माझ्या अमेरिकेतील अनुभवला मिपाकर मंडळीनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद .. आपल्याला माझे मागील लेख वाचायचे असतील तर ते इथे आहेत :
अमेरिकेतील हॉटेलचा अनुभव
USA it is ...
इथे मी अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी आलेले भारतीय लोकांचे अनुभव मांडत आहे :
---------------------------------------------------------------
१.
एकदा मित्राला आणायला न्यूयॉर्क विमानतळावर गेलो होतो. मित्राला रेसिव करून taxi stand वर आलो आणि एका taxi मध्ये बसलो. योगायोगानी taxi driver पंजाबी होता. त्याच्याशी हिंदी मधून गप्पा मारायला सुरवात केली. सुमारे तासाभरानी आम्ही पोहोचलो. मित्राचे घर तिसर्या मजल्यावर आहे (लिफ्ट नाही). आम्ही उतरल्यावर त्या सरदार driver ने स्वतःहुन bags वर आणून दिल्या. त्या बद्दल त्याला जास्तीचे पैसे देवू केले तर ते त्यानी नाकारले आणि म्हणाला "ओये अपणे भाई के वास्ते किया यार" आणि आपले कार्ड देवून निघून गेला.
२.
मी व बायको एकदा एका indian store मध्ये गेलो जे फ़क़्त पूजा सामानासाठी प्रसिद्ध आहे. त्या दुकानाचा मालक गुजराती. तिथे जवळ जवळ सर्व पूजा सामान मिळाले फ़क़्त गेजावस्त्र सोडून. आम्ही त्याला त्या बद्दल विचारलं तर त्याला गेजा वस्त्र म्हणजे काय ते माहित नव्हतं. आम्ही थोडं वर्णन केल्यावर त्यांनी लगेच त्याची डायरी काढली आणि त्यात गेजा वस्त्र अशी नोंद केली. स्वतच्या फोन वर लगेच गूगल करून ही काय वस्तू आहे ते पाहिलं आणि लगेच स्वतःचं कार्ड देऊन म्हणाला "१५ दिन के बाद फोन करो अगर उसे पहिले आता हे तो मै आपको बता दुंगा, आप अपना नंबर दो ".
३.
एका दुकानात गेलो होतो जे खास महाराष्ट्रीयन वस्तुंसाठी प्रसिद्ध आहे. तिथे भाजणीचे पीठ, मेतकूट, कांदा लसूण ठेचा आणि बर्याच इतर महाराष्ट्रीयन वस्तू मिळतात. त्याचा मालक महाराष्ट्रीयन आहे. पण तिथे त्याला जे विचारू त्याचं १ किंवा २ शब्दात उत्तर आणि तेही चेहर्यावरची रेषही न हलू देता. जसा काही एखादा रोबो बोलत आहे. तो मराठी आहे म्हणून त्याच्याशी मराठीत बोललो तर उत्तर इंग्लिश मधून. मग मी इंग्लिश मधून बोललो तरी तेच … बहुतेक ह्याला शाळेत असताना एका शब्दात उत्तरे द्या हा खूप भाग आवडता होता की काय असं वाटून गेलं.
उदा: तुमच्याकडे भाजणीच्या चकल्या आहेत का ? उत्तर :- by order only.
I need to place the order. उत्तर:- उत्तर म्हणून त्याने त्याचे कार्ड दिले ज्यावर लिहिले होते to order send email to xxxxx@xxx.com आणी त्या इमेल वर बोट ठेवून ते tap केल. तोंडातून काहीही उत्तर नाही.
--------------------------------------------------------
तीन माणसे, तीनही भारतीय पण गिऱ्हाइकाशी वागायची पद्धत ही त्यांच्या मानसिकतेबद्दल बरच सांगून जाते. पहिल्या दोघांना माझाकडून repeat business आणि तिसर्याला bad mouth publicity मिळाली ह्यात आश्चर्य ते काय ?
वाचने
9009
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तं लिहिलय.
हम्म......महाराष्ट्रीय
अगदी
In reply to हम्म......महाराष्ट्रीय by रेवती
अगदी अगदी
In reply to अगदी by Jack_Bauer
"मी तर बर्याचवेळा expire झाला
In reply to अगदी by Jack_Bauer
मराठी माणसाच्या दुकानातील
ओ हात नका लावु तेथे ऑरडरचा
मस्कतचे?
In reply to ओ हात नका लावु तेथे ऑरडरचा by स्पंदना
कधि आला हा अनुभव ?
In reply to ओ हात नका लावु तेथे ऑरडरचा by स्पंदना
दातार अति वैतागल्याशिवाय
In reply to ओ हात नका लावु तेथे ऑरडरचा by स्पंदना
अपमान
In reply to ओ हात नका लावु तेथे ऑरडरचा by स्पंदना
Kaarane dya (short question)
Must learn.
In reply to Kaarane dya (short question) by vikramaditya
निरीक्षणे आवडली
महाराष्ट्रियन मराठी माणसाला
कुठे हि गेलो तरी आम्ही आपुला
मराठी पाऊल अडते कुठे?....
एक दोन प्रसंगांवरून
In reply to मराठी पाऊल अडते कुठे?.... by प्रभाकर पेठकर
मराठी असणं वगैरे फक्त योगायोग
In reply to एक दोन प्रसंगांवरून by स्रुजा
एक दोन प्रसंगांवरून/व्यक्तींवरून मत बनवू नये
In reply to मराठी पाऊल अडते कुठे?.... by प्रभाकर पेठकर
अगदी सहमत. हामेरिकन
In reply to एक दोन प्रसंगांवरून/व्यक्तींवरून मत बनवू नये by Jack_Bauer
दुकानदाराने...
भागोजागो ग्राहक जागो वाला नाखुग्राहकाभिमुख सेवा....
In reply to दुकानदाराने... by नाखु
शक्यता
In reply to ग्राहकाभिमुख सेवा.... by प्रभाकर पेठकर
हाहाहाहा...मस्त लिहिले आहे.
+११११११ एकदम बरोबर
In reply to हाहाहाहा...मस्त लिहिले आहे. by समीरसूर
समीरसूर
In reply to हाहाहाहा...मस्त लिहिले आहे. by समीरसूर
अरे मराठी माणसाच्या अटी किती असतात? हे नको, असं नको, इतक्या सुट्या पाहिजे, काम सातच तास करणार, टर्रेबाजी करणारएकदम खर आहे समीर भाउ. आजकालच्या पोरांच्या अश्या वृत्ती मुळे आज काल कामाला पोर पण मिळत नाहीत.मराठी माणसाला रोजगार द्या
In reply to हाहाहाहा...मस्त लिहिले आहे. by समीरसूर
समीरसूर धन्यवाद
In reply to हाहाहाहा...मस्त लिहिले आहे. by समीरसूर
मस्त प्रांजळ लेखन !!
धन्यवाद प्रगो
In reply to मस्त प्रांजळ लेखन !! by प्रसाद गोडबोले