शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
120080
प्रतिक्रिया
329
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला एवढे पटत कि लोक मते द्याल
तशी गर्दी अनेकांच्या
In reply to मला एवढे पटत कि लोक मते द्याल by एकुलता एक डॉन
कैच्या कै! म्हणजे विरोध वगैरे
In reply to तशी गर्दी अनेकांच्या by श्रीगुरुजी
मोदी लाट असून पण एवढी मते
In reply to तशी गर्दी अनेकांच्या by श्रीगुरुजी
अनेकवेळा अशी गर्दी दिसते.
In reply to मोदी लाट असून पण एवढी मते by एकुलता एक डॉन
अनेकवेळा अशी गर्दी दिसते.
In reply to मोदी लाट असून पण एवढी मते by एकुलता एक डॉन
अहो शुकशुक विजुभाऊ,
नाही हो. पक्की मते वगैरे काही
In reply to अहो शुकशुक विजुभाऊ, by जेम्स वांड
आणि अशी कोणती गोष्ट होती की
In reply to नाही हो. पक्की मते वगैरे काही by विजुभाऊ
या वेळेस शिवसेने ने नक्की असे
श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल तर
In reply to या वेळेस शिवसेने ने नक्की असे by आदूबाळ
खरा माना असं म्हणालो का? वाचा
In reply to श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल तर by श्रीगुरुजी
तो अहवाल अत्यंत पक्षपाती व
In reply to खरा माना असं म्हणालो का? वाचा by आदूबाळ
त्या "आतल्या" गोष्टी आहेत.
त्या "आतल्या" गोष्टी आहेत.
माझ्यामते पोलिस,निमल्ष्करी
१९९२-९३ ची दंगल दोन भागात
In reply to माझ्यामते पोलिस,निमल्ष्करी by कानडाऊ योगेशु
सूर्यराव (हा भिवंडीचा
In reply to १९९२-९३ ची दंगल दोन भागात by श्रीगुरुजी
बहुतेक हेच नाव होते.
In reply to सूर्यराव (हा भिवंडीचा by आदूबाळ
टाईमलाईन्स
In reply to १९९२-९३ ची दंगल दोन भागात by श्रीगुरुजी
तुमच्या मेंदूची रॅम किती आहे.
In reply to टाईमलाईन्स by गॅरी ट्रुमन
शत प्रतिशत सहमत !
In reply to तुमच्या मेंदूची रॅम किती आहे. by मोदक
धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे
In reply to टाईमलाईन्स by गॅरी ट्रुमन
धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे
In reply to धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे by श्रीगुरुजी
सुपारी द्यायची आहे काय? ;)
In reply to धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे by उपाशी बोका
गॅरी ट्रूमन आणि श्रीगुरुजी
In reply to धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे by उपाशी बोका
गॅरी ट्रूमन आणि श्रीगुरुजी एकच आहेत काय?नाही.सुधाकररावांचा उत्तराधिकारी
In reply to टाईमलाईन्स by गॅरी ट्रुमन
सुधाकररावांचा उत्तराधिकारी नेमण्याच्या आमदारांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यावेळी हा निर्णय दिल्लीवर सोडायचे ठरविले. माझ्या आठवणीप्रमाणे ही बैठक २६ फेब्रुवारीला झाली होती. त्यानंतर ४-५ दिवस सुशीलकुमार शिंदे, पद्मसिंग पाटील अशा नावांची चर्चा होत राहिली. पण ३ की ४ मार्चला नरसिंह रावांनी शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून परत पाठवायचा निर्णय जाहिर केला. ६ मार्च १९९३ रोजी शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.नाईकांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी नवीन मुख्यमंत्री नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. काँग्रेसमध्ये एक पवारांचा गट होता, तर दुसरा गट पवार विरोधकांचा होता ज्यात शंकाराव चव्हाण, विलासराव देशमुख, पुण्यातील प्रकाश ढेरे, विठ्ठलराव गाडगीळ, सुशीलकुमार शिंदे इ. चा समावेश होता. परंतु पवार समर्थकांची संख्या जास्त होती. पवार मुंबईत येऊन जातीने सूत्रे हलवित होते. त्यांना आपल्या समर्थकाला मुख्यमंत्री करायचे होते. एकंदरीत बहुसंख्य आमदार पद्मसिंह पाटलांच्या बाजूने दिसत होते. दुसरीकडे दिल्लीत नरसिंहराव दिल्लीतून अत्यंत धूर्तपणे सूत्रे हलवित होते. बाबरी मशीद प्रकरण त्यांच्या अंगावर शेकू पहात होते. त्यांना हटविण्याची कारस्थाने सुरू झाली होती. परंतु त्यांच्या विरोधात अर्जुनसिंग व पवार असे दोन तगडे नेते होते व या दोघांमध्ये काँग्रेस समर्थक विभागले गेले होते. अर्जुनसिंगांची सुरवातीपासूनच १० जनपथशी जवळीक होती. अशा वेळी दोघांपैकी निदान एक विरोधक तरी संपवावा अशा चाली नरसिंहराव रचत होते. मुंबईत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत पद्मसिंह पाटील पुढे होते तरी त्यांच्या नावावर एकमत होत नाही असे कारण दाखवून नरसिंहरावांनी केंद्रीय निरीक्षक मुंबईत पाठविले. निरीक्षक मुंबई विमानतळावर उतरल्या उतरल्या त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली. "आम्ही इथे डोकी मोजायला आलेलो नाही" असे निरीक्षकांनी सांगताच पद्मसिंह पवारांचा पत्ता कट झाल्याचे व नरसिंहरावांनी नक्की केलेले नाव आमदारांना सांगण्यासाठी निरीक्षक मुंबईत आल्याचे पत्रकारांनी ओळखले. नरसिंहरावांनी धूर्तपणे मुख्यमंत्रीपदासाठी पवारांचे नाव नक्की करून त्यांना बोलावून या निर्णयाची माहिती दिली. अपेक्षेप्रमाणे पवारांनी मुंबईत परत जाण्यास नाखुषी दर्शविली कारण त्यांना नरसिंहरावांच्या जागी बसायचे होते. नंतर नरसिंहरावांनी धूर्तपणे पवारांना सांगितले की महाराष्ट्र अतिशय गंभीर परिस्थितीतून जात आहे व अशा वेळी तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. समजा तुम्हाला मुंबईत परत जायचे नसेल तर मग मी आमदारांमधून वेगळ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करीन. हे ऐकल्यावर पवारांचे धाबे दणाणले. आधीच नाईकांनी पवारांना व त्यांच्या समर्थकांना बरेच त्रस्त करून सोडून त्यांच्या साम्राज्याला हादरे दिले होते. आता नाईकांच्या जागी आपल्या विरोधातला एखादा नवीन माणूस आला तर आपला महाराष्ट्रातील उरलासुरला प्रभावही कमी होईल हे ओळखून पवारांनी अत्यंत नाईलाजाने केंद्रातील मंत्रीपद सोडून राज्यात परत जायचे कबूल केले व अशा तर्हेने नरसिंहरावांनी आपला एक प्रबळ प्रतिस्पर्धी विनासायास दूर केला.श्रीगुरुजी,
In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी
जी.के. मूपनार
In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी
गुरुजी छान विश्लेषण...
In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी
विद्यापीठ नामकरणाला पाठिंबा
In reply to गुरुजी छान विश्लेषण... by विशुमित
विद्यापीठ नामकरणाला पाठिंबा ह्या मुद्द्याने सुद्धा पवारांना पंतप्रधान होण्यास अडथळा निर्माण झाला होता.नामांतराचा अजिबात संबंध नाही. पवारांना पंतप्रधान होण्याची एकमेव संधी १९९१ मध्ये होती. नामांतर १९९४ मध्ये झाले. पवारांनी १९७८ पासून अनेकांचा विश्वासघात केला होता. १९७८ मध्ये त्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. १९८६ मध्ये काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केल्यानंतर ते तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांना घालविण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यानच्या काळात पुण्यात नाक खुपसून कलमाडीच्या माध्यमातून विठ्ठलराव गाडगीळांना शह देण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांनीच गाडगीळांना १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पाडले. १९७८ ते १९८६ या काळात काँग्रेसबाहेर असताना ते काँग्रेसला व इंदिरा गांधींना सपाटून शिव्या घालायचे. त्यामुळे गांधी घराण्याचा त्यांच्यावर फारसा विश्वास कधीच नव्हता. एकंदरीत त्यांनी महाराष्ट्रात व काँग्रेसमध्ये अनेक शत्रू निर्माण करून ठेवले होते. त्यामुळेच १९९१ पंतप्रधान होण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातूनसुद्धा पुरेसा पाठिंबा मिळाला नव्हता.चव्हाण, देशमुख, पाटील यांना कुणब्या पवारांच्या नेतृत्वात राहायचं नव्हतं, हे पण सत्य आहे. मला जातीय टिपणी करायची नाही पण अजून ही लोक खाजगीत असंच बोलतात... असो..कारणे वरीलप्रमाणेच. अर्थात पवार हे ९६ कुळी मराठाकिंवा श्रेष्ठ मराठा समजले जात नव्हते हे सुद्धा सत्य आहे.(मराठा स्ट्रॉंग मन ही कुठल्या बहाद्दराने पवारांना उपाधी दिली काय माहित?)इंग्लिश माध्यमांनी हा शद्ब शोधला.परंतु पवार समर्थकांची संख्या
In reply to सुधाकररावांचा उत्तराधिकारी by श्रीगुरुजी
वर याचे स्पष्टीकरण दिले आहे.
