिवनात कश्या दुटप्पीपणाच्या भुमिका घेऊन वावरतात हे तर या लेखातुन कळतेच पण त्यांच्या लबाडीचा आणी दांभिकतेचा खरा अर्थही या लेखात नीट आकलन होतो...
आता या नऊ लेखांचा संग्रह असलेले शिवरात्र हे पुस्तक माझ्या आवडीचे का झाले..?तेही थोडक्यात नोंदवतो...कुरुंदकरांच्या सर्व पुस्तकांपैकी हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचले...त्यापूर्वी धर्मकारण/समाजकारणातले अनेक विषय वाचुन मी बर्यापैकी तयार झालेलो होतो...आणी आधुनिक/विज्ञाननिष्ठते कडची वाटचालही हळुहळू सुरु झाली होती,पण कोणताही माणुस मुळात काय आहे..? यावरुनच तो पुढे कोणत्याही प्रांतात-गेला तरी काय होइल..? हे ठरत असते... आंम्ही पहिले कट्टर धार्मिक,त्यानंतर पुढे स्वतःची गरज म्हणुन जरी आधुनिक व्हायला गेलो,तरी मुळ पिंड कट्टरपणाचा होता तो तसाच ठाम होता...पण या पुस्तकाची जशी/जशी माझ्या हातुन पारायणं घडली आणी कुरुंदकरांची बाकीचीही पुस्तक वाचली गेली तसा मला पहिला साक्षात्कार झाला तो हा,की मी तात्विक दृष्ट्या कर्मठ/धार्मिक असलो काय...आणी नसलो काय..? व्यावहारिक दृष्ट्या मी कुठेच कर्मठ/धार्मिक असता कामा नये. याभुमिकेचा जसजसा प्रभाव माझ्यावर पडत गेला तसतशी माझी कुरुंदकरांच्या पुस्तकांशी आधिकाधिक दोस्ती जमायला लागली.आता तर कुरुंदकर नावाचा हा माझा दोस्त माझ्या छोट्याश्या आयुष्याचा अविभाज्य/उपकारक भाग होऊन राहिलाय... असो...आंम्ही कुरुंदकरांचे फ्यान आहोतच,तुंम्हीही व्हाल ही अपेक्षा... :-)

वाचने
18905
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
समयोचीत लेख पण अजून विवेचन
In reply to समयोचीत लेख पण अजून विवेचन by पाषाणभेद
अजून विवेचन हवे होते. १००%
In reply to अजून विवेचन हवे होते. १००% by अन्या दातार
सहमत
In reply to सहमत by पैसा
अनेक प्रतिसादकांच्या म्हणण्या
In reply to अनेक प्रतिसादकांच्या म्हणण्या by अत्रुप्त आत्मा

यातला प्रत्येक लेख एकेका स्वतंत्र विवेचनाच्या व्याप्तीचा आहेच !
In reply to अनेक प्रतिसादकांच्या म्हणण्या by अत्रुप्त आत्मा
लवकर लिहा
In reply to अनेक प्रतिसादकांच्या म्हणण्या by अत्रुप्त आत्मा
चालू केले आहे का
In reply to अजून विवेचन हवे होते. १००% by अन्या दातार
@तसेच या पुस्तकाला शिवरात्र
छान परिचय... बाकी शिव रात्र
उत्तम परिचय भटजी.
वरील सगळ्यांशी सहमत. संघाचा
वाचावेसे वाटते आहे...
मस्त ओळख करुन दिली आहे. मी
In reply to मस्त ओळख करुन दिली आहे. मी by यकु
@मी मात्र कधीही कुरुंदकरांची
In reply to @मी मात्र कधीही कुरुंदकरांची by अत्रुप्त आत्मा
परागसर विषय अप्रिय आहे असं
In reply to परागसर विषय अप्रिय आहे असं by यकु
.

आपण सत्ययुगाकडे वाटचाल करत आहोत
In reply to आपण सत्ययुगाकडे वाटचाल करत आहोत by राजघराणं
आशावाद वाईट नाही.
In reply to आपण सत्ययुगाकडे वाटचाल करत आहोत by राजघराणं
रोचक प्रतिसाद. मनापासुन आवडला.
In reply to आपण सत्ययुगाकडे वाटचाल करत आहोत by राजघराणं
प्रतिसाद
In reply to मस्त ओळख करुन दिली आहे. मी by यकु
मी मात्र कधीही कुरुंदकरांची
In reply to मी मात्र कधीही कुरुंदकरांची by मराठी_माणूस
कुरुंदकरांची पुस्तके वाचणं
सुंदर परिचय
भन्नाट..
कुरुंदकरांच्या आणखी काही
"शिवरात्र" ची सुंदर ओळख
In reply to "शिवरात्र" ची सुंदर ओळख by सागर
थँक्यू सागर, अता पहिल्या
In reply to थँक्यू सागर, अता पहिल्या by अत्रुप्त आत्मा
भेटू रे लवकरच
पुस्तक परिचय आवडला
In reply to पुस्तक परिचय आवडला by सुधीर
धन्यवाद
नुकतच शिवरात्र वाचलं
ह्या लेखमालेचे पुढे काय झाले?
In reply to ह्या लेखमालेचे पुढे काय झाले? by यशोधरा
@जागरबद्दल पण लिहिणार का? >>>
पुस्तक वाचलं आणि आवडलं!
धुळे येथील ' राजवाडे संशोधन
संघाबद्दलचे कुरुन्दकरांचे
In reply to संघाबद्दलचे कुरुन्दकरांचे by विटेकर
विटेकर दोनच बेसिक प्रश्न