Skip to main content

राजकारण

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 18/05/2016 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १९ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यासाठी हा धागा. सर्व राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज केवळ बातमी म्हणून देत आहे.

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)

लेखक गॅरी ट्रुमन यांनी बुधवार, 09/03/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक या आधीच्या धाग्यावर १६० पेक्षा जास्त प्रतिसाद आले आहेत. त्यामुळे भविष्यात चर्चा वाचणे सोयीचे व्हावे या उद्देशाने हा नवा धागा काढत आहे. त्या धाग्यात उल्लेख झालेल्या मुद्द्यांवर काही मते मांडायची असतील तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत आणि नवे मुद्दे या धाग्यावर मांडावेत ही विनंती. गरज भासल्यास तिसरा धागाही भविष्यात काढेन. तसेच भारतातल्या निवडणुकांप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी स़काळपासून निकाल पोस्ट करायचाही मानस आहे.

जनेविची संभाव्य प्रश्नपत्रिका!

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 02/03/2016 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या पोलिटिकल सायन्सच्या पेपरात यंदा काय प्रश्न असतील, याचा एक अंदाज! (वि. सू. - हलके घ्यावे) १. हुतात्मा इशरत जहां यांचे संक्षिप्त चरित्र २०० शब्दात लिहा. २. फरक सांगा: अफजल गुरू यांचा न्यायिक खून आणि इशरत जहां यांचा अतिन्यायिक खून. ३. संदर्भासहित स्पष्टीकरण द्या: "भारत हा एक तुरुंग आहे" ४. अजमल कसाब आणि याकूब मेनन यांच्या विचारधारांमधील साम्य दाखवा. ५. माओवाद, नक्षलवाद, जिहाद आणि निधर्मीवाद हे परस्परपूरक आहेत का? उदाहरणासह युक्तिवाद करा. ६. मुमताज कादरी हे कोण होते? त्यांची भगतसिंहांशी तुलना करा. ७.

जगभरातील परंपरावादी राजकिय पक्ष आणि निवडून आलेले अध्यक्ष/पंतप्रधान

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 26/02/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपा आणि नमो सरकारचे सर्वच आलबेल आहे असे म्हणावयाचे नाही, जबाबदार विरोधी पक्षांची लोकशाहीत महत्वाची भूमिका असते, अर्थात यातील 'जबाबदार' हा शब्द महत्वाचा आहे, आणि सध्याचा विरोधीपक्ष जबाबदारीने जबाबदारी पार पाडतोय अशी स्वत:ची शाब्बासकी स्वतःच समर्थकांनी भले द्यावी पण अनुनयवादातून बाहेर पडून त्यांनी त्यांच्या सेक्युलरभूमिका खरेच किती शुद्ध आणि निष्पक्ष वागवल्या आहेत, त्यांच्याकडून अराजकतेचे समर्थन तर होत नाहीएना हा तटस्थ निरीक्षकांसाठी अद्यापतरी साशंकतेचा भाग असावा.

तर भाषणस्वातंत्र्याच्या या कथेतले ढोंगी कोण ? हंस की बगळा ??

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 26/02/2016 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
"एक बदक, एका मोराला 'कबुतर' म्हणाला" असे हंसाने बगळ्याला सांगितले; तर मोराला 'कबुतर' म्हणावयाची चूक कोणी केली? बदकाने का हंसाने ? कोणताही शहाणा माणूस चूक (असलीतर) बदकाची आहे म्हणेल, हंस बगळ्याला जे घडले आहे ते सांगतो आहे पण बगळा हंसाशी उलटा कसा भांडतो बघा बदकाचा संवाद माझ्या समोर कुणी म्हटला हंसाने म्हटला म्हणजे बदक नव्हे तर हंसच दोषी आहे.

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६

लेखक गॅरी ट्रुमन यांनी बुधवार, 24/02/2016 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अमेरिकेत होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकांचे पडघम वाजू लागलेच आहेत.त्यासंदर्भातील घडामोडींविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे. या निमित्ताने मला जेवढी अध्यक्षीय निवडणुकांविषयीची माहिती आहे ती सर्वप्रथम लिहितोच.त्यातील चुका/त्रुटी दाखविणे, नवीन माहितीची भर टाकणे इत्यादी गोष्टी मिपाच्या परंपरेप्रमाणे होतीलच.मराठी आंतरजालावर अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांसाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल असे स्वरूप या धाग्याला द्यायचा उद्देश आहे.तो उद्देश कितपत साध्य होतो हे बघू.

ईशान्येच राजकारण

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/01/2016 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर आणि पूर्व दिशांच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य. नागपूर हा भारताचा मध्य पकडल्यास बंगाल, आसाम, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपूरा हे प्रदेश इशान्येला आहेत. ब्रह्मदेश, चीन, भूतान आणि नेपाळ ह्या देशांच्या सिमा भारताच्या ईशान्येच्या राज्यांना टच करतात. अगदीच मोठी घटना असल्याशिवाय ईशान्येला काय -राजकारण आणि इतरही- काय शिजतय याची गंधवार्ता कानावर कमी पडते आणि चर्चा ही कमी होते.

"कुत्र्याला खीर पचली नाही"

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 18/01/2016 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपाल सबनीस हे नाव मी त्यांची यंदाचे साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा प्रथमच वाचले. "हे सबनीस कोण?" असा प्रश्नही अनेकांकडून उघड ऐकला. श्रीपाल सबनीस यांचे निकटवर्तीय (पण बहुतेक आता दुरावलेले) पत्रकार घनश्याम पाटील यांनी "कुत्र्याला खीर पचली नाही" या शीर्षकाचा एक लेख लिहून सबनीस यांच्या उरल्यासुरल्या अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर टांगली आहेत. साहित्यजगतात इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण होत असेल आणि ते निर्लज्जपणाने करणारी व्यक्ती संमेलनाध्यक्षपदापर्यंत पोचत असेल यावर चटकन विश्वास बसत नाही. सदर लेख आंतरजालावर सहज उपलब्ध आहे. परंतु भ्रमणध्वनी हस्तसंचावरून दुवा डकवणे कठीण जात आहे.

शेवटी न्यायालय, संसद, विधीमंडळे आणि सामान्य जनतेचे काय ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 08/12/2015 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी गोष्ट रोज घडली तर त्याकडे सर्वसामान्यपणे दुर्लक्ष केले जाते या अर्थाची 'रोज मरे, त्याला कोण रडे' अशी मराठी भाषेत म्हण आहे. आला दिवस गेला दिवस संसदेचे काम बंद पाडूनच अथवा रस्त्यावर उतरुनच आपला आवाज दाखवायचा या सर्वच राजकीय पक्षांच्या नितींचा एक सामान्य माणूस म्हणून कंटाळा आला आहे, मग असे उद्योग करणारे कोणत्या अबकड पक्षाचे आहेत का हळक्षज्ञ पक्षाचे आहेत त्याने काहीच फरक पडत नाही.

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 30/11/2015 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.