हाथ बढा ए ज़िंदगी
काही दिवसांपूर्वी घरी एकटा होतो. उन्हं उतरली होती. सुटीची कामं, वाचन, टीव्ही पहाणं सगळं करून झालं तरी रविवारचा संधिकाल सरता सरत नव्हता. असं बर्याच दिवसांनी घडलं होतं. वेळ घालवायला मागच्या अंगणात गेलो. नेहेमीप्रमाणेच मावळत्या दिवसाला आणखी थोडं लांबवत, एकमेकांचा पाठलाग करत पक्षी झाडांवरून, विजेच्या तारांवरून झेपावत होते.
एकदम लक्षात आलं, खारी दिसत नाहीयेत आज. गेल्या महिन्यात तर कितीतरी होत्या.
३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही.
परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला.
मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो.
टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले.
मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो.
कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला.
मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो.
मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद
उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले.
जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे.
तारीख - १५-०९-२०१५
वेळ - रात्रीचे ८
ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गेल्या वर्षी गणपतीला जाता आल नाही अन रुखरुख वाटत राहिली म्हणून मनातल्यामनात कोकणात गणपतीला जाउन आले. तेव्हा लिहिलेली ही भटकंती.
या वर्षीपण मनातली सैरच आहे नशिबात.
काल गप्पांच्या पानावर सहज कोकणातल्या गणेशोत्सवाचा विषय निघाला , आणि मी एक सैर करून आले मनातल्या मनातच. ह्या वेळी घरच्या गणापतीला कोकणात हजेरी लावता येणार नाहीये ह्याचा सल होताच मनात , तो ह्या सफरीनी जरा हलका झाला.
कोकणातल्या गणपती बद्दल ऐकल बरच होतं पण अनुभवल ते लग्न करून मालवणकरीण झाल्यावरच .
हाक! (शतशब्द्कथा)..भाग २
पहिला भाग शतशब्द्कथा स्पर्धेसाठी लिहिला होता. खालील दुवा बघावा..
http://www.misalpav.com/node/32313
"आई...........आई...बाळाला काय झालंय? तो का उठत नाहीये ? रागावलाय का तो ? मी तर भांडलो पण नाही त्याच्याशी आज..भांडणारही नाही कधी..त्याला उठायला सांग ना आई......सगळे खेळणे त्याचे.....त्याचीच पहिली बॅटिंग!...सांग ना त्याला..
बाबा..तुम्ही सांगा ना काय झालंय? आजी बघ ना आपल्या बाळाकडे...तुझा जास्त आवडता आहे ना तो..चालेल मला..मी नाही चिडणार
बाळा..रोज किती वेळा हाका मारतो मला 'दादा दादा' म्हणून..आता मी हाका मारतोय तर का उठत नाहीये तू?
भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!
http://www.misalpav.com/node/32522
तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :)
स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी
तारिख.
या पाच गोष्टी कायम कराव्यात
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल.
2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील.
3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील.
4.
...घे जगून !
गेल्या वर्षीचा फेब्रुवारी महिना. लेकाची दहावीची परीक्षा पंधरा दिवसांनी सुरु व्हायची होती. एका रविवारच्या सु-प्रभाती मी आणि मुलगा पुस्तकं आणि इतर शालेय साहित्य आवरत होतो. आठ दिवसापूर्वी शाळेतून मुलाचं परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं होतं ते मी बंदोबस्तात कपाटात ठेवलं होतं. त्याला लॅमिनेशन करायचे होते म्हणून लॉकरचा कप्पा उघडला. सगळे कागद बाहेर काढले. हॉल तिकीट त्यात सापडेना. कपाट पालथं घातलं, सगळ्या वस्तू, कपडे बाहेर काढून शोधलं, लॉफ्टवरच्या सगळ्या जिनसा खाली आल्या, कागद अन कागद विंचरून काढला. पण हॉल तिकीट मिळालं नाही. हॉल तिकीट म्हणजे परीक्षेचा प्रवेश परवाना. महत्वाचा कागद !
...
कण्याचा धड़ा
-----------------कण्याचा धड़ा---------------
"26 वर्षाचा अनुभव आहे. तू पास झालास तर राजीनामा देईन. सायन्स हे तुमच्यासारख्यांचं काम नाही. कुठं आर्ट-बीट ला जाऊन BA करून शेवटी गावातच पडून रहायचं तर डॉक्टर-इंजीनिअरची स्वप्ने बघत हिथं सायन्सच्या वर्गात बसायला, दुसरयांची जागा आडवायला आलायत. 'थोड़ी शिल्लक असेलच' तर आई बापाला फसवायचं बंद करा अन आर्ट ला एडमिशन घेऊन तिकडं बसा."
सर वर्गात असं 'इन जनरल' म्हणायचे. नाव न घेता. कित्येक वेळा.
पण मुलांना, मला व सरांना- तिघांनाही माहीत असायचं की हा बाण नेमका कोणाच्या दिशेने सुटलेला आहे.
12वीत गॅप घेतलेला.
मिसळपाव