Skip to main content

उडदांमाजी....

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 26/05/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
‘मॅडम, बाहेर काळे म्हणून एकजण भेटायला आलेत. येऊ देत का ?’ दहा मिनिटापूर्वीच मी शिपायाला बजावलं होतं, मिटिंगचं काम आहे, एक तास कुणाला आत सोडू नको. आणि दहाच मिनिटात कोण काळे उगवला ? मी कपाळाला दोन सुरकुत्या पडून विचार केला. काळे नावाची कुणी व्यक्ती डोळ्यासमोर येईना. ‘थोडा वेळ थांबा म्हणावे..’ मी म्हटले. इतक्यात शिपायाच्या मागून एक ओळखीचा चेहेरा उगवला. ‘मॅडम, येऊ का आत ?’ ‘अरे, तुम्ही होय, काळे ? या, या ना !’ काळेला बघितल्याबरोब्बर माझी बत्ती पेटली. तीन वर्षापूर्वी माझे सोलापुरातल्या एका तालुक्याच्या गावी पोस्टिंग झाले असताना तिथे माझ्या हाताखाली दोन शाखा अधिकारी होते. हा काळे आणि दुसरा गोरे.

भाव तेथे देव (असं म्हणतात खरं!!)

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 25/05/2015 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्यास्वभावाला औषध नाही हे सर्वविदीत आहे. जगाकडे पहाण्याचा दॄष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तसेच आयुष्याकडून कुणाला काय अपेक्षा असतील हे सांगणे कठीण आहे. कोणत्याही दोन व्यक्ती घ्या, वर नमूद केलेल्या बाबतीत फरक हा आढळणारच. कुणाच्या खांद्यावर काय ओझे असेल याचा अंदाज येत नाही. वरवर सामान्य वाटणारे हे स्वभावविशेष किती टोकाचा परिणाम घडवून आणू शकतात, हे दाखवून देणारा हा एक माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेला अप्रिय प्रसंग आहे. जे झाले ते आनंददायक मुळीच नव्हते. तो कटु प्रकार संपूर्णपणे टाळता येण्याजोगा होता. जवळची माणसे त्यात गुंतली असल्यामुळे जास्त वेदना झाल्या.

आकुर्डीला एक मिनी कट्टा करायचा का?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 25/05/2015 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? सध्या माझा मुलगा आकुर्डीला आहे. सध्या तो "गणेश-तलावा" पाशी राहतो. त्याला भेटायला म्हणून मी आणि माझी बायको जात आहोत. मी आणि माझी बायको, २९-०५-२०१५ (शुक्रवार) ला आकुर्डीला येत आहोत.त्यादिवशी संध्याकाळी आकुर्डीला किंवा आकुर्डीच्या जवळपासच्या भागात कट्टा करायचा का? खर्च आपापला. कळावे, लोभ आहेच, तो ह्या कट्ट्याच्या निमित्ताने, अजून वाढावा अशी इच्छा. आपला, कट्टेकरी मुवि.

पोहू आनंदे.

लेखक नूतन सावंत यांनी सोमवार, 25/05/2015 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवऱ्याने पार्टीचे आयोजन केले होते,एरवी आम्ही दोघातच साजरा करीत असू.नातेवाईक,मित्र मैत्रिणीफोनवरून ; आई ,पपा, भावंडे कधी भेटून कधी फोनवरून शुभेच्छा देत असत.तेव्हा आम्ही बांदऱ्याला रहात असू.कोरम फुल होता.मजा चालली होती.जावा, नणंद,वहिन्यांनी ओवाळले.केक कापला.पार्टी सुरु झाली. अचानक माझ्या मनात विचार आला.”पन्नास!

जर्मन वर्मन

लेखक मधुरा देशपांडे यांनी सोमवार, 25/05/2015 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
एकीकडे अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये शशी गोडबोले इंग्रजीचे धडे घेत होती आणि साधारण त्याच काळात मी इकडे जर्मनचे. भारतात असताना थोडेफार शिकले असले तरीही ती थीअरी असते आणि पहिल्या १-२ कोर्सेस मधले अगदीच बेसिक होते. प्रत्यक्षात इथे आल्यानंतर खूप गोष्टी बदलतात, रोज एखादे नवीन संकट उभे राहते. कधी थोडेसे काही जमले तरी जग जिंकल्याचा आनंद होतो आणि कित्येक वेळा अगदी 'चुल्लूभर पानी में डूब मरू' अशी अवस्था होते. या सगळ्याला इथे शिकण्याची जोड मिळाली तरीही नवीन प्रश्नांचा, गमतीशीर घटनांचा प्रवास सुरु होतो आणि काही आठवणीत राहण्यासारखे किस्से घडू लागतात.