In reply to परंतु पवार समर्थकांची संख्या by चिनार
<<<<पद्मसिंह पाटील पवारांचे
In reply to वर याचे स्पष्टीकरण दिले आहे. by श्रीगुरुजी
माझे मत
त्यावेळी बाळासाहेबांनी
In reply to माझे मत by सौन्दर्य
द्यायला नको होते?
In reply to त्यावेळी बाळासाहेबांनी by मराठी_माणूस
खंडणीच्या बदल्यात
In reply to त्यावेळी बाळासाहेबांनी by मराठी_माणूस
हे काहीतरी नवीनच ऐकतोय मी,
In reply to खंडणीच्या बदल्यात by श्रीगुरुजी
बाळासाहेब/शिवसेनेने खंडणी
In reply to खंडणीच्या बदल्यात by श्रीगुरुजी
हा हा
In reply to बाळासाहेब/शिवसेनेने खंडणी by जेम्स वांड
पुरावे
In reply to खंडणीच्या बदल्यात by श्रीगुरुजी
शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि
शिवसेनेने मागील ५१ वर्षात
In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by सतिश पाटील
अत्यंत पोकळ प्रश्न आहे. वरील
In reply to शिवसेनेने मागील ५१ वर्षात by श्रीगुरुजी
उत्तर मिळाले. धन्यवाद!
In reply to अत्यंत पोकळ प्रश्न आहे. वरील by हतोळकरांचा प्रसाद
चला हे एक बरे झाले! आता
In reply to उत्तर मिळाले. धन्यवाद! by श्रीगुरुजी
भाजपचे नाव घातले तर पुष्कळ
In reply to चला हे एक बरे झाले! आता by हतोळकरांचा प्रसाद
पहा बरे किती सिलेक्टिव्ह असतो
In reply to भाजपचे नाव घातले तर पुष्कळ by श्रीगुरुजी
तेच विचारतोय मी. शिवसेनेने
In reply to पहा बरे किती सिलेक्टिव्ह असतो by हतोळकरांचा प्रसाद
हाहा! तेच तेच परत परत
In reply to तेच विचारतोय मी. शिवसेनेने by श्रीगुरुजी
जलयुक्त शिवार यशस्वी नाही आहे
In reply to हाहा! तेच तेच परत परत by हतोळकरांचा प्रसाद
>>> शिवजलक्रांती योजना होती
In reply to हाहा! तेच तेच परत परत by हतोळकरांचा प्रसाद
प्रश्नावर प्रश्न
In reply to >>> शिवजलक्रांती योजना होती by श्रीगुरुजी
मी याचे उत्तर आधीच दिले आहे.
In reply to प्रश्नावर प्रश्न by हतोळकरांचा प्रसाद
बरं मग ते शिवजलक्रांतीचं झालं
In reply to मी याचे उत्तर आधीच दिले आहे. by श्रीगुरुजी
>>> आतापूरता हा सदा दुष्काळी
In reply to प्रश्नावर प्रश्न by हतोळकरांचा प्रसाद
दंडवत घ्या गुरुजी! तरी बरं
In reply to >>> आतापूरता हा सदा दुष्काळी by श्रीगुरुजी
जलयुक्त शिवार ही योजना
In reply to दंडवत घ्या गुरुजी! तरी बरं by हतोळकरांचा प्रसाद
दंडवत वर घातला आहेच!
In reply to जलयुक्त शिवार ही योजना by श्रीगुरुजी
मूळ योजना जून २०१५ मध्ये सुरू
In reply to दंडवत वर घातला आहेच! by हतोळकरांचा प्रसाद
वरील प्रतिसाद नीट वाचा!
In reply to मूळ योजना जून २०१५ मध्ये सुरू by श्रीगुरुजी
फुकाची बढाई
In reply to वरील प्रतिसाद नीट वाचा! by हतोळकरांचा प्रसाद
प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन
In reply to फुकाची बढाई by lakhu risbud
नुकत्याच झालेल्या शेतकरी
In reply to जलयुक्त शिवार ही योजना by श्रीगुरुजी
=)) =))
In reply to नुकत्याच झालेल्या शेतकरी by आदूबाळ
+१
In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by सतिश पाटील
नक्की काय योगदान आहे?
