Skip to main content

भ्रष्टाचाराची पाळेमूळे

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 10/02/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचाराची पाळेमूळे भ्रष्टाचाराची पाळेमूळे आपल्या देशात आपल्या संस्कृती इतकी खोल रुजली गेली आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.गल्ली पासून दिल्ली पर्यंत पसरलेल्या या समाजव्यवस्थेतील किडीला ` चलता है '’ म्हणत आपण अधिकच खतपाणी घालतो.भ्रष्टाचार करणार्‍यांची ही अफाट बुध्दिमत्ता त्यांनी योग्य कामी वापरली तर भारत महासत्ताक होण्यास फार वेळ लागणार नाही.

अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी

लेखक सदानंद ठाकूर यांनी मंगळवार, 09/02/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी प्रत्येक माणसाची एक सुप्त इच्छा असते कि आपल्याला इतके पैसे मिळावेत कि कोणताही खर्च करताना हात आखडता घ्यावा लागू नये. कोणी हे उघड बोलतो तर कोणी बोलत नाही. प्रबळ इच्छाशक्ती व त्याला सातत्य, नियमीत प्रयत्न यांची जोड दिली असता हे स्वप्न कोणत्याही व्यक्तीला पुर्ण करता येऊ शकते.

असाही एक अनुभव

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/01/2010 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः बंगलोर च्या जवळचे एक छोटेसे गाव काळः हल्लीचाच वेळ : सायंकाळी पाच्/सहा घसा फारच खवखव करायला लागला लवंग घ्यावी म्हणून एका दुकानात गेलो. भोवताली ज्या वस्तु दिसल्या त्यात लवंग वगैरे काहीच नव्हते. लवंगेला कानडी/ तमिळ भाषेत काय म्हणतात या बद्दल एकूणच अज्ञान. आता दुकानदाराला लवंग द्या या साठी काय म्हणायचे याचा विचार सुरु झाला मी इंग्रजीत क्लोव्ह दे असे म्से म्हणालो. क्लोव्ह चा उच्चार दुकानदाराने काहीतरी भलताच घेतला असावा. त्याने दुकानातल्या कामगाराला काहीतरी आणायला पिटाळले.

मी भटकंती का करतो?

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 13/01/2010 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
"मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!! हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव्हा मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो तेव्हा असे उर्मट उत्तर देऊ शकत नाही. [कुणापेक्षाही स्वतःचा आदर करावा माणसाने :-) ] एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत? असो करणं - न करणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा मी खरंच स्वत:ला असे विचारतो तेव्हा माझा आतला आवाज काय बरे सांगत असतो? असाच एके दिवशी तंद्रीत काही उत्तरं ऐकू आली मला माझ्याच आतमधून.