Skip to main content

अडनिडी मुलं-२

लेखक जेडी यांनी रविवार, 16/12/2018 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागात काही मुलांच्या हट्टीपणाबद्दल लिहिले, काहींच्या मानसिक प्रोब्लेम बद्द्ल लिहिले... आता पोंगडअवस्थेतेतिल परिस्थिती मधुन उद्भ्वनार्या प्रश्नांविषयी... टिचर वर्गात आली... शिकवायला सुरवात... रोज पंजाबी घालणारी टिचर आज छान, पारदर्शक साडी नेसली होती. मुलं थोडी बावरुन ... आपआपल्या वह्यात डोकं खुपसुन... थोड्या वेळाने टिचर वर्गात फेर्या मारु लागली.. आता मुलांना टिचरला अगदी जवळुन पाहणे शक्य झाले... टिचर ने वहीत डोकावले.. आणि पुढे पाठ वळताच... "कैसी दिख रही रे, मस्त ऐटम, तेरे को कैसी लगती" , एकजण चार पाच लोकांना आवाज जाईल इतपत जोराने ... टिचर ने मागे वळताच.. एक मस्त स्माईल...

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 14/12/2018 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर काल रात्री मोठा पाऊस झाला. मी थांबलो होतो तिथे उकाडा व डासांमुळे झोप नाही लागली. जवळजवळ रात्रभर जागाच होतो. पहाटे चारला संस्थेतले एक जण बघायला आले. मग काही वेळ त्यांच्यासोबत बोलत बसलो. पहाटेच्या अंधारात फिरून आलो. संस्थेच्या कामाविषयी आणखी गप्पा झाल्या. नंतर त्यांनी अगत्याने माझ्यासाठी पोहे बनवले. पहाटेही पावसाचंच वातावरण आहे. त्यामुळे चांगला उजेड व्हायला वेळ लागला. त्यामुळे १९ नोव्हेंबरला रोजच्यापेक्षा थोडं उशीरा निघालो. निघतानाही रवीजी आणि मुलांनी खूप उत्साहाने मला निरोप दिला.

जीवनशैली ०२ : आयुर्मानावर लक्षणीय परिणाम करणारे महत्वाचे घटक

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 07/12/2018 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना : ही लेखमाला एका शीर्षकाखाली आणण्यासाठी, प्रत्येक लेखाच्या शीर्षकात, "जीवनशैली + (अनुक्रमांक)" हे शब्दगट सामील केले आहेत.

जे सत्य सुंदर सर्वथा....: (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव) ४. पंढरपूर ते बार्शी

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 06/12/2018 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ४. पंढरपूर ते बार्शी १५ नोव्हेंबर. काल सलग दोन दिवस पंक्चर झाल्यामुळे अजूनही अस्वस्थ वाटत आहे. पंक्चर तर मी नीट केलं आहे, पण परत होण्याची भिती‌ आहे. काल रात्री उशीरा झोपूनही सकाळी छान वाटतंय. मुलांचा व पालवीतल्या मंगल ताईंचा निरोप घेऊन निघालो. थंडी अगदी जाणवते आहे. पंढरपूर! गावातून शेटफळचा रस्ता विचारत पुढे निघालो. ह्या प्रवासाचा रूट प्लॅन केला होता तेव्हा दररोज ८०- ८५ किलोमीटर सायकल चालवण्याचं उद्दिष्ट ठेवलं. असा रूट बनवताना अनेकदा अगदी अंतर्भागातून जाणारे रस्ते घ्यावे लागले. आजही मला अशाच रस्त्यावरून जायचं आहे.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ३. इंदापूर ते पंढरपूर

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 04/12/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ३. इंदापूर ते पंढरपूर १४ नोव्हेंबरची पहाट. आज बाल दिन आहे आणि मला पहिल्या बाल गृहात जायचं आहे. आज ह्या सायकल प्रवासाचा तिसरा दिवस आहे! त्यामुळे शरीर काहीसं लयीत आलं आहे. पहाटेच्या थंडीत इंदापूर महाविद्यालयातून निघालो. सकाळी मॉर्निंग वॉक घेणा-यांना रस्ता विचारत पुढे निघालो. कालच्या हायवेच्या तुलनेत इंदापूर- अकलूज रस्ता अगदी शांत वाटला! आता खरंच वाटतंय की, मी ग्रामीण भागात आलोय. लवकरच पुणे जिल्हा संपला. अकलूजला म्हणजे आर्चीच्या गावात पहिला ब्रेक घेतला!