In reply to +१ by अनुप ढेरे
सरकॅझम समजैना का काय गुर्जी
In reply to नक्की काय योगदान आहे? by श्रीगुरुजी
फिदी फिदी फिदी . . . लोल
In reply to सरकॅझम समजैना का काय गुर्जी by अनुप ढेरे
शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि
In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by सतिश पाटील
कॉंग्रेसविरोधी लाट असती तर
In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by श्रीगुरुजी
अज्ञानमूलक प्रश्न
In reply to कॉंग्रेसविरोधी लाट असती तर by एकुलता एक डॉन
सहमत गुरुजी..
In reply to अज्ञानमूलक प्रश्न by श्रीगुरुजी
चालायचं च
In reply to शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि by सतिश पाटील
स्कॉर्पिओ जुनी झाली हो आता ..
In reply to चालायचं च by IT hamal
ते च हो...मतितार्थ महत्वाचा...
In reply to स्कॉर्पिओ जुनी झाली हो आता .. by चिनार
ते च हो...मतितार्थ महत्वाचा...
In reply to स्कॉर्पिओ जुनी झाली हो आता .. by चिनार
+1
In reply to चालायचं च by IT hamal
अजब सल्ला
सध्याच्या शिवसेनेची हालात,
+१
In reply to सध्याच्या शिवसेनेची हालात, by प्रसाद_१९८२
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.बाळ ठाकर्यांचे ते वाक्य हे जबाबदारी स्वीकारणे नसून उलट आम्ही हे केलेले नाही असेच सांगणारे होते. जेव्हा जेव्हा एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात तेव्हा तो नेता "मी जर भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर मला जाहीर फाशी द्या" किंवा "मी जर भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर मी राजकारणातून कायमचा निवृत्त होईन" असे जेव्हा सांगतो तेव्हा तो नेता केलेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी घेत नसून "मी भ्रष्टाचार केलेलाच नाही" असे ठासून सांगत असतो. बाळ ठाकर्यांचे जर-तरच्या स्वरूपातील वरील वाक्य मशीद शिवसैनिकांनी पाडली याची जबाबदारी स्वीकारणारे नसून ती जबाबदारी नाकारणारे आहे. जर बाळ ठाकरे केलेल्या कृत्याची जबाबदारी घेण्याइतके निर्भीड होते तर श्रीकृष्ण अहवालात त्यांच्यावर जोरदार ठपका ठेवल्यानंतर दंगलीची जबाबदारी न स्वीकारता त्यांनी तो अहवाल फेटाळून का लावला होता?मला ही तेच म्हणायचे होते.
In reply to बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही by श्रीगुरुजी
कारसेवक (?) कोणाच्या हाकेला
In reply to मला ही तेच म्हणायचे होते. by विजुभाऊ
सोडा गुर्जी
+१
In reply to सोडा गुर्जी by सुज्ञ
हे उघडपणे मुंबईत कोणाला
तशी गर्दी अनेकांच्या
बुर्हान वाणी
In reply to तशी गर्दी अनेकांच्या by प्रविन ९
अज्ञानमूलक उत्तर!
In reply to बुर्हान वाणी by श्रीगुरुजी
सुज्ञ यांच्या मताशी १०० %
उघडपणे विचारायचे धाडस नाही
हीच झुंडगिरी आता कळफलक
In reply to उघडपणे विचारायचे धाडस नाही by सुज्ञ
शाश्वत लोकशाहीची तुमची
In reply to हीच झुंडगिरी आता कळफलक by विशुमित
नका ताणू दादा,
In reply to शाश्वत लोकशाहीची तुमची by मोदक
शाश्वत लोकशाही ची माझी
In reply to शाश्वत लोकशाहीची तुमची by मोदक
आमचं चांगलं चालाय शाहू-फुले
In reply to हीच झुंडगिरी आता कळफलक by विशुमित
आमचं चांगलं चालाय शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा. हीच विचारधारा शाश्वत लोकशाहीला मजबूत ठेवील हा विश्वास आहे.जातीयवादी काड्या, मनसोक्त भ्रष्टाचार हीच शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा आहे का?तुम्ही शिवसैनिक आहात,
In reply to उघडपणे विचारायचे धाडस नाही by सुज्ञ
तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसैनिक डरत नाही वाघासारखा धाऊन जातो वगैरे बाष्कळ बडबड आणि डोकी भडकवणारी टाळ्याखाऊ वाक्ये पूर्वी चालायची. किंबहुना यावरच यांच्या प्रमुखांनी स्वतःची घरे पोसली पण हास्यास्पद झालंय आता सगळं . .शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे आणि त्यांचा मराठी बाणा सुद्धा एक शुद्ध फसवणूक आहे. एकीकडे मराठी, मराठी करताना दुसरीकडे यांनी प्रितिश नंदी चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, संजय निरूपम, राम जेठमलानी यांना राज्यसभेच्या खासदारकीची तिकिटे विकली. उत्तर भारतीय, बिहारींना विरोध करताना 'दोपहरका सामना' हे हिंदी वृत्तपत्र काढून संजय निरूपम या बिहारीला त्याचा संपादक केले. यांची मुले कॉन्व्हेंट मध्ये शिकली. मुंबईत येणार्या अमराठींना शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, आधार पत्र, निवासी दाखला, रिक्षा चालक परवाना, टॅक्सी चालक परवाना इ. मिळवून देण्यात इतर पक्षांप्रमाणे यांचे नगरसेवक सुद्धा होते. मुंबई महापालिकेची बहुसंख्य कंत्राटे अमराठींना देण्यात हेच पुढे होते. वाघाचा पंजा, डरकाळी असले हास्यास्पद शब्द वापरून हे स्वतःचेच हसे करून घेतात. आता तर २० कोटींचा ६ मजली 'मातोश्री २' हा नवीन बंगला बांधत आहेत. हे शेतकर्यांच्या नावाने सारखा हंबरडा फोडत असतात. आत्महत्या केलेल्या प्रत्येक शेतकर्याच्या कुटुंबाला यांनी या २० कोटीतून प्रत्येकी १ लाख रूपये दिले असते, तर २००० कुटुंबांना आधार मिळाला असता. पण स्वतः खिशातून १ रूपया सुद्धा द्यायचा नाही, लंडनमध्ये जाऊन महिनाभर मजा मारायची आणि आम्हीच शेतकर्यांना कर्जमाफी मिळवून दिली अशा गफ्फा हाणायच्या यात हे वाकगबार आहेत. बाळ ठाकरे गेल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार शिवाजी पार्क मैदानावर केले. त्यानंतर यांनी हे संपूर्ण मैदानच स्मारकासाठी बळकावण्याचा प्रयत्न केला होता. अंतिम संस्कारानंतर जवळपास महिनाभर दहनासाठी उभारलेला चौथरा तसाच ठेवून रोज त्यावर हार, फुले वाहून त्या चौथर्याचे समाधीस्थळ करण्याचा यांचा प्रयत्न होता. महापालिकेने किंवा अतिक्रमण विभागाने चौथरा काढू नये यासाठी शिवसैनिक २४ तास पहारा देत होते. शिवाजी पार्क स्मारकासाठी देऊन टाका अशाही मागण्या होत होत्या. शेवटी केतन तिरोडकर व इतर काही जण याविरूद्ध न्यायालयात गेल्यानंतर चौथरा काढून टाकून मैदान फक्त खेळासाठी वापरण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शेवटी पोलिस बंदोबस्तात तो चौथरा हटविण्यात आला. तसे झाले नसते तर ते मोठे मैदान यांनी गिळंकृत केले असते.'मातोश्री २'
In reply to तुम्ही शिवसैनिक आहात, by श्रीगुरुजी
छान
<<<या एकाच वाक्यातून भाजप
In reply to छान by सुज्ञ
लोल
In reply to <<<या एकाच वाक्यातून भाजप by विशुमित
गुंडगिरी करू शकत नाहीत कारण
<<<<आणि त्याबरोबर १०.१० मि.
In reply to गुंडगिरी करू शकत नाहीत कारण by तेजस आठवले
तुम्हाला नोटा म्हणायचे असेल
In reply to <<<<आणि त्याबरोबर १०.१० मि. by विशुमित
मात्रा चुकला वाटतं. नोटा च
In reply to तुम्हाला नोटा म्हणायचे असेल by हतोळकरांचा प्रसाद
+१
In reply to <<<<आणि त्याबरोबर १०.१० मि. by विशुमित
शिवसेने ने महाराष्ट्रातील
वैयक्तिक अजेंडा
गुगलुन पाहिल्यावर सरपोतदारानी
>>> ( अवांतरः वाजपेयी सरकार
In reply to गुगलुन पाहिल्यावर सरपोतदारानी by विजुभाऊ
मोहन रावलेच
In reply to >>> ( अवांतरः वाजपेयी सरकार by श्रीगुरुजी
बर, ते बेळगावचे काय झाले?
