Skip to main content

भूक

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 11/06/2015 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
आजपण ताटात कोणी काही टाकलं की वाईट वाटतं. मग अरे टाकून माजू नये वगैरे पुराण सुरू झालं की लोकं वैतागतात , परवा एकजण पटकन म्हणाला , आपल्या इथे काय कोणी भुकेने मरत नाही रे ! तेव्हा पोटाच्या भुकेसाठी माणसं काय काय करतात ते आठवलं . डिप्लोमा झाल्यावर सेल्समनची नोकरी पकडली. अँटीव्हायरस विकायचो. त्या निमित्ताने देशात बर्‍याच ठिकाणी फिरलो . आज महाराष्ट्र उद्या आंध्रमधे परवा आणि कुठे ! मोठ्या शहरांसोबत छोट्या शहरांमध्येपण जायला लागायचं. एकटाच फिरायला लागायचं. रात्री एस्टी , एशियाड मिळेल ती गाडी पकडायची आणि सकाळी मुक्कामी पोचायचा.

गोष्ट ४० तासांची

लेखक शि बि आय यांनी सोमवार, 08/06/2015 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाच्या जन्मापासूनच त्याचा प्रवास सुरु झालेला असतो. कधी तो शारीरिक असतो, कधी तो बौद्धिक असतो तर कधी मानसिक असतो. पण राणीचा प्रवास मात्र तिच्यासाठी धम्माल आणि तिच्या आईसाठी झोप उडवणारा ठरला. राणी एक पंचविशीची बिनधास्त तरुणी. सेल्स आणि मार्केटिंग मध्ये असल्यामुळे थोडी रोकठोकच होती. तिच्या रोकठोकणामुळे पंचविशीच्या तरुणीच्या आईच्या मनात जी काळजी यायला हवी तीच तिच्या आई च्या मनात देखील यायला लागली होती, " हिचे सासरी कसे होणार?" त्यामुळे घरात साहजिकपणे कोणतेही शुभ कार्याचे आमंत्रण आले मग ते मुंज असो व लग्न कि त्याचे शेपूट राणीचे लग्न ह्या एकाच विषयाला जोडले जायचे.

भीतीच्या भिंती: ७. कोपरा

लेखक आतिवास यांनी रविवार, 07/06/2015 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, २, ३, ४, ५, ६ स्त्री-पुरुष समतेच्या प्रवासात ‘खास स्त्रियांसाठी असणा-या सोयी’ हा विरोधाभास नसतो, तर समतेच्या वाटचालीतला तो एक अपरिहार्य टप्पा असतो – हे भाषणातलं वा

पाउस, ती आणि मी- भाग १

लेखक डॉन व्हिटो कॉर्लिऑन यांनी रविवार, 07/06/2015 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोन दिवसांपुर्वीची गोष्ट, ऑफिसमधुन भिजत घरी आलेलो. घरी कोणी बॉसिंग करायला नसल्याने मस्तं पैकी कपडे बदलुन बीन बॅगवर आडवा तिडवा वेडा वाकडा पसरलेलो होतो. समोरच्या खिडकीमधुन मस्तं पाउस दिसत होता. कानावर हेडफोन आणि हातामधे कॉफीचा मग. विनअँप ला शफल ला टाकुन डोळे बंद करुन कॉफीचे सिप घेत होतो. थोड्या गाण्यांनंतर हे गाणं चालु झालं आणि नकळत अनेक खपल्या काढल्या गेल्या.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

सज्जनगड - एक जुनी आठवण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 28/05/2015 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
( फार पुर्वी कधी तरी लिहिले होते हे ललित ! कालपरवा जुना ब्लॉग चाळत होतो तेव्हा सापडले ! पुनःप्रत्ययाचा आनंद जाहला !

काही नवे करावे म्हणून.-भाग ५

लेखक नूतन सावंत यांनी मंगळवार, 26/05/2015 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
ओशाळून म्हणाला.” घरी चाललोय.राजापूरला.”मी काहीच बोलले नाही.पण सुरेखाचे यजमान कसले गप्प बसतात?,”आणि उद्यारे?” “नाय त्याच कामासाठी चाललोय .येणार ना उद्या !पण मॅडम, तेवढी केस मागे घ्याल ना?”ते बघू पुडे पुढे ते प्रकरण आणि हे प्रकरण वेगवेगळे आहे तेव्हा आताच काही सांगू शकत नाही.”मी आजच्या दिवसातली सिक्सर ठोकली.(क्रमश:) ************************************************ इतक्यात बस आली.

म रा.वि.म.मं. मधील एक दिवस

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 26/05/2015 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे लोकलचे धक्के खाउन स्टेशनवर उतरलो आणि हुश्श केले. बुधवार असल्यामुळे अजून दोन फक्त दोन दिवस रेटायचे आहेत त्यातच बॉस नामक प्राणी दोन दिवस गायब असणार आहे ह्या सुखद कल्पनेमध्ये डुलत डुलत घरी आलो. घरी येताना आजूबाजूचा परिसर थोडा वेगळा वाटला खूप काहीतरी मिसिंग असल्यासारखे वाटले नंतर लक्षात आले. वीज नामक गोष्ट जी नित्यानेमाने सगळ्या घरात आपली उपस्थिती लावत असते ती गायब आहे( हाय मेरी फुटी किस्मत !) आता मेणबत्ती शोधण्यापासून सुरुवात करावी लागणार ह्याची मानसिक तयारी केली. पण म. रा . वि. म. मं. ने एक सुखद धक्का दिला घरी पोचायच्या आत वीज आली(?). चला सुटलो म्हणत घरी पोचलो ….