Skip to main content

जडण घडण - २७

लेखक माधुरी विनायक यांनी बुधवार, 26/08/2015 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवं काम आवडू लागलं, त्यातही रूळले. या सगळ्या प्रवासात नोकरी देऊ करणाऱ्या कंपन्यांकडूनही वरचेवर कॉल यायचे. प्रामुख्याने कॉपी रायटिंग किंवा कंटेंट रायटिंगसाठी. पण बराच काळ फ्री लान्सींग सुरू होतं. वेगवेगळ्या क्षेत्रात, मनासारखं आणि वेळेच्या सोयीनुसार काम करता येत होतं, त्यामुळे पूर्णवेळ नोकरी करण्याकडे फारसा कल नव्हता. मुलाखतींसाठी गेले काही ठिकाणी, पण ते फारसं काही रूचलं नाही. एकदा एका चांगल्या ॲड एजन्सीमध्ये कामाला सुरूवात केली. पहिल्या दोन दिवसातच भयंकर कंटाळले. मी वेळेत पोहोचायचे. काम फारसं नसायचं. क्रिएटिव्ह टीम निवांत यायची.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ९- मदतकार्याचे विविध पैलू व जमिनीवरील वास्तव

लेखक मार्गी यांनी बुधवार, 26/08/2015 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

रानफुलांच्या वाटेवर

लेखक जागु यांनी मंगळवार, 25/08/2015 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षा ऋतू जीवनधारांचे सिंचन करत येतो आणि मातीच्या गर्भात असणार्‍या प्रत्येक बीज, कंदांना नवजीवनाचे अंकूर देतो. पावसाचे आगमन हळू हळू डोंगर, रानवाटा हिरव्यागार करत जातात. जून जुलै मध्ये रानावनातील कोवळी हिरवळ बाळसं घेत असते. साधारण ऑगस्ट पासून ह्या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुले गवत, झुडपे, वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलांच्या बहराचे. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेले कासचे पठारही आता फुलू लागेल.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ८- महापूरामागच्या कारणांची मालिका

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 25/08/2015 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

समाप्त...

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 24/08/2015 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
---------------------समाप्त----------------------- दोघं नव्वीत गेलेत. ती त्याच्याच शाळेत जाते. तो सायकलवर- ती चालत. तिचे वडील साखर कारखान्याच्या गव्हानीत जीव धोक्यात घालून कोयत्याने ऊसाच्या मोळया तोडायचं काम करतात. दिवसाला 50 रुपये. ---म्हणून ती शाळेत चालत जाते. त्याचे वडील त्याच कारखान्यात अकाउंट ऑफिसमधे बऱ्याच पगारावर आहेत. ---म्हणून तो शाळेत सायकलवर जाऊ शकतो. ही पूर्ण गोष्ट -म्हटलं तर खुप टिपिकल आहे. म्हटलं तर घायाळी. तिला तो कमाल आवडतो. पण तिचा चेहरा खुप तेलकट आहे. काळ्या रंगावरचा तेलकट चेहरा खुप विचित्र दिसतो. चिपचिपा.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ७- स्टोअरची तयारी

लेखक मार्गी यांनी सोमवार, 24/08/2015 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

नूपुरताईंना पत्र

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 23/08/2015 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
नूपुरताई, नमस्कार. तुम्ही मला ओळखत नसला तरी मी तुम्हाला ओळखतो. मराठी असलात, तरी तुम्ही इंग्रजी वळणाच्या कुटुंबात वाढलेल्या आहात. त्यामुळे माझं हे पत्र -छोटं असलं तरी- वाचताना जरा त्रासच होईल. बरं, इतर कुणाकडून वाचून घेता येण्यासारखंही नाही. कारण तुम्ही जिथं आहात तिथून दूरदूरपर्यंत कुणी मराठी बोलणारा-वाचणारा सापडताना कठीण आहे. पण वाचनाची सवय नसल्यानं होणारा त्रास तुम्हाला फारसा जाणवायचा नाही. कारण ज्या क्रूर अग्निदिव्यातून तुम्ही जाताय, त्यापुढे हे सर्व क्षुल्लक आहे. तुम्हाला गेल्या सात-आठ वर्षांपासून ओळखत असलो, तरी पत्र लिहावं असं मात्र आजच वाटलं.

[शतशब्दकथा स्पर्धा] वन नाईट इन द ट्रेन - उत्तरार्ध

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 22/08/2015 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध ती चमकून वळली. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तिला खुदकन हसू आलं. तिनं खुलासा करताच तोही हसू लागला. त्यानंतरच्या तासाभरात ती दोघं नक्की काय बोलली कोण जाणे पण आयुष्यात प्रथमच ती इतकी मोकळी होत होती. स्टेशनवर उतरून थॅन्क्स म्हणून ती वळणार इतक्यात … " जस्ट इन केस " म्हणत कुठल्याशा कार्डवर त्यानं नंबर लिहून दिला आणि ट्रेन सुटलीच. झालं ते इतकंच. कधीतरी खूप उदास एकटं वाटतं, कधी माणुसकीवरचा विश्वास डळमळतो तेव्हा रेशमी साड्यांच्या बासनात जपून ठेवलेलं एक कार्ड मी काढते.

डावा डोळा...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 22/08/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
‘हा घे नंबर... फक्त एकदाच जाऊन बघ..’ घनिष्ट मित्राने नंबर हाती थोपवत डावा डोळा झाकला. उजवा का नाही? तर डाव्या गोष्टीत जास्त मौज असते! दुसऱ्या दिवशी पूर्ण वेळ मोकळा होता म्हणून दुपारच्या जेवणानंतर मी त्या नंबरवर कॉल केला. किनऱ्या पोरकट आवाजात ‘कौन चाहिये? किसने नंबर दिया? क्या काम है?’ वगैरे मराठी हेलातील हिंदी प्रश्नावली ऐकून घेतल्यावर मी घनिष्ट मित्राचे नाव सांगितले. ‘अच्छा, मग या ना कवाबी आमी तयार हायेतच.’ अशा गावरान मराठीत स्वागत झाले. 'बालगंधर्वापाशी आल्याव फोन करा, मंग सांगतो कसं यायचं त्ये.’ त्या पोराने माहिती पुरवली. मला दम कुठला निघतो? तासाभरातच बालगंधर्व गाठले. चार वाजले होते.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला...

लेखक मार्गी यांनी शनिवार, 22/08/2015 08:05 या दिवशी प्रकाशित केले.