Skip to main content

मेमांडू--एक अनुभव.

लेखक स्वप्ना हसमनीस यांनी मंगळवार, 08/12/2009 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
येथे मलेशियात 'मेमांडू' म्हणजे ड्रायव्हिंग,मोटारचालकत्व.भारतात असताना आपण गाडी चालवावी,त्याचा निदान परवाना तरी आपल्याकडे असावा असे मला मनापासून कधीच वाटले नव्हते.उलट नवर्‍याने गाडी चालवावी आणि आपण शेजारच्या सीटवर बसून खुशाल त्याच्या ड्रायव्हिंगवर ताशेरे ओढावेत्,जमल्यास एखादी डुलकी काढावी एवढाच काय तो प्रवासात माझा सहभाग असे.पण इथे मलेशियात आल्यावर मात्र माझी पंचाईतच झाली.पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्रास नसल्यामुळे सारखेच गाडीसाठी दुसर्‍यावर अवलंबून राहावे लागे आणि दुसरे म्हणजे माझ्याहून वयाने लहान स्त्रिया मोठ्मोठ्या गाड्या सहजपणे चालवितात हे पाहून मला एक प्रकारचा न्यूनगंड येऊ लागला.आता आपणही कांहीत

मी आणि मनू- सॉल्लिड टीम!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/12/2009 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीला सांभाळायची आता पाच वर्षं सवय झालेय. लहानपणी रात्री दीड-दोनला आल्यानंतर ती झोपेपर्यंत पाळणा हलवत बसण्याचं कंटाळवाणं कामही न कंटाळता केलं. त्यामुळं तिच्यासोबत एकटं असण्यात भीती किंवा टेन्शन वाटण्याजोगी परिस्थिती नव्हती. तरीही, एक दिवसापेक्षा जास्त काळासाठी ही वेळ कधी आली नव्हती. ती एक वर्षाची असताना हर्षदा बारामतीला कार्यक्रमाला गेली होती, तेव्हा एक दिवस पूर्णपणे मी तिला सांभाळलं होतं. अन्यथा आमची जबाबदारी काही तासांपुरतीच. या वेळी गोव्याला जायचं होतं आणि हर्षदाला रजा नव्हती. म्हणून मी मनस्वीला घेऊन जायचं ठरवलं. आई-बाबाही रत्नागिरीहून सोबत येणार होते.

क्यू.पी.एस (QPS) आणि पी.आय.पी (PIP)

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 04/12/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण २०-२१ वर्षांपूर्वी घेतलेल्या आमच्या कार टेप मध्ये एक बटण होते QPS नावाचे. त्याचे पूर्ण नाव तेव्हा तर माहित नव्हतेच. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचा उपयोग मी शोधून काढला. एखादे गाणे सुरू असताना हे बटण दाबून ठेवून जर कॅसेट पुढे ढकलली तर त्याचा उपयोग होतो. मला साधा कॅसेट प्लेयर व ह्या कार टेप प्लेयर मधील हा फरक का ते तेव्हापासून अजून नाही कळले. साध्या टेप मध्ये जर आम्ही गाणे वाजत असतानाच कॅसेट पुढे ढकलायचा प्रयत्न केला तर मोठे लोक म्हणायचे, 'असे नाही करायचे. त्याने कॅसेट खराब होते.' मग ह्या कार टेप मध्ये त्यांनी ही सुविधा का दिली?

सर्कसः पुन्हा अनुभवलेली

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 30/11/2009 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घराच्या मागे खरे तर खाडी होती. ती बुजवून त्यावर बांधकाम कधीतरी सुरू होणार हे नक्कीच. ती खाडी कधी बुजविली ते कळले नाही. पण आता तर त्या जागेवर सर्कससुद्धा उभी राहिली. गेल्या दीड महिन्यापासून म्हणजे १६ ऑक्टो. पासून ती सुरू आहे. नेहमी प्राण्यांचा आवाज ऐकू येत असे. दररोज दुपारी १ वाजल्यापासून त्यांचे संगीत सुरू होते. ते रात्री ९:३० ते ९:४० पर्यंत सुरू असते. मी बहुधा १६ वर्षांपूर्वी सर्कसला गेलो होतो. तेव्हा असे गाणी वगैरे असल्याचे मला आठवत नाही म्हणून वाटले, सर्कसवाल्यांनी मध्येच ऑर्केस्ट्रा ही सुरू केला की काय? :( लहानपणी तर आम्ही वडिलांसोबत जात असू.

होऊ कशी उतराई ?

लेखक नेहमी आनंदी यांनी रविवार, 29/11/2009 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नाव शिल्पा.. नाव मोठं आणी लक्षण खोटं म्हणतात अगदी तस्सं. मी खुप सुंदर असणार दिसायला असच वाटुन तिने माझं नाव ठरवले असणार.. असो. तर मी शिल्पा.. जन्माने नि:शक्त.. पुढच्या आयुष्यात औषधाने फ़रक पडण्याची अपेक्षा नसलेली.. mental retardetion घेउन जन्माला आलेली. पहिले ७ दिवस तर डोळेही उघडले नाहीत मी. मला म्हणे पिवळ्या झाला होता. आणि oxizen वर ठेवायची वेळ आली होती. किती कुजबुज झाली असेल तेव्हा देवालाच माहीत.. कारण आई जवळ माझे बाबा ठामपणॆ उभे होते.. हो, त्यात तिचा तरी काय दोष होता? कोणत्या आईला वाटेल तिच्या पोटी असे बाळ जन्माला यावे? आईने माझे खुप काही केले. कुठे कुठे दवाखान्यात नेले.

नशीब हे शिकलो - भाग ४३

लेखक विनायक रानडे यांनी रविवार, 29/11/2009 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
मला व बायकोला पहाटे उठून दोन्ही मुलांना बघताना हसायला यायचे मोठ्याचा डावा तर लहानाचा उजवा अंगठा तोंडात असे, तसे छायाचित्र मी घेऊन ठेवले आहे. चलचित्र ग्राहकाचा ( व्हिडिओ कॅमेरा ) उपयोग व प्रयोग करण्या करता दोन्ही मुले व त्यांच्या दैनंदिन हालचाली व खेळ हे माझे विषय बनले. घरात येणार्‍या मित्रांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे चित्रीकरण करणे हा माझा अभ्यास व ध्यास होता.ह्यातून मला चग्रा(व्हिडिओ कॅमेरा)वापरण्याचा आत्मविश्वास मिळाला. मी व्यावसायिक कामे घेणे सुरू केले. दोन महिन्यात ५०० रियाल जमवले व ज्या अमराठी मित्राने चग्रा घेण्यास मदत केली होती त्याला ५५० रियाल परत केले.