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): २. केडगांव चौफुला ते इंदापूर

लेखक मार्गी यांनी रविवार, 02/12/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: २. केडगांव चौफुला ते इंदापूर १३ नोव्हेंबरची पहाट. आज दुस-या दिवशी केडगांव चौफुल्यावरून निघायचं आहे. चांगला आराम झाल्यामुळे पहाटे फ्रेश वाटतंय. उजाडेपर्यंत तयार होऊन निघालो. इंदापूरपर्यंत आज मस्त हायवे आहे. कालच्या तुलनेत कमी वेळ लागणार. पण सायकल प्रवास अपेक्षेनुसार होत नाहीत! आजही त्याचा अनुभव येणार आहे. निघालो तेव्हा कडक थंडी आहे. ह्या प्रवासात दररोज सुरुवातीला एक- दिड तास मला कडक थंडी लागणार आहे. आणि नंतर दुपारी कडक ऊनही असेल. पहाटेच्या थंडीत हायवेचा आनंद घेत सायकल चालू केली.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १. चाकण ते केडगांव चौफुला

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 29/11/2018 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा.... : १. चाकण ते केडगांव चौफुला नमस्कार! नुकतीच १४ दिवसांची व ११६५ किलोमीटरची सायकल मोहीम पूर्ण केली. आता त्याचे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. ह्या सायकल मोहीमेची योजना कशी बनली, हे थोडक्यात सांगतो. मे २०१८ मध्ये योग प्रसारासाठी ५९५ किलोमीटर सायकल प्रवास केला होता. तेव्हा एक सामाजिक माध्यम म्हणून सायकलची क्षमता काय आहे, हे जाणवलं होतं. तेव्हा अशी आणखी सायकल मोहीम करायची इच्छा मनात होती. आणि सायकल चालवायची आहे तर एखादा सामाजिक संदेश व सामाजिक उद्दिष्ट असावं, असं वाटत होतं. परभणीचे माझे सायकल मित्र डॉ.

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ७

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/11/2018 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालेत १९०१च्या पुरस्कारापासून सुरवात करून आपण २०व्या शतकाच्या अखेरच्या दशकात आलो आहोत. आता १९९०च्या पुरस्काराची माहिती घेऊ. विजेते संशोधक : जोसेफ मरे आणि डोनाल थॉमस देश : अमेरिका (दोघेही) संशोधकांचा पेशा : मरे (सुघटन शल्यचिकित्सा), थॉमस (औषधवैद्यक) संशोधन विषय : इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार आपल्या शरीरात अनेक महत्वाची इंद्रिये आहेत – जसे की हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड इत्यादी. अनेक प्रकारच्या आजारांत त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. परिणामी त्यांचे कार्य ढासळते.

जीवनशैली ०१ : जगातील सर्वात जास्त निरोगी व जास्त आयुर्मान असलेले लोक व्यायामशाळेत जात नाहीत !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 17/11/2018 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
चकीत झालात ना ?! पण, हे केवळ सनसनाटी शीर्षक नाही, तर शास्त्रीय सत्य आहे. याचा अर्थ असा नाही की व्यायामशाळेत जाऊन शारीरिक क्षमतेला ताणणारा व्यायाम सरसकट वाईट आहे... व्यायामशाळेत शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला योग्य प्रमाणातला व्यायाम फायदेशीर ठरू शकतो, व तो ठराविक उद्येशांकरिता (उदा: खेळ, प्रतिस्पर्धा,इ) आवश्यकही असतो. मात्र, असा व्यायाम सरसकट आरोग्यपूर्ण दीर्घ जीवनाची हमी देऊ शकत नाही. खडतर व्यायामापेक्षा खूपच सुसह्य असलेल्या कृती, त्यापेक्षा कित्तेक पटींनी जास्त हमी देऊ शकतात.

एचआयव्ही एडस ह्या विषयावर जागरूकतेसाठी सायकल मोहीम

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/11/2018 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! गेल्या वेळी जेव्हा योग प्रसारासाठी सायकल प्रवास केला होता, तेव्हा एक माध्यम म्हणून सायकलीची क्षमता दिसली होती. सायकलिंग तर नेहमीच करतो, पण जर एक माध्यम म्हणून सायकल इतकी उपयुक्त आहे, तर एखाद्या सामाजिक विषयासाठी सायकलिंग करावं असा विचार मनात आला. हा विचार करत होतो तेव्हा माझ्यापुढे दोन गोष्टी होत्या. माझी बायको आशा एचआयव्ही- एडस ह्या विषयावर रिलीफ फाउंडेशन संस्थेसोबत अनेक वर्षांपासून काम करते. महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेचे सहाय्य असलेली रिलीफ फाउंडेशन एचआयव्हीविषयी जागरुकता आणि मायग्रंट वर्कर्स अशा विषयांवर काम करते. त्याबरोबर परभणीचे माझे सायकल मित्र डॉ.