Skip to main content

आरोग्य

‘इ’ जीवनसत्व : जरा ‘इ’कडेही लक्ष द्या !

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 26/07/2018 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
वैद्यकाच्या इतिहासात जीवनसत्वांचे शोध क्रमाने लागत असताना १९२२मध्ये ‘इ’चा क्रमांक लागला. सुरवातीस ते निरोगी प्रजोत्पादनास आवश्यक असावे असा तर्क होता. नंतर ‘इ’ हे एकच रसायन नसून ८ रसायनांचे एकत्र कुटुंब आहे असे लक्षात आले. तरीसुद्धा त्याचे शरीरातील नक्की कार्य समजत नव्हते. त्यावेळेपर्यंत अ, ब, क आणि ड या जीवनसत्वांचे कार्य व्यवस्थित समजले होते आणि त्यांच्या अभावाने होणारे विशिष्ट आजारही प्रस्थापित झाले होते. ‘इ’च्या अभावाचा विशिष्ट आजार मात्र संशोधकांना जंग जंग पछाडूनही सापडत नव्हता.

ब-१ जीवनसत्व : ऊर्जानिर्मितीचे गतिवर्धक

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 19/07/2018 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनसत्वांच्या ‘ब’ गटात एकूण ८ घटक आहेत. ती सर्व पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. साधारणपणे ती विशिष्ट आहारस्त्रोतांमध्ये एकत्रित आढळतात. त्यापैकी ६ पेशींतील ऊर्जानिर्मितीमध्ये योगदान देतात तर उरलेली २ DNAच्या उत्पादनात मदत करतात. ब-१ हे पहिल्या गटात मोडते. त्याचा परिचय करून देण्यासाठी हा लेख. ब-१ चे अधिकृत नाव Thiamin असून त्यामध्ये गंधक हे मूलद्रव्य असते. आहारातील स्त्रोत: अख्खी (unrefined) धान्ये, मासे, मांस, अंडे, आणि सोयाबीन यांत ते विपुल प्रमाणात असते.

कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 12/07/2018 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
‘ब’ गटातले हे जीवनसत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये कोबाल्ट हे मूलद्रव्य असून अशा प्रकारचे ते आपल्या शरीरातील एकमेव संयुग आहे. त्याचा शोध १९४८ मध्ये लागला आणि त्यानंतर जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत एकाचीही भर पडलेली नाही. निसर्गातील विशिष्ट जीवाणूच ते तयार करू शकतात. आपल्या मोठ्या आतड्यांत तसे काही उपयुक्त जीवाणू असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला थोडे ब-१२ मिळते. अर्थात तेवढ्याने आपली गरज भागू शकत नसल्याने आपल्याला ते आहारातूनही घ्यावे लागते. ब-१२ चे आहारस्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाची कारणे व परिणाम यांचा आढावा लेखात घेतला आहे.

मला भेटलेले रुग्ण - १७

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 02/07/2018 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/42846 अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला ....... मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! .... कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता.... _/\_.... __________________•______________ हा ७ वर्षाचा मुलगा माझा पेशंट आहे, आई बाबांसोबत नियमित येतो.

‘क’ जीवनसत्व : आंबट फळांची दणकट देणगी !

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 28/06/2018 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्यजनांना ‘क’(C) या एकाक्षरी नावाने परिचित असलेल्या या जीवनसत्वाचे अधिकृत नाव Ascorbic acid असे आहे. त्याच्या नावाप्रमाणे ते आम्लधर्मीय असून ते आंबट फळांमध्ये विपुल प्रमाणात असते. आवळा, लिंबू व संत्रे हे त्याचे सहज उपलब्ध असणारे स्त्रोत. त्यातून लिंबू हे बारमाही फळ असल्याने आपण त्याचा रोजच्या आहारात समावेश करतो. शरीराच्या बळकटीसाठी आवश्यक असणाऱ्या ‘क’चा शोध १९३०मध्ये लागला.

'ड' जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता (पूर्वार्ध)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 11/06/2018 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
शरीराच्या पोषणासाठी आपण आहारातून विविध पोषण-घटक दररोज घेत असतो. त्यापैकी कर्बोदके, मेद व प्रथिने ही मोठ्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) लागतात. याउलट काही पोषण-घटक हे अल्प प्रमाणात (मिलिग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम) जरुरीचे असतात. अशा सूक्ष्म पोषणद्रव्यांमध्ये जीवनसत्वांचा(Vitamins) समावेश होतो. आजपर्यंत एकूण १३ जीवनसत्वे माहित आहेत. त्यांना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी एकाक्षरी नावे का दिली असावीत याचे वाचकांना कुतूहल असते. गेल्या १-२ शतकांत जेव्हा त्यांचा टप्प्याटप्प्याने शोध लागला, तेव्हा त्या प्रत्येकाचे रासायनिक सूत्र निश्चित माहित नव्हते. त्यामुळे त्यांना शोधक्रमाने अ, ब, क अशी नावे दिली गेली.

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर (६३ किमी)

लेखक मार्गी यांनी सोमवार, 28/05/2018 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
३: जिंतूर- परतूर (६३ किमी) एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी १२ मे ला पहाटे साडेपाच ला जिंतूरवरून निघालो. रात्री चांगली झोप झाल्यामुळे फ्रेश वाटत आहे. आज ६२ किलोमीटर सायकल चालवायची आहे. माझ्यामुळे जिंतूरला डॉ. पारवेंना पहाटे लवकर उठावं लागलं व मला निरोप द्यायला ते रस्त्यापर्यंत आले. सकाळच्या प्रसन्न वेळेत सायकल चालवणं खूप मोठं सुख आहे! चांगली झोप झाल्यामुळे कालचा थकवा दूर झाला आहे.