गादी
सर्व मिपाकरांना सादर प्रणाम करून पहिलेवहिले लेखन सादर करत आहे. शुद्धलेखन व टायपिंग मिस्टेक्स समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.
साधारण १०-१२ वर्षापूर्वी घडलेली घटना. त्यावेळी मी, पत्नी, दोन मुले - मुलगी व.व. ४, मुलगा व.व. ०.७५, आई आणि वडील असे सर्वजण इचलकरंजीला एकत्र राहत होतो. गेले २-३ महिने सौ व आई यांचा जुन्या गाद्या मोडून नवीन करण्याबद्दल पाठपुरावा चालू होता. आता मोडून म्हणजे काय तर गादीवाला जो असतो तो घरी येतो, जुन्या गाद्यांचे वजन करतो आणी घेऊन जातो. मग आपण त्याच्या कारखान्यात जायचं. आपल्याला हवं ते कापड सिलेक्ट करायचं. साधारण साइज व नग सांगायचे.
मिसळपाव