जे खिशात ठेवलेल्या
In reply to बर, ते बेळगावचे काय झाले? by दशानन
का बुआ शेवटचा मराठी माणूस
In reply to जे खिशात ठेवलेल्या by श्रीगुरुजी
मुख्यमंत्री कुठे
In reply to का बुआ शेवटचा मराठी माणूस by हतोळकरांचा प्रसाद
बेळगाव आता परत महाराष्ट्रात
In reply to का बुआ शेवटचा मराठी माणूस by हतोळकरांचा प्रसाद
हे माहित असताना उगाच मोठी
In reply to बेळगाव आता परत महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
कदाचित त्यांनाही वास्तविकता
In reply to हे माहित असताना उगाच मोठी by हतोळकरांचा प्रसाद
एकुणात महाराष्ट्राची हालत
In reply to बर, ते बेळगावचे काय झाले? by दशानन
शेवटचा मराठी माणूस जिवंत
हम्म ..
In reply to शेवटचा मराठी माणूस जिवंत by विजुभाऊ
प्रसाद सर
मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि
In reply to प्रसाद सर by सुज्ञ
मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि
In reply to प्रसाद सर by सुज्ञ
म्हणजे ?
In reply to मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि by हतोळकरांचा प्रसाद
विभागणे या अर्थाने, किंवा
In reply to म्हणजे ? by सुज्ञ
प्रत्येक पक्षाने त्यांच्या
In reply to मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही धोरणे आणि विषय यात
In reply to प्रत्येक पक्षाने त्यांच्या by विजुभाऊ
शिवसेना आणि भाजपा आपापसात
शिवसेना आणि भाजप ला हिंदू
In reply to शिवसेना आणि भाजपा आपापसात by रामदास२९
ओवैसी आणि अबू आझमी हे दोघेही
In reply to शिवसेना आणि भाजपा आपापसात by रामदास२९
अडवाणी आणि चेले आग लाऊन स्वतः
टोल
खुप छान धागा !
नक्की
In reply to खुप छान धागा ! by धर्मराजमुटके
आपला द्वेष बाहेर काढणे
त्यात नवल काय?
In reply to आपला द्वेष बाहेर काढणे by वरुण मोहिते
दिवे लावणे वगैरे लिहून कृपया
In reply to त्यात नवल काय? by अभ्या..
>>> सेनेने काय केले हे कोणीच
In reply to दिवे लावणे वगैरे लिहून कृपया by विजुभाऊ
स्थानीय लोकाधिकार समिती
In reply to >>> सेनेने काय केले हे कोणीच by श्रीगुरुजी
स्थानीय लोकाधिकार समिती किंवा
In reply to स्थानीय लोकाधिकार समिती by सौन्दर्य
<<<<कोणत्याही पक्षाचे भवितव्य
In reply to स्थानीय लोकाधिकार समिती किंवा by श्रीगुरुजी
चष्मा बदला...
In reply to दिवे लावणे वगैरे लिहून कृपया by विजुभाऊ
भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस
In reply to चष्मा बदला... by राजाभाऊ
भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस इमारतीतल्या रहिवाश्यांच्या सुटके व्यतिरिक्त समाजकंटकांना जबरदस्त चोप देण्याचं काम त्यांनी केलं होतं.चला, सेनेने ५१ वर्षात केलेले १ काम सापडलं. अजून अशी काही कामे आहेत का?हि २ कामे होतात
In reply to भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस by श्रीगुरुजी
LOL
In reply to हि २ कामे होतात by एकुलता एक डॉन
शिवसेनेचे हे तिसरं काम--
In reply to भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस by श्रीगुरुजी
सुसंस्कृत तर आहोतच पण आमची
In reply to दिवे लावणे वगैरे लिहून कृपया by विजुभाऊ
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.राष्ट्रीय पातळीवर छोटाच आहे पण राज्यपातळीवर सत्तेत बसलेला, प्रथम क्रमांकाच्या पक्षापेक्षा थोडीशी कमी मते मिळालेला, कित्येक वर्षे सत्ताधारी पक्षाशी लढणारा पक्ष आहे. टोटल संसदेत नगण्य असला तरी इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा बरीचसे सातत्य ठेवून लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची ताकद असलेला पक्ष आहे.छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.दुसरे अज्ञानी विधान, जरा आमदारांची लिस्ट काढून पहा, कोकण, मराठवाडा, विदर्भ प. महाराष्ट्रात देखील सेनेचे आमदार आहेत आणि कित्येक जण १५ वर्षाहूनही अधिक वर्षे कट्टरपणे सेनेशी एकनिष्ठ आहेत.सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे.अवश्य. पण चष्मा चढवून आणि आधीच वर्तूळ काढून बाण मारणे नको.एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत.इतके वर्षे हिंदुत्वाचा जयघोष करुन वेळोवेळी प्रातःस्मरणीयांची यादी अपडेट करुन आता विकासाचा अजेंडा मिरवण्यामागील कारणे तशीच बाहेर येत नसतात.तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.असणारच.मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.संबंधही नाही, नुसती पुणे मुंबई आणि गिरण्या म्हणजे आक्खा महाराष्ट्र नव्हे.सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.अर्थात. स्थानिक राजकारणात जनतेची काय अपेक्षा असते ते जनतेने दाखवून दिले.बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.असतेच. विटा आणि कमंडलूसाठी कोण हिंडले हो आधी? प्रस्तावित रामंदिराची चित्रे हेडगेवारांची जन्मशताब्दीचे मुहूर्त साधून कोणी पोहोचवली? राम ह्या विषयावरील बहुतांशी हिंदूची जुळलेली नाळ कोणी राजकारणात एनकॅश केली?त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.त्याच्या आधीपासून सेनेचे बोर्ड अगदी गावोगावी होते, शाखाही अन कार्यकर्तेही.सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही. याबद्दलही काही विचारायचे नाही.अंदाजपंचे विधान, आपणास इंटरेस्ट असेल तर या एक्दा मराठवाड्यात अथवा प. महाराष्ट्रात. दाखवेन कित्येक संस्था. आता वेबवरील बातम्या अन लिंका ह्यावरच विश्वास ठेवून पूर्वग्रहाला मुंबईत बसून कुरवाळयाचे असेल तर नाईलाज आहे.लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.प्रोब्लेम काये? ह्यापेक्षा जहाल उपमा वापरल्या गेल्या आहेत. सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती. शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.जे सांगतात त्यांना विचारायचे. इथे दंगलीत सापडलेले कुणी आहेत का?हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती, राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते? एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.तत्कालीन राज्यकर्त्यांचे धोरण आणि अशा इमर्जन्सीत घडलेल्या तो घटनांचा परिपाक आहे. सेना अथवा पुलीस हे हुकुमाचे ताबेदार असतात. सेनेच्या कार्यकर्त्यांचा लोकल लेव्हलवर चांगला जनसंपर्क असल्याने त्यांनी काय भुमिका घेतली होती, त्याकाळात अॅक्चुअली काय घडले ह्याचे बरेचसे अहवाल वगैरे प्रकाशित आहेत, त्याची लिंक पण दिलेली आहे त्याचा अभ्यास करावा अथवा स्वतः एखादा अहवाल बनवावा.मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे. १९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवलेवरील सेम उत्तर.( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )का हो? सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्याची जितकी सरासरी असते तितकीच सेनेच्या नावावर पण असणार आहे. केवळ गुंडाचा पक्ष हिच टिका असेल तर महाराष्ट्रातील जनतेने आजपर्यंत इतके आमदार खासदार निवडूनच दिले नसते. त्यामुळे मुंबईत जाऊन उघडपणे बिनधास्त विचारा. जास्तीत जास्त काय होईल? वेडा म्हणतील. ह्यापेक्षा काही नाही. उंच ग्यालरीत बसून कुत्र्यांना छू करुन भुंकवून वैचारीक श्रीमंती दाखवणार्यानी असल्यांची पत्रास कशाला बाळगायची? . ............... आता बघा पटते का ते. केवळ पुणे मुंबई ठाणे इतकेच राजकारण माहीत असणार्यांनी सेनेच्या नावाने खडे फोडू नयेत. गिरणी कामगारांची आता कदाचित दुसरी तिसरी पिढी तरुण असेल. त्याकाळच्या राजकारणांचे संदर्भ आता उगाळून शिळ्या कढीला उत आणणे आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचे लेबल लावणे चूक आहे. अगदी माझ्या गावात सुद्घा वर्षानुवर्षे शिवसेनेचे राजकारण करणारे आमदार खासदार मी पाहतोय ते गिरणीकामगारांवर नव्हे तर लोकल प्रश्नांवर वेळोवेळी