Skip to main content

अर्थ माझा शब्दांचा

लेखक विनायक रानडे यांनी रविवार, 29/11/2009 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
वाचक हो तुमच्या सोयी करता माझ्या ब्लॉग वरिल लेख मालिका इथे सुरु करीत आहे. मी माझ्या कुवतीनुसार गेल्या ५५ वर्षात जे अनुभवले, त्यांमुळे मला उमजलेले शब्दांचे अर्थ, शब्दकोशातील अर्थ कोमेजलेली वाटतात. अर्थ = शब्दांची समज, अर्थकारणात अर्थकारण = सगळ्या खटाटोपाचे कारण अर्थ, पैसा गीळण्याची कला सुख = दुसर्‍यास छळण्याचे, दूसर्‍यांनी माझ्याकडून पळवले, मी अजून चाचपडतो आहे शांती = समजली तर नाहीतर दुर्मिळ प्रकार, नावाच्या व्यक्ती अशांत व अशांतता देणार्‍या होत्या लेखक = बरेचसे लेखनिक, कॉपी-पेस्ट प्रावीण्य मिळवलेले कायदा = तुम्ही काय काय केव्हा कुठे आणि किती देणार ह्याची यादी नियम = को

रेवदंडा... माझं गाव

लेखक विमुक्त यांनी शनिवार, 28/11/2009 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राच्या लग्नाला जायला नाही जमलं... तर निदान त्यानंतरच्या सत्यनारायणाच्या पुजेला तरी जायला पाहिजे असा विचार आला आणि रेवदंड्याला जायचं ठरलं... लहानपणी रेवदंड्यात असताना किल्ल्यात, बंदरावर, सुरुच्या वनात, दत्ताच्या डोंगरावर खूप उनाडक्या केल्यात... करवंद, जांभळं, बोरं, आवळे, ताडगोळे, जाम आणि चिंचा खात दत्ताच्या डोंगरावर पडीक असायचो... रोजच बंदरावर क्रिकेट खेळायचो... मनात येईल तेव्हा समुद्रात पोहायचो; सकाळ, दुपार, संध्याकाळ असं काही वेळेच भान नव्हतच... एक नंबरचा उनाड होतो... मी आणि रव्या दुचाकीवर सकाळी लवकर निघालो... सुमारे १०.३० वाजता चौलच्या मुखरी गणपतीच्या देवळात पोहचलो...

२६/११/०९ ची संध्याकाळ

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 27/11/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
२६/११ चा थरार आपल्या पैकी काही जणांनी प्रत्यक्ष अनुभवला असेल, तर बहुतेकंनी माझ्यासारखा टि.व्ही. समोर बसुन. कसाबा आणि साथीदारांनी मुंबईच नव्हे तर आख्खा देश हादरवला होता. मी देखिल ठरवल येत्या २६/११/०९ ला आपण पण शुटींग करायच. आठवडा भर आधी नियजन केलं होत, पण विरजण घालणारे काही फक्त मिपा वरच असतात असं नाही. माझ्या कार्यालयत देखिल आहेत.माझ्या साहेबांनी माजी रजा नामंजुर केली. मग काय?

नशीब हे शिकलो - भाग ४२

लेखक विनायक रानडे यांनी गुरुवार, 26/11/2009 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागील सगळे भाग मीपाकरांना वाचायचे असतील व व्यवस्थापकांची परवानगी असल्यास तीन भागांचा एक भाग करुन मी मीपा वर चढवू शकतो. माझ्या बायकोने त्या इजिप्शियन बाईला मदत न करण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण बायकोचा नववा महिना सुरू झाला होता. योजनाबद्ध पालक होण्या करता जी बंधने आम्ही पाळली त्यातलेच ते एक होते, तीच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण पडू दिला नाही. त्या नऊ महिन्याच्या काळातील आहार, व्यायाम, वैद्यकीय मदत ह्या सगळ्याचा विचारा करून दैनंदिनीची आखणी केली होती.

