मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

वार्तालाप: जाणण्याचे विज्ञान

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जाणते लोक ते शहाणे. नेणते वेडे दैन्यवाणे. विज्ञान तेही जाणपणे. कळो आले. समर्थ म्हणतात सतत ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणारे लोक शहाणे असतात. जे लोक काहीही जाणण्याचा प्रयत्न करत नाही, अज्ञानी आणि आळशी असतात. त्यांना समर्थांनी नेणते म्हटले आहे. नेणते लोकांच्या नशिबी फक्त दुःख आणि दारिद्र्य येते. समर्थ पुढे म्हणतात विज्ञान हेही जाणण्यामुळे कळू लागते. जाणण्याचे विज्ञान म्हणजे काय हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते. समर्थानी श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसे सिद्ध करावे याचे मार्गदर्शन केले आहे.

‘यू’ का ‘नॉन-यू' ? : एक इंग्लिश भेदभाव

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आणि का आनि? पुष्कळ का लई? होतं की व्हतं? किल्ली का चावी? वॉशर का वायसर? वस्तू मिळते का भेटते? ?......... ही यादी आपल्याकडे कितीही वाढवता येईल. यातला कळीचा मुद्दा वाचकांच्या लक्षात आला असेल - संभाषणात प्रमाणभाषा की बोलीभाषा ? आपल्या महाराष्ट्रात प्रमाणभाषा हीच जवळपास बोलीभाषा असणारा तथाकथित उच्चवर्ग एका बाजूस आणि प्रमाणभाषेशी काहीसा फटकून वागणारा आणि आपापल्या बोलीभाषेवरच जिवापाड प्रेम असलेला सामान्यवर्ग दुसऱ्या बाजूस, अशी एक भाषिक विभागणी पूर्वापार झालेली आहे; आजही ती कमीअधिक प्रमाणात जाणवते.

पीएनामा: झाडाची फांदी आणि एसीआर

विवेकपटाईत ·
लेखनप्रकार
(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे) (ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) . त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची.

ओपनहायमर नोलन‌ कलाकृती

Bhakti ·
लेखनविषय:
D यापुढे ओपनहायमर -नोलन हे नाव पुरे आहे सिनेमांच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासाठी. अमेरिकन प्रोमिथियस: द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपेनहायमर हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जे.

छंद बायकोचा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(काल्पनिक कथा) मैफिल वसंतोत्सव अंकात प्रकाशित ऋचा मायी लिखित कथा वाचत होतो. फावल्या वेळात: बायकोने छंद जोपासला. नवऱ्याला हिरा सापडला. अंगणी वर्षाव झाला नोटांचा. तिचा छंद व्यवसायात बदलला. हीरे-मोत्यांचे दागिने तिने अंगावर घातले. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानी झालें. साठा उत्तराची कहाणी सफल व सुंदर झाली. मनात विचार आला, अरे ऋचा ३६ वर्ष आधीहि कथा लिहिली असती तर माझ्या सौ.ला एखाद छंद जोपासायला म्हंटले असते. तिचा फावला वेळ 'सास-बहू' पाहण्यात व्यर्थ गेला नसता. ऋचा, फार अन्याय केला तू माझ्यावर.

जीऐ मराठीतील मैलाचा दगड - जन्म शताब्दी वर्ष

कर्नलतपस्वी ·
लेखनप्रकार
दिव्याचे तेज, डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे? माझी उन्हे मावळली आहेत माझी फुले कोमेजली आहेत कालचा प्रकाश कालचा सुवास मात्रा वेलांटीत शोधीत आहे शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे? आजची फुले आजच्या उन्हात पाखरांचा शब्द पिकला रानात माझी कविता तिथे वाचा जिथे ती दिनरात घडत आहे शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे? वा.रा कांत शतकवीर फक्त क्रिकेट मधेच नसतात तर इतर प्रांतातही आसतात.असेच एक साहीत्य क्षेत्रा

तुका आकाशाएवढा (ऐसी अक्षरे ...मेळवीन-११)

Bhakti ·
लेखनप्रकार
मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती. तुकोबांचे बालपणीचे मित्र संतू तेली जनागडे यांनी मित्रा बरोबरीचे बहुमुल्य क्षण आठवणीच्या रुपात सांगितले आहे असे लेखण यात आहे.

पावसाळी भटकंती - कमळगड

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपाकरांसोबत पावसाळी भटकंती - कमळगड मिपाकरांसोबत आता भटकंतीचे योग जुळुन येणे दुर्मिळ होत चालले आहे . बहुतांश लोकं आपापल्या व्यापात , संसारात मग्न आहेत , काहींची वयं झाली , काही राज्याबाहेर गेले , काही देशाबाहेर गेले , काही मनाबाहेर गेले. त्यामुळे आता जास्त फिरणं होत नाही , झालं तरी लिहिणं होत नाही . लिहिलं तरी कधी काय सेन्सॉर केले जाईल ह्याची शाश्वती नाही . प्रवासवर्णन भटकंती वगैरे तर नाहीच नाही ! बाकी माझं आपलं एक वैयक्तिक मत आहे की भटकंती किंव्वा प्रवासवर्णन कसं असलं पाहिजे की आपलं लेखन वाचुन , फोटो पाहुन इतरांना वाटलं पाहिजे की यार हा ट्रेक करायला हवा , ह्या ग्रुप सोबत आपण जायला हवं .

मेघदूत..... (ऐसी अक्षरे ..मेळवीन -१०)

Bhakti ·
लेखनविषय:
आषाढस्य प्रथमदिवसे-महाकवी कालिदास जन्मदिवस कसं होत आठवीत गेल्यावर अ तुकडीला संस्कृत विषय मिळायचा.मधाळ वाणी,स्पष्ट उच्चार असणाऱ्या विद्यार्थिनांना अग राणी अस लाडिक बोलावणाऱ्या कर्वे बाईंच्या तासाला मी मंत्रमुग्ध होऊन जायचे.त्यामुळे संस्कृतची गोडी,आदर निर्माण झाली पण पाठांतर आणि माझा ३६ चा आकडा असल्याने मार्कात उजेड पडला नाही.पण कालिदास या संस्कृत भाषेतला एक महान कवी आहे हे बाईकडून समजले.तो इतका महान होता की त्याने चक्क ढगाला दूत करून दूर निरोप धाडले,वाह काय भारी वाटायचं.त्यामुळे सातवी की आठवीला चित्रकलेत ‘गणपती उत्सवातीईल आरास’ यासाठी ‘कालिदासाचे मेघदूत गायन ‘ असा देखावा असणारे