काही नवे करावे म्हणून-भाग ४

लेखक नूतन सावंत यांनी शुक्रवार, 22/05/2015 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुरेखाच्या घरी पोचलो.टिपिकल कोकणातले घर.बाहेर अंगणात मांडव टाकलेला.गडग्याला लागून गावठी गुलाबाची लाल आणि गुलाबी झाडे,तगर ,अनंत, तीन चार रंगाच्या कण्हेरी,तीन चार रंगाच्या जास्वंदी,अबोली,मोगरा,मधुमालती,सदाफुली अशी फुलझाडे आणि चिकू, जाम,आंबे,पेरू, जांभूळ,आणि नारळ अशी फळझाडे होती त्यामुळे अंगणात गारवा.खुर्च्या टाकलेल्या होत्या.आम्ही तिथेच बसलो तिला सगळी कथा सांगितली. “असा वैताग आणला आहे ग मेल्याने.भिकारीच जसा.काहीना काही घेतल्याशिवाय रहात नाही.”सुरेखा संतापाने बोलली.

वैनी ……… १

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 21/05/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
. गावकरणीची पाणंद आता ओळखू येत नाही . दोन्ही बाजूच्या कडवीच्या झुडुपांची गच्च कमान जाऊन तिथं चिरेबंदी भिंत झाली . चिंचेचं झाड आणि मैदानाच्या जागी श्री रामेश्वर कॉम्प्लेक्स उभं राहिलं . पाणंदीच नावही बदललं .आता तिला श्री रामेश्वर गल्ली म्हणतात. गावाचं शहर होताना झालेल्या असंख्य बदलातील हा एक . . जुन्या घरांच्या बिल्डिंगी झाल्या . गावातील सागरगोटे, सावरी , बकुल , रायवळ, चिंच अशी निरुपयोगी झाडं तोडून तिथं नारळ, आंबा आणि काजूची खणखणीत पैसा देणारी झाडं आली . जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या . घरोघरी कोर्ट केसेस चालू झाल्या .

कॉमेडी ऐसपैस

लेखक तिमा यांनी गुरुवार, 21/05/2015 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
" तर आता पहा, नवराबायकोतील हा धम्माल संवाद!!" एक तोकड्या कपड्यांतली वाळकी मुलगी, तिच्या कमावलेल्या आवाजात सांगत असते. तिच्या शब्दाशब्दाला मागचा वाद्यवृंद ठणाणत असतो. एक अत्यंत जाडी,बेढब पण साडी नेसलेली बाई स्टेजवर प्रवेश करते. आताशा, स्टेजवर प्रत्येक पात्राने नाचत नाचत आणि वाजत गाजतच प्रवेश करायचा असतो. तसा डिफॉल्ट प्रोग्रॅमच आहे ना! शिवाय प्रत्यक्ष काही वाक्य उच्चारण्याच्या आधीच नुसत्या आगाऊ देहबोलीवरच प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे हंशे वसूल करायचे असतात. तर ही बे.बा.(बेढब बाई) स्टेजवर एक राऊंड मारतीये तोच तिचा अत्यंत अंगविक्षेपी काटकुळा नवराही(का.

एक अविस्मरणीय क्षण

लेखक परी१२३४५ यांनी गुरुवार, 21/05/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट आहे साधारणपणे ४ - ५ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी १२ वी मध्ये होते. नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम चालली होती. माझ्या घरापासून काही अंतरावर एक नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. तिथेही दरवर्षी नवीन वर्षाच स्वागत खूप धुमधडाक्यात होत असत. त्या शैक्षणिक संस्थेची नववर्षाच्या स्वागताची एक आगळीवेगळी पद्धत आहे आणि ती म्हणजे २९,३०,३१ डिसेंबर या तीन रात्री तिथे गाजलेल्या व नावाजलेल्या कलाकारांना, मान्यवरांना निमंत्रित केले जाते. आणि एरवी फक्त टी.व्ही. वर दिसणारी त्यांची कला प्रत्यक्षात पहावयास मिळते. त्या वर्षीही असच संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकाराना बोलावण्यात आलेले होत.

पानिपत

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 20/05/2015 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अमोल, काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा.