Skip to main content

अनुभव

एका रेषेत सहा ग्रह?

लेखक मार्गी यांनी शनिवार, 28/02/2026 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
✪ "प्लॅनेट परेडची" सत्य स्थिती ✪ आत्ताचे ग्रह कसे व कुठे बघता येतील? ✪ सूर्य मावळल्यानंतर तेजस्वी शुक्र दिसेल ✪ शुक्र, शनि व तेजस्वी गुरू हे तीन ग्रह सहजपणे बघता येतील ✪ पुढचे दोन- तीन दिवस नितांत स्वच्छ आकाश ✪ नितळ निळा रंग- आकाशाचा रंग निळा का असतो? ✪ ३ मार्चला चंद्रग्रहण- पण चंद्र उगवताना ग्रहण संपत असेल ✪ पायथागोरसचे प्रमेय आणि तमिळ गणितज्ञाचं निरीक्षण नमस्कार. गेले काही दिवस एका रेषेत सगळे ग्रह येणार अर्थात् "प्लॅनेट परेड" होणार अशा पोस्टस आल्या आहेत. ग्रहांची सद्यस्थिती कशी आहे व कुठले ग्रह कसे बघता येतील त्याबद्दल बोलण्याआधी थोडा विचार करूया.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास

लेखक मार्गी यांनी बुधवार, 25/02/2026 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
✪ पायवाटेवरची सुंदर भ्रमंती ✪ काटक बनवणारी पहाड़ी जीवनशैली ✪ एकमेकांना धरून राहणारी साधी माणसं ✪ पर्वत कितने ऊँचे कितने गहरे होते हैं! ✪ पहाड़ाची नानाविध रूपं! ✪ सत्गड़ची रमणीय संध्याकाळ ९ डिसेंबरची पहाट! मुन्सियारी आकाश दर्शनाचं शेवटचं सत्र! डोळे भरून आकाश बघितलं. चंद्र प्रकाशात चमकणारी पंचा चुलीची शिखरं मन भरून बघितली! थंडीचाही भरपूर आनंद घेतला! उजाडल्यावर टेलिस्कोप पॅक केला. चहाचा पहिला राउंड झाल्यावर आवरून भटकायला निघालो. कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय. काल गावात थोडं फिरलो होतो तेव्हा एक जागा सुंदर दिसली होती. त्या भागात अजून पुढे फिरेन.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन

लेखक मार्गी यांनी शनिवार, 21/02/2026 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
✪ अंध गायकासोबत विशेष भेट ✪ सप्तर्षी, स्वाती आणि पंचा-चुली! ✪ रात्रीच्या आकाशातली रंगांची उधळण आणि स्टार ट्रेल्स! ✪ अखेर चंद्रोदयाचा क्षण फोटोत घेता आला ✪ आकाशगंगेच्या पिठुर चांदण्याचा आनंद ✪ भयाण थंडीमध्ये चहाची ऊब! ७ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता उठलो. मुन्सियारीची भयाण थंडी! पण आकाशात काय काय दिसेल ही उत्सुकताही तेवढीच! हिंमत करून दार उघडून बाहेर आलो. अहा हा! काय विलक्षण दृश्य आहे! सप्तर्षी पूर्ण वर आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातून दिसतात त्याहून ते जास्त उंचीवर दिसत आहेत! कारण अर्थातच मुन्सियारीचं उत्तरेकडचं स्थान. काल संध्याकाळी शर्मिष्ठा तारकासमूहसुद्धा बराच वर दिसत होता.

आणि माऊंट किनाबालू सर झाला...

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 20/02/2026 15:57 या दिवशी प्रकाशित केले.

माउंट किनाबालू, ईस्ट मलेशिया ह्या बेटावरील (बोर्निओ आयलंड) साबा ह्या राज्यातला, मलेशियातील आणि साऊथ ईस्ट आशियातील सर्वात उंच पर्वत आहे. आणि, जगातील बेटांवर असलेल्या पर्वतांमध्ये जगात तिसऱ्या नंबरचा उंच पर्वत; ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 4095 मीटर आहे. गिर्यारोहकांमध्ये चढाई करण्यासाठीचं एक मानाचं नाव आहे माउंट किनाबालू (स्थानिक भाषेत गुनुंग किनाबालू) .

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 19/02/2026 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
✪ उत्तराखंडमधल्या दुर्गम वाटेवरचा जीप प्रवास ✪ गोरी गंगेच्या तीरावर! ✪ जौलजिबी परिसरातल्या मदतकार्याच्या आठ्वणी ✪ मुन्सियारी- एक विलक्षण गाव ✪ नंदा देवी मंदिराचा ट्रेक ✪ पंचाचुली शिखरांच्या मागे होणारा चंद्रोदय! ६ डिसेंबरच्या पहाटे सत्गडवरून निघालो. जेमतेम उजाडायला लागलं आहे आणि जीप यायची वेळ झाली. आदित्यने मला खाली रोडवर सोडलं. सगळ्यांत मागच्या सीटवर बसून निघालो. सोबत टेलिस्कोप आणि बायनॅक्युलर असल्यामुळे ते सामान माझ्यासोबतच ठेवलं. सत्गडवरून मुन्सियारी अंतराने कमी म्हणजे फक्त १०८ किमी आहे. पण वाटेत सगळा पहाड़ी प्रदेश आणि बिकट रस्ता! त्यामुळे जायला निदान ४-५ तास तरी लागणारच.

सैरभैर डायरी - २.२

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 08/01/2026 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
२.१ मॅडम, त्या पोरींना घेऊन या. पोरी लंगडत आल्या.. थोड्या जखमा दिसत होत्या.. "हाच होता का तो?" पोरींनी मान डोलावली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई, बाप ,नोकरी ते जेलमधला संडास सगळ गरगर फिरायला लागले २.२ "जा मॅडम पोरींना घेऊन, मेडिकल झाली असाल तर वॉश करून येऊ दे." मॅडम पोरींना घेऊन गेल्या. "पोरींना ओळखता का या?" साहेबांचा प्रश्न . "हो साहेब .

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ३: सत्गढ़- हिमालयाच्या कुशीतलं गाव

लेखक मार्गी यांनी बुधवार, 07/01/2026 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
✪ कडक थंडीतलं आकाश दर्शन ✪ डोंगर उतारावरची शेती, छोटे घरं, आणि धुक्यात गुरफटलेली दरीतली गावं! ✪ नितांत सुंदर परिसरात केलेलं ट्रेकिंग ✪ संध्याकाळची केशरी हिमशिखरं ✪ "शेर! देखो वहाँ खड़ा है!" सत्गड़! ५ डिसेंबरला पहाटे साडेचारला उठलो. कडक थंडी आहे! अक्षरश: गच्चीमध्ये आकाश दर्शनासाठी बसता येत नाहीय. जणू पर्थच्या मैदानात जम बसवण्याइतकं अवघड आहे. पण आकाशच इतकं संमोहक आहे की हळु हळु थंडीचा मारा थंड पडला! चंद्राचं राज्य असलं तरी आता तो मावळतीला कललाय. चंद्राच्या थोडा अलीकडे गुरू चमकतोय. व्याध दक्षिणेला क्षितिजालगत दिसतोय. पूर्वेला खूप जास्त तारे दिसत आहेत. सप्तर्षी चांगलेच वर येत आहेत.

सैरभैर डायरी - २.१

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 05/01/2026 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग २: पिथौरागढ़ भ्रमंती

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 02/01/2026 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
३ डिसेंबरची‌ सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची‌ शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़!

खूप थंडी आहे यंदा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 18/11/2025 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? ब्लॅंकेट काढ. पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. मग दुलई काढ. दुलई फार हलकी आहे वजनाला. मग ब्लॅकेट काढ. ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? मग दुलई काढ. दुलई थोडी आपरी आहे. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट अंगाला टोचते. मग दुलई काढ. दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. मग दुलई काढ. जाऊद्या. आपली गोधडीच बरी आहे.