दिलेला लढा आणि प्रभावी जनसंपर्क ह्यावर निवडून आलेले आहेत. जनता ही स्त्रीसारखी असते म्हणतात. तिला शेपूट घालणारा अन वैचारिक काथ्याकूट करणारा नेता नको असतो. तिच्या प्रॉब्लेम्सना समजून, सामोरे जाऊन, काहीही करुन सोडवणारा नेता हवा असतो. साधे परवाचेच उदाहरण घ्या. गावात डुकरांचा प्रचंड त्रास झाला. लहान मुलांना पण हि डुकरे चावू लागली. निवेदने देऊन, मोर्चे काढूनही प्रशासन ढिम्म. सेनेच्या एकाने उचलले डुकराचे पिलू अन ठेवले आयुक्ताच्या केबिनात. तीन दिवसात जवळपास सर्व डुकरे पक्डली गेली. पिल्लू सोडणार्यांनी केसेस घेतल्या अंगावर पण मार्गी तर लागला ना प्रश्न. किती दिवस कागदी घोडे नाचवणार? आता अशा आंदोलनांचा विषय म्हणाल तर लहानपणापासून माझ्या जिल्ह्यात अन शेजारील चार पाच जिल्ह्यात शहरी जनतेसोबत, शेतकरी, कामगार अशा अनेक आंदोलनात मी सेनेचे नाव ऐकतोय. पाहतोय. आणि आम्ही मुंबईपासून चारपाचशे कीमी तरी दूर आहोत. मग सेनेने मुंबई दंगलीत काय केले हा प्रश्न जितका फिजूल आहे तितकाच मंदीर आंदोलनात इतर पक्षांनी काय केले हा प्रश्न. अगदी भाजपाचे उदो उदो चालू असले तरी राजकारणात सुरुवात शेटजी भटजींचा पक्ष म्हणूनच हिणवला गेला होता आणि ते संबोधन खरे असावे अशीच वाटचाल होती. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे मोहोळ असणारा मुंडेसाहेब सोडले तर दुसरा नेता सांगा. मुंडेसाहेबांचे राजकारण ही सेनेला जवळपास जाणारेच होते. ग्रामीण पार्श्वभुमीमुळे त्यांना महाराष्ट्रातील शेतकरी अन ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची जाण होती. स्व. महाजन साहेबांनी व त्यांनी सेनेशी नाळ जोडली. हिंदुत्व ह्या एकाच मुद्द्यावर ही युती झालेली होती. तेंव्हाची जनता ही बहुसंख्य हिंदूंचे प्रश्न व अन्यधर्मीयांचे लांगूलचालन अशा तत्कालीन राजकीय धोरणांना कंटाळून युतीच्या मागे उभी राहीली. त्याकाळातही भाजपाकडे कार्यकर्त्यांची वानवाच असायची, ते पुरवले सेनेने. राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अरेरावीला तसेच उत्तर द्यायची ताकद सेनेकडे होती. नुसता भाजपा कदापिहि ग्रामीण भागात उभा राहू शकला नसता. कित्येक भाग तर असे आहेत की ह्या ५-१० वर्षात भाजपा गावात नसायचा. फक्त माहीत असायचा. अर्थात आपले काम साधले की शिव्या देत देत पध्दतेशीरपणे मदत करणार्यांना विसरायचे हा टिपिकल भाजपी खाक्या आता दिसून येतोय. अगदी बलराज मधोकांपासून आडवाणींजीपर्यंत जे झाले ते आता सेनेबाबतीत होतेय. गोध्रा प्रकरणापासून मोदीकार्ड चालू शकेल हा अंदाज आला की बाकी सगळ्या गोष्टी विसरुन राजधर्म पाळता न येणार्या मोदींना लॉन्च केले गेले. आता विकास अन आक्रमक धोरणांचे जनता स्वागत करतीय ते केवळ हा माणूस आपले प्रश्न सोडवू शकेल, आपली प्रगती घडवू शकेल ह्या विश्वासाने. ह्यात भाजपाच्या धोरणांचा अन पक्षाचा विजय आहे असे समजण्यात गल्लत करु नये. इंदिरा इज इंडीयाला कसे प्रजेने शिस्तीत रस्ते दाखवले हेही विसरु नये. आता विचारसरणीबाबत म्हणले तर मी शिवसैनिक नाही की दुसर्या कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता. पण युजअॅन्डथ्रोची जी पॉलीसी अत्यंत गलिच्छ पणे राबवली जातीय अन ती कशी योग्यच आहे याचा उदोउदो करुन विरोधी विचारसरणी नसतानाही एकेकाळी गळ्यात गळे घालणार्या मित्रपक्षांना आता गरज संपली की असे झोडपले जाते त्याचा राग येतो. ह्या पॉलीसीला सपोर्टिंग ही जी सामूहिक हननाची मोहीम राबवली जातीय ती अत्यंत गलिच्छ आहे. स्वतं:ला माहीत असलेले तेवढे पूर्णसत्य असे मानणार्या विद्वानांकडून जी एकतर्फी आकडेवारी सादर करुन ह्या विचारसरणीला आंतरजालावर पसरवण्याच्या पध्दतीला गोबेल्सनीतीशिवाय दुसरी उपमा नाही. इतका द्वेष अन त्रास असेल तर सरळ सरळ काडीमोड घेऊन मोकळे व्हावे. सेना काय जबरदस्ती घुसणार नाहीये. पण एका घरात राहून संसाराचे वाटोळे गावभर करणार्याला गावाकडे काय म्हणतात ते वेगळे सांगणे नको.