आम्ही नुकताच उडुपी पर्यंत प्रवास केला. आज पर्यंत विविध प्रकारे प्रवासलेखन करून झालेले आहे. हा माझा एक वेगळ्या प्रकारे प्रवासलेखन करण्याचा प्रयत्न आहे. कुठे कसे जावे काय पाहावे याचे हे वर्णन नाही. या लेखात दक्षिण कन्नडा प्रदेशातील दिसलेल्या आर्थिक घटना किंवा इतिहास यांचा आढावा घेतला आहे. त्याकरता या प्रदेशातील बँकिंगचा इतिहास, मंगलोरी कौलं उद्योग, आणि आधुनिक हार्वेस्टर यांची चर्चा केली आहे.
दक्षिण कन्नडातील बँकिंग
आज देशात ज्या शासकीय मालकीच्या ज्या बँका आहेत (ज्या पूर्वी खाजगी मालकीच्या होत्या) त्यातील ४ बँकांची सुरुवात दक्षिण कन्नडा प्रदेशात झालेली आहे.