मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चाळीतील आठवणी .....

भिंगरी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चाळीतील आठवणी ..... भाग १ला मुंबईपासून दूर ठाणे जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत घनदाट जंगलात बी एम सी ची एक वसाहत होती. छोटेसे आटपाटनगरच होते ते, जेथे शाळा, मैदान,कल्याण केंद्र,वाचनालय ,शाळेची गाडी सगळ्या सोयी होत्या. कल्याणकेंद्रात कॅरम,बुद्धिबळ,टे.टेनिस,व्हॉलिबॉल,क्रिकेट,रिंग,उडीच्या दोऱ्या इ खेळ खेळायला मिळत. महिलांना शिवणकाम,भरतकाम,हस्तकला शिकवले जायचे. या वसाहतीत एक भली मोठी आंबराई होती ज्यात नारंगी,केशरी,खोबरी,आमटी (आंबट),साखरी,ढेकणी,बिट्टी,काळा, बाटली,. अशी नावाप्रमाणे चव ,वास,रंग व आकार असलेली अनेक आंब्याची झाडे होती.पेरू जांभळे,काजू केळी यांची झाडेही होती . वसाहतीच्या बाहेर जंगलात बोर करवंद अस्वंद,धामणे,भोकरे इ रानमेवाही मुबलक मिळत असे. १०० एक कुटुंबे ह्या वसाहतीत होती. आंब्यांच्या जातीप्रमाणे येथे विविध प्रकारच्या जातीचे, धर्माचे लोक रहात होते. एक छोटा भारतच होता तो. अशा चाळीत माझे बालपण गेले.अगदी साधे जीवन होते ते. कोणत्याही प्रकारची जीवघेणी स्पर्धा नव्हती, आपलेपणा होता. घराचे दरवाजे खिडक्या सताड उघडे असायचे,खुल्या मनाचे प्रतिकच होते जणू,प्रायवसीचे नखरे नव्हते. संभाषणाची भाषा फक्त मराठी होती भले तो कोणत्याही जातीचा धर्माचा का असेना. तेव्हा मला त्यात विशेष असे वाटत नव्हते. परंतु आता विचार केला तर आश्चर्य वाटते कि गौडर,जोस ,शेख,वासवानी ,शहा हे चुकनही आमच्याशी हिंदीत बोलत नसत, आता हे शक्य आहे का? असे विचार माझ्या मनात खरे तर यायला नको ,परंतु चाळ सोडली आणि शहरातल्या संस्कृतीने हळूहळू माझ्यातील चाळ संस्कृतीचे संस्कार पुसायला सुरुवात केली. परंतु चाळीतल्या आठवणी अजूनही शाबूत आहे क्रमश:

वाचन 7530 प्रतिक्रिया 29