बदलती शिल्पे, बदलता समाज

लेखक चित्रा यांनी बुधवार, 25/11/2009 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
बॉस्टनच्या म्युझियम ऑफ फाईन आर्टस (कला संग्रहालया) मध्ये आम्ही काय खाल्ले सारखे (अजूनच) रटाळ डिटेल्स कोणाला नको असतील असे धरून पुढे चालू करते... आर्ट म्युझियम म्हटले की खरे तर आपल्या डोळ्यांसमोर शिल्पे, भिंतीवर अडकवलेली चित्रे, फारतर कलात्मक गालिचे अशा वस्तू येतात, पण बहुदा टीव्ही येत नाहीत/नसावेत. पण आम्ही खाणे आटपून मधल्या चौकातून जिन्याकडे जायला निघालो तो काही लोक भिंतीला टेकून समोर पाहत हसत असल्याचे दिसले. तर त्यांच्यासमोर भिंतीवर एकत्र जोडलेल्या पंधरा-वीस लहान टीव्हींचा एक संच होता.

शिवनेरिची वारी

लेखक झकासराव यांनी मंगळवार, 24/11/2009 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी शिवनेरीला जाउन आलो. आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिथे झाला त्या ठिकाणी जायचं ह्या कल्पनेनच सॉल्लिड्ड मस्त वाटत होतं. काय करणार. ज्यावेळी पुण्यात येवुन पहिल्यांदाच लाल महाल पाहिला होता त्यावेळी तिथली माती कपाळाला लावणारी आम्ही येडी. त्यामुळे असं गडावर जायच म्हणल की स्फुरण चढतचं. :) मग काय माहिती गोळा करुन चार टाळकी जमवुन निघालो. फोटो टाकतोच पण आधी थोडासा इतिहास टाकतो गडाचा. हा गड छत्रपतींच्या काळात स्वराज्यात नव्हता. वाचुन विश्वास नाही ना बसला.

नशीब हे शिकलो - भाग ४१

लेखक विनायक रानडे यांनी मंगळवार, 24/11/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
त्या इजिप्शियन जोडप्याचे पहिले मूल असून सुद्धा दुसर्‍या मुलाच्या जन्माचा हा घोळ त्यांनी का घातला ? तो एक वेगळाच अनुभव होता. म्हणूनच अपघाताने, कोणतेही नियोजन न करता देवाची कृपा समजून, बेजबाबदार रित्या बाळाला जन्म देणारे ९० टक्के पालक असतात असे संवेदनक्षम (१/११/२००९) ह्या लेखात लिहिले होते त्याचा हा एक धक्कादायक पुरावा. दोन दिवस जोडून आलेल्या सुट्टीचा तो दिवस होता, माझे जेवण संपत आले होते, बायकोचे अर्धेच झाले होते. तेवढ्यात माझ्या दारावर जोरात हात मारत इजिप्शियन मित्र ओरडून माझ्या बायकोला बोलवीत होता. त्याची बायको विचित्र अवस्थेत आहे व ति माझ्या बायकोची मदत मागते आहे.

सुरक्षा ? ? ?

लेखक विनायक रानडे यांनी सोमवार, 23/11/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक पातळीवर सुरक्षेचा विचार करणे आवश्यक असते ते समाजात रुजवणे तितकेच महत्वाचे आहे.

`एकच' तारा समोर आणिक...

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 21/11/2009 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
meteor "सिंह राशीतून सर्वात मोठा उल्कावर्षाव मंगळवारी दिसणार' अशी बातमी वाचून माझ्या भावनिक, वैचारिक विश्‍वात उलथापालथ होण्याचा प्रश्‍नच नव्हता. नेहमीच्या पद्धतीनं ती बातमी वाचून सोडूनही दिली होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीत कामावरही आलो होतो. पण काम सुरू असतानाच्या काळातच दोन सहकारी उगीचच "आज रात्री ड्युटी संपल्यावर काय करणारेस,' म्हणून आसपास घुटमळून गेले.