Skip to main content

आमचीबी चालुगिरी…

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 10/08/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा…. आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा.. त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्‍या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो.

गादी - शेवट

लेखक संजय पाटिल यांनी रविवार, 09/08/2015 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गादी - १, २ , ३, ४ चाचांचे मनोगत मागील भागापासून पुढे सुरू.... वेड्या वाकड्या झालेल्या बांगड्या हातात खेळवत खिडकीतून बाहेर शून्यात नजर लावून विचार करत बसलो होतो. कामगार काम उरकून निघून गेले होते. बेगम खाना बनवण्यात व्यस्त होती. कुणाच्या असतील बरं? कामगारानां खोदून खोदून विचारलं तरी सांगता येईन की नेमका कुठला कापूस किंवा कुठल्या गादीतून ह्या आल्या असतील.

सड़ला वाटाना

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 07/08/2015 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
त गोठ असि आय का आपल्या सप्पाइच्याच् स्यारेत सबज्जन एकमेकाइले चिड़वतेत. पोट्टे पोट्टिइनले चिड़वतेत अना पोट्टया पोट्टयाइले. नवी त काई बात नसे न बाप्पा. माह्या गोऱ्याले चार पाय अना तुह्या गोरा लंगडत जाय असा त काई नियम नसे. पर कई कई आंगभर होऊन जाते अना मंग सेकावाची बारी येउन जाते. आमच्या वर्गात एक भाजीवालीची पोट्टी बी सिकत होती. मंगरवार बाजार भरे तं तेती या मायलेकी भेद्रा,वांगा, वाटाना विकाले बसत. कोनी पोटापान्याले चोरीचकारी करते तं कोई नोकरिपानी करते. गरीब मानुस मेहनतीचे खाउन राह्यले होते. आता लाहानसा गाव मनला त सबज्जन एकमेकाइले ओरखत राह्यतेत.

घरांचे ढिगारे...

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 06/08/2015 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र ...कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे "मुंबईत स्वतःचे हक्काचे घर"
मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही...

एक न पाहिलेली सुखदा ..........!

लेखक झंडुबाम यांनी मंगळवार, 04/08/2015 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी फेसबुक वर एक पोस्ट पाहिली, एका 6 महिन्याच्या मुलीचा फोटो , इतकी सुंदर ,गुटगुटीत आणि खूप बोलके डोळे. मला एकदम माझी पुतणी लहान असताना अगदी अशीच दिसायची . पण खालची पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर मन भरून आलं , अलिबाग मधील वात्सल्य नावाच्या अनाथाश्रामातली मुलगी होती खाली तिथला नंबर दिला होता . मी फोन केला आणि चौकशी केली पत्ता घेतला आणि जायचं ठरवलं . एक गोष्ट समजली ,तिचं नाव सुखदा . सुखदा काही डोक्यातून जात नव्हती . शनिवारी सकाळीच तिथे पोहोचलो . बाहेरचा बोर्ड वाचून आत शिरलो , तिथल्या madam नि आत घेतले . मी चौकशी चालू केली .

अमेरिकेतील काही भारतीयांचे अनुभव

लेखक Jack_Bauer यांनी शुक्रवार, 31/07/2015 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अमेरिकेतील अनुभवला मिपाकर मंडळीनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद .. आपल्याला माझे मागील लेख वाचायचे असतील तर ते इथे आहेत : अमेरिकेतील हॉटेलचा अनुभव USA it is ... इथे मी अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी आलेले भारतीय लोकांचे अनुभव मांडत आहे : --------------------------------------------------------------- १. एकदा मित्राला आणायला न्यूयॉर्क विमानतळावर गेलो होतो. मित्राला रेसिव करून taxi stand वर आलो आणि एका taxi मध्ये बसलो. योगायोगानी taxi driver पंजाबी होता.

गादी-४

लेखक संजय पाटिल यांनी गुरुवार, 30/07/2015 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक छोटासा अनुभव शेअर करावा म्हणून लिहायला सुरवात केली आणि लिहिताना एवढं आठवायला लागलं की कुठे थांबावं कळेना. भाग वाढत चालल्या मुळे थोडं अपराधी वाटतय पण सगळं सांगीतल्या शिवाय रहावत पण नाही.आवडलं तर वाचा. ता.क. भाग लहान होण्याचे कारण टंकनाचा आळस हे आहे. ********************************************************************************* त्याची प्रतिक्रिया बघून मी थोडासा घाबरलो. थेट विचारून चूक तर केली नाहीना? असे वाटू लागले. समजा यांच्या कडे नसल्या तर आम्ही खोटा आळ घेतोय असं समजून हा भडकून बोलायला लागला तर काय करायचं?

गादी- ३

लेखक संजय पाटिल यांनी बुधवार, 29/07/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व वाचकांचे मनापासून आभार. संपादक मंडळीने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे पण आभार मागील दोन भाग प्रकाशीत केल्या नंतर थोडा विश्वास वाढला. पण अजून टंकलेखनाची सवय नसल्या मुळे एक वाक्य टंकायला दोन ते तीन मिनिटे लागतात. त्यामुळे ठरवून सुद्धा मोठा भाग टाकायला जमले नाही. त्याबद्दल क्षमस्व. आहे ते गोड मानूण घ्याल अशी अपेक्षा. ******************************************************************************** हे सगळं ऐकून कुणाला काय बोलावं तेच सुचेना. सर्व प्रथम प्रतिक्रिया बायकोची " अहो चार तोळ्यांच्या होत्या नं?" हे ऐकून आई पुन्हा रडायला लागली. सर्वप्रथम मी स्वतः ला सावरलं.

मराठी विकिपीडियावरून स्वांतत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी

लेखक माहितगार यांनी रविवार, 26/07/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ऑगस्ट महिन्यात मराठी विकिपीडियास सर्वाधीक वाचकांच्या भेटी मिळतात. या कालावधीत नवनवीन सदस्यांना मराठी विकिपीडियाशी जोडण्यासाठी आणि लिहिते करण्यासाठी काही वेगळे करून पहाण्याचा मानस होता आणि आहे. या वेळी स्वांतत्र्य दिवसा निमीत्त मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत फारसे लेखन न केलेल्या लोकांनी दिलेले - म्हणजे तुमचे स्वतःचे शुभेच्छा संदेश ठळक पणे प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. उद्देश हाच कि लिहिण्याच्या फारशा अटी ठेवायच्या नाही आणि काय लिहू हा प्रश्नही कमीत कमी ठेवायचा. आजकाल प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाला हॅप्पी...

गादी - २

लेखक संजय पाटिल यांनी शनिवार, 25/07/2015 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ सर्व प्रतिसादीत वाचकांचे आणी संपादक मंडळींचे आभार! लेखनाला सुरवात केली तेव्हा वाटलं होतं की फार काही मोठा किस्सा नाहीये. तेव्हा एकच किस्सा लिहून खतम करू म्हणून. पण मग लिहायला लागल्यावर कळतंय किती कठीण काम आहे ते. त्यामुळे जमेल तसे छोटे छोटे भाग टाकतोय. बहिणीकडे जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आई बॅग भरत होती. दोघेच बसने जाणार म्हणून अगदी गरजेपुरते सामान एकच बॅग भरून घेऊन जायचं असं बाबांनी बजावून सांगितल्यामुळे आईचा थोडा गोंधळ उडाला होता. त्यातच कन्येने "मी पण आत्या कडे येणार" असा हट्ट धरला होता. "अगं तुझी शाळा चुकेल ना?