Skip to main content

राजकारण

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७

लेखक धर्मराजमुटके यांनी शुक्रवार, 27/01/2017 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल. काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला. प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे.

"कॅश-लेस" आणि "लेस-कॅश" मधिल संभ्रम : खरोखरचा की बनवलेला ???

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 08/12/2016 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
सद्या "कॅश-लेस अर्थव्यवस्था = १००% कॅश-लेस ट्रन्झॅक्शन्स" हे चुकीचे समीकरण सिद्ध करण्यासाठी तथाकथित विचारवंत राजकारणी आणि अर्थतज्ज्ञांमध्ये अहमहमिका चालली आहे. ती इतक्या अतीरेकी स्तरापर्यंत ताणली जात आहे की, त्यामागे असलेला, शाब्दीक विपर्यास करून सामान्य जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न जास्त जास्त उघड होत चालला आहे. नकद व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार करण्याला वाव असतो आणि नकद न वापरता केलेल्या व्यवहारांत भ्रष्टाचार करणे फार कठीण असते.

नगरपालिका निवडणुका २०१६.

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी रविवार, 27/11/2016 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात सध्या नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मतदान चालू आहे.२०१४ साली झालेले सत्तांतर ,त्यात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेलेला जनाधार.अच्छे दिनची दाखवलेली स्वप्ने ,या पार्श्वभुमीवर या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या निवडणुका १६४ ठीकाणी होत आहेत ,या निवडणुकांचे निकाल लगेच उद्या लागणार आहेत ,त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.जे मतदार आहेत त्यांनी जरुर आपला मतदानाचा हक्क बजवावा.धन्यवाद.

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 14/11/2016 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३.

एक मरा'ठी', लाख मरा'ठी'

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 18/10/2016 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
मोर्चाला उदंड प्रतिसाद! खरंच गंमत वाटते या सगळ्या लोकांची. केवढा जमाव, केवढी बांधाबांध, घोषणा, सोशल मिडियावर संदेश... सॉलिड सगळं. पण नक्की कशासाठी आहे हे? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला केला तर कदाचित उत्तर चटकन मिळणार नाही. कारण तसा विचारच केलेला नसेल. आणि तेच हवं असतं मोर्च्याच्या मागे असणार्‍या मंडळींना. पण आश्चर्य वाटतं की कुणाचाच विचार व्यापक कसा होत नाही? पदोपदी आपल्याला मॅनिप्युलेट केलं जातंय तरी कळूच नये ही गोष्ट? म्हणजे मोजके लोक हजारो लोकांना एका अशा गोष्टीसाठी एकत्र आणू शकतायत, जी गोष्ट मिळेल, न मिळेल, तिचा आपल्याला नेमका काय फायदा होईल याची काडीमात्र कल्पना त्या लोकांना नाही.

साहेबांची अमेरिकावारी !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 15/10/2016 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आता भारतीय राजकारणात काही करण्यासारखं उरलेलं नाही असं वाटल्याने साहेबांचा मोर्चा डोनाल्ड ट्रंपकडे वळला आहे....काय होईल आता अमेरिकेत ? खालीलपैकी काही पर्याय की अजून काही ? ब्रेनस्टॉर्मिंग करुया जरा ! १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला मूक मोर्चे.... २. ट्रंपची राजकीय शिकवणी.... ३. ओबामाची प्रकरणं अमेरिकन मीडियाद्वारे उघडकीस ? ४. दुहेरी मतदान ? ५.अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ? ६.तिथले साखर कारखाने आणि त्यांची निवडणूक घेणार ? ७. ट्रंप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं आश्वासन ?

इसिसमध्ये सामील होणारे युवक/युवती

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 03/08/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
सिरिया व इराक मध्ये इसिसचा उदय झाल्यापासून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशातील मुस्लिम तरूण, तरूणी इसिसमध्ये सामील होऊन इस्लामसाठी लढून हुतात्मा होण्यासाठी सिरीयामध्ये जात आहेत अशा बातम्या येत आहेत. भारतातील केरळमधील व महाराष्ट्रातील काही मुस्लिम युवक, युवती आधीच इसिसमध्ये भरती झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. गर्भवती मुस्लिम तरूणींनी सिरिया/इराकमधील इसिसच्या अधिपत्याखालील इस्लामच्या पवित्र प्रदेशात येऊन मुलांना जन्म द्यावा असे इसिसने आवाहन केल्याचे २-३ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते.

ताज्या घडामोडी - १

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 14/07/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.

खडसे पुराण

लेखक दिव्य यांनी रविवार, 05/06/2016 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
जळगावातील नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर एक नवीनच चर्चा सुरू झाली. ब्राम्हण अाणि बहुजन अशा या चर्चेला फाेडणी देण्याचे काम नारायण राणे यांनी दिले. तसे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील राजकारणात ब्राम्हण विरूद्ध बहुजन या चर्चेला सुरूवात झालीच हाेती. खरतर खडसेंना बहुजनांचे नेते म्हणता येणार नाही. खडसेंचा प्राबल्य हे खान्देशात त्यातच जळगाव जिल्ह्यात. त्यांना जळगाव जिल्ह्यात अाव्हान देणारे दुसरे भाजप नेते गिरीश महाजन हे बहुजन. परंतु ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले ते ब्राम्हण म्हणून नवे.

भारताचा नकाशा

लेखक विकास यांनी सोमवार, 30/05/2016 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा नकाशा कसा असावा या संदर्भात अनेक वादविवाद आहेत. त्यातील सगळ्यात महत्वाचा वाद हा मुख्यत्वे काश्मीर कसे दाखवले आहे यावरून होतो. इशान्येकडील राज्यांच्या संदर्भात देखील आंतर्राष्ट्रीय सीमा दाखवताना वाद घडत असतो. अरूणाचल प्रदेश हे त्याचे एक उदाहरण झाले. अरूणाचल प्रदेशाला चीन स्वत:चा भाग समजतो आणि कुरघोडी करत असतो. जगात आंतर्राष्ट्रीय सीमावाद सगळ्यात जास्त कुठे असतील तर ते भारतीय उपखंडात आणि भारत-चीन सीमांतर्गत आहेत असे म्हणल्यास अतिशयोक्ती ठरू नये.