Skip to main content

राजकारण

शरद पवारांची महामुलाखत

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी रविवार, 25/02/2018 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच राज ठाकरे ह्यांनी शरद पवारांची २/२.५ तासाची प्रदीर्घ मुलाखत घेतली. पुण्याच्या बी.एम.सी.सी. जेथे पवारांनी शिक्षण घेतले तेथे ही मुलाखत झाली. मिडियातर्फे ही 'महामुलाखत' म्हणून जाहिरात करण्यात येत होती. प्रश्न गोपनीय आहेत असे रा़ज ठाकरे म्हणाले.पवारांना राजकारणाचा राज्य्,राष्ट्रीय स्तरावर प्रदीर्घ अनुभव असल्याने काहीतरी वेगळे ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती.

मतमोजणीपूर्व धागा: गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुक-२०१७

लेखक गॅरी ट्रुमन यांनी मंगळवार, 12/12/2017 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गुजरातमध्ये दुसर्‍या टप्प्यात मतदान १४ डिसेंबरला होईल. हिमाचलमध्ये मतदान नोव्हेंबर महिन्यातच पार पडले आहे. दोन्ही राज्यात मतमोजणी १८ डिसेंबरला होईल. एक्झिट पोलचे निकाल १४ (किंवा १५) तारखेला येतील. ते निकाल यायच्या आत नेहमीप्रमाणे मतमोजणीपूर्व धागा प्रकाशित करत आहे. एक्झिट पोलचे निकाल यायच्या आतच हा धागा प्रकाशित करत आहे कारण नाहीतर एक्झिट पोलचे निकाल बघून काही प्रमाणात बायस्ड व्हायची शक्यता आहे. माझ्या मते गुजरातमध्ये भाजप १३० ते १३५ आणि काँग्रेस ४० ते ४५ जागा जिंकेल. तर हिमाचल प्रदेशात भाजप ४० ते ४५ तर काँग्रेस २० ते २५ जागा जिंकेल.

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शुक्रवार, 01/12/2017 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे. खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत.

इंदिरा गांधी जन्मशताब्दी

लेखक गॅरी ट्रुमन यांनी रविवार, 19/11/2017 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जन्मशताब्दी आहे.त्याबद्दल त्यांना अभिवादन. 1 या निमित्ताने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात लिहितो. एक भारतीय म्हणून मला वाटते की त्यांची कारकिर्द भारतासाठी संमीश्र होती. म्हणजे त्यांनी देशासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या आणि काही वाईट गोष्टीही. चांगल्या गोष्टींपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी देशाला एक कणखर नेतृत्व दिले.

ताज्या घडामोडी: भाग ८

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 27/07/2017 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे. धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join… या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली.

शिवसेना..... ???

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/07/2017 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष. छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही. सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत.

सोनू निगम, अभिजित आणि ट्विटरवरचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य

लेखक सच्चिदानंद यांनी बुधवार, 24/05/2017 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
तर सोनू निगम ने भलं मोठ्ठं पत्र लिहून ट्विटर सोडण्याची घोषणा केली आणि आधीच सुरु असलेल्या गोंधळात अजून नवी भर पडली. पण यातून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. पार्श्वभूमी अशी की, भाजपाच्या काही लोकल नेत्यांचा एका सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या किती खर्‍या-खोट्या की नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावरचे आरोप ते सिद्ध व्हायचे तेव्हा होइल.

टेस्ला वि. कार डीलर्स: एक डिस्रप्शन व त्याला होत असलेला विरोध

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 08/05/2017 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
टेस्ला च्या कार विकण्यासंबंधी एक लेख नुकताच वाचला. मी पूर्वी टाटा मोटर्स (तेव्हाची "टेल्को") मधे काही वर्षे काम केलेले असल्याने एकूणच ऑटो इण्डस्ट्री तील बातम्यांबद्दल अजूनही कायम कुतूहल असते. तेव्हा मी टेल्को च्या सॉफ्टवेअर डिव्हिजन मधे सप्लाय चेन एरिया मधे - वाहने बनवायला लागणारा माल सप्लायर्स कडून कंपनीत येण्याबद्दलची प्रक्रिया- काम करत होतो. पुण्यातील प्लॅण्ट्स मधे उत्पादनावर जास्त फोकस होता. त्यात त्या "सेल" शी संबंधित गोष्टी कामात थेट येत नव्ह्त्या त्यामुळे त्याबद्दल माहिती नव्हती.

ताज्या घडामोडी : भाग ५

लेखक गॅरी ट्रुमन यांनी मंगळवार, 11/04/2017 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे. दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता.

पंजाब, गोवा, उत्तराखंड विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणीपूर्व धागा

लेखक गॅरी ट्रुमन यांनी रविवार, 05/03/2017 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मतमोजणीपूर्व या दुसर्‍या धाग्यात पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांविषयी भाष्य करणार आहे. याबरोबरच मणीपूर या पूर्वोत्तर भारतातील राज्यातही विधानसभा निवडणुक होत आहे. पण या राज्याच्या राजकारणाविषयी भाष्य करण्याइतकी माहिती मला नाही. त्या राज्याचे मुख्यमंत्री कोण, कोणत्या पक्षाचे हे पण मला माहित नाही. कधीकधी आपण पूर्वोत्तर भारतात फार रस घेत नाही आणि त्यातूनच त्या भागातील लोक दुरावले जातात. कळत नकळत माझ्यासारख्याकडूनही तेच होते आणि त्याचे वाईटही वाटते. प्रत्येक वेळी ठरवितो की यापुढे असे करायचे नाही-- इतर सगळ्या राज्यांप्रमाणे उत्तरपूर्वेतील या राज्यांचीही माहिती घ्यायची.