Skip to main content

डेटोना बीच, फ्लोरिडा.

लेखक मीनल यांनी रविवार, 10/01/2010 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
टेबल वरच घड्याळ कानात कर्कश्य गजरलं. सकाळच्या सात वाजता माझी भली पहाट झाली होती. जड पापण्या अतिकष्टाने उचलून डोळे किलकिले केले. हॉटेल रूमच्या बाल्कनीला लावलेल्या पडद्यांच्या फटीतून थोडासा प्रकाश आत डोकावत होता. खरतर उजाडताना बाहेर पाहायच होत. म्हणून तर सूर्योदयाच्या वेळी मला उठवून जागं करायची तंबी घड्याळाला देऊन ठेवली होती. आळसाला बिछान्यात गुंडाळून ठेवलं. त्यातून माझ्या शरीराला अलगद सोडवून घेऊन बाल्कनीत लोटलं. झुंजुमुंजू सकाळ रवीला साद घालत होती. तोही जरासा चुळबूळ करू लागला होता. त्या रवीशी मनातल्या मनात शर्यत लावली. "बीच वर कोण आधी पोचतय, तू की मी?

चुकामूक

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 10/01/2010 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
"व्हायचं असतं ते घडतंच' या म्हणीचा कधीकधी प्रत्यय येत असल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. परवाही असंच झालं. परवा म्हणजे गेल्या रविवारी. आई रत्नागिरीहून येणार होती. "मी स्वतः येईन रिक्षानं. तू कशाला झोपमोड करून येतोस,' असा तिला सल्ला. पण हा आज्ञाधारक, विनम्र पुत्र रात्री दीडला झोपून पुन्हा पहाटे पाचला तिला आणायला जाण्यासाठी सज्ज झाला. सकाळी बरोब्बर पाचचा गजर लावला आणि त्यानुसार (गजर तसाच बंद न करता) उठलोही. कार घेऊन जाऊन आईला आपल्या मुलाच्या गाडीचा आनंद घेतल्याचं कृतकृत्यतेचं समाधान देण्यासाठी बाहू फुरफुरत होते.

पाव मार्काचा धडा !

लेखक भोचक यांनी शनिवार, 09/01/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
एरवी उत्साहाने फसफसत शाळेतून परतणारी माझी लेक त्या दिवशी तिला घेऊन येणार्‍या वाहनामधून उतरली तेव्हाच तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होतं. ते ओळखूनच तिच्या आईने तिला उचलून जवळ घेतलं नि तोपर्यंत तिच्या डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं. साथीला छातीचा भाताही वाजू लागला. तिच्या आईने थोपटतच तिला आधी शांत केलं, पण तरीही ते रोखता येणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं. हमसून हमसून रडता रडता ती म्हणाली, 'टीचर'ने कमी मार्क दिले. कशाबद्दल? आईचा प्रश्न. 'औ' चुकीचा लिहिला म्हणून- लेक उत्तरली. मग ठीक आहे. त्यात काय एवढं? एवढं बोलेपर्यंत मायलेकी घरात पोहोचल्या होत्या. लेकीने रडत रडतच तिच्या दप्तरातून तिची 'बुक' काढली.

दुर्ग आणि ढाकोबा... सह्यकड्याचे पहारेकरी

लेखक विमुक्त यांनी शनिवार, 09/01/2010 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
सह्यकड्याच्या टोकावर बसलो की कोकणातून वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श सुखावून जातो... नजर जाईल तीथपर्यंत कोकणात डोकावता येतं... एक विरळाच निवांतपणा जाणवतो... मागच्या वेळी ढाकोबाच्या माथ्यावरुन हे सगळं अनुभवलं होतं... ढाकोबाच्या परिसरात एकतरी मुक्कामी ट्रेक करायचा असं तेव्हाच ठरवलं होतं... २-३ जानेवारीला सुट्टी असल्यामुळे भटकंतीला जायचं पक्क होतं... मी, अजित आणि ऋशी असे तीघेजण होतो... पुणे - जुन्नर - इंगळूण - दुर्ग - ढकोबा - आंबोली - जुन्नर - पुणे असा प्लान ठरला...

२६/११ ला मुंबईवर लादल्या गेलेल्या रक्तलांछित हल्ल्यांपासून आपण काय शिकले पाहिजे?

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 07/01/2010 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानी अतिरेक्यांनी २६/११ ला मुंबईवर केलेल्या रक्तलांछित हल्ल्याचे वर्णन पहातांना, वाचतांना व ऐकतांना असं वाटलं होतं कीं इतक्या लोकांना, पोलिसांना व शेवटी लष्करालाही २-२॥ दिवस तंगवून सोडणारं हे पथक ३०-४० लोकांचं तरी असावं. मग कळलं कीं फक्त दहाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी इथं येऊन हा अनर्थ केला व असा प्रचंड धुमाकूळ इथं यशस्वीपणे घातला.

नववर्ष

लेखक सुबक ठेंगणी यांनी गुरुवार, 07/01/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच धुक्यातून, ता-यांनी गच्च भरलेल्या बिलोरी आकाशातून हिवाळयाची चाहूल लागते. डिसेंबरच्या अगदी सुरुवाती सुरुवातीला विंचरलेल्या काळ्याभोर शेतांच्या भांगातला भुरभुर बर्फ़ सकाळच्या अल्लड उन्हात लखकन चमकताना दिसायला लागतो. आणि मग एक दिवस नीरव शांततेत कुणीतरी सहज व्हायोलिनचे एकाकी सूर छेडावेत तसा बर्फ़ पडायला लागतो. ओस पडलेल्या रस्त्यांवरून क्वचित एखादी गाडी वाट मळवत निघून जाते. मग फक्त बर्फ़ाच्या शुभ्र म्हाता-या हवेत भिरभिरत रहातात.

जगाला प्रेम अर्पावे

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 05/01/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं ,परंतु आपल्या दु:खावर फुंकर घालून इतरांना सुख देणारी माणसही या जगात काही कमी नाहीत.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव या गावात अशा सर्वसामान्य कुटुंबातील माणसांचा असामान्यपणा दिसून आला.दरडीखाली आपल्या लहान लहान मुलांचा करूण अंत झाल्यावर त्यांच्या दु:खातून होरपळून निघालेल्या पालकांनी आपली मुलं शिकत असलेल्या शाळेला मदतीचा हात पुढे करून "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे " ही साने गुरूजींची शिकवण प्रत्यक्षात आणली . मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव हे सावित्री नदी किनारी वसलेलं एक खेडेगाव.मुळातच हे इतिहासकालिन बंदर म्हणून ओळखले जाते.वाळू उपसा , मासेम

अशीच एक काळरात्र...

लेखक दशानन यांनी सोमवार, 04/01/2010 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
२९/१२/२००९, वेळ रात्रीचे ११. ३० मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते.