टिपू सुलतान - इतिहास

sagarpdy काथ्याकूट
कालच कर्नाटकात टिपू सुलतान जयंती वादातून वरून दुर्दैवी घटना झाली. त्यात गिरीश कर्नाड यांनी "टिपू जर हिंदू असता तर त्याला आज कर्नाटकात ज्याप्रमाणे शिवाजीस महाराष्ट्रात मान मिळतो तसा मान मिळता" अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेवर तसेच कर्नाडांच्या वक्तव्यावर विविध राजकीय भाष्ये येत आहेत व पुढील काही दिवस येतीलच. या घटनेमुळे व कर्नाडांच्या वक्तव्यांमुळे काही प्रश्न पडले : १. टिपू सुलतानाचा इतिहास काय ? मुख्य राजकीय व सामाजिक कर्तबगारी काय ? (सिरियल फार लहानपणी पहिली, आठवत नाही. शालेय अभ्यासक्रमात तितकासा उल्लेख नाही). शक्य असल्यास संदर्भ कळवणे. २. हि कर्तबगारी खरच शिवाजींशी तुलना करण्या इतपत मोठी होती का ? शिवाजींनी केवळ मुघल व दक्षिणी शह्यांशी लढा देण्याबरोबर विविध सामाजिक सुधारणा केल्या. जरी पेशवाई काळातील मराठी राजवटीवर होत असली (बारगीर, काही इतर) तरी शिवाजीकालीन मराठी राजवटीवर टीका बघायला मिळाली नाही. (टिपू वर मिळाली - कुर्ग) ३. टिपू ची तत्कालीन भारतीय-अभारतीय सत्तांबरोबर युती/आघाडी कशी काय होती ?

11 टिप्पण्या 7,475 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by संदीप डांगे

मयसूर पाक आणि मयसूरचा मसाला डोसा चालतो पण मयसूरचा वाघ सिंह टीपू सुल्तानावर चर्चा का नको ? :) परंपरेने सुट्टी मिळत असेल तर द्यावी काय म्हणता ? उगं जिथे तिथे पॉलिटिक्स नको काय म्हणता ? -दिलीप बिरुटे (सहिष्णु)

भंकस बाबा नवीन

टीपू सुलातनचि जयंती हा एक राजकीय खेळीचा भाग आहे. वास्तविक टीपूचा जन्मदिवस हा २० नोव्हेंबर असताना हे १० तारखेला तो का साजरा करत आहेत? उत्तर सोपे आहे कांग्रेस हां टीपू सुलतानच्या नावाखाली भाजपावर शरसंधान करत आहे. मुस्लिम लोकांची जयंती साजरे करण्याची प्रथा कधिपासून सुरु झाली? बिहार निवडणुकीं नंतर ह्या सर्व कथाकथित सेक्युलरवाद्याना माज आला आहे.

प्रभाकर पेठकर नवीन

टिपू सुलतानचा इतिहास फार माहित नाही. पण तो मुस्लीम धर्मप्रसारक होता असे वाचले आहे. तसेही, धर्मप्रसारणात त्याने हिन्दूंवर वा अन्य धर्मियांवर कांही अत्याचार केले नसतील तर त्याच्या त्या कार्यालाही कोणाचा विरोध असू नये. त्याच्या कार्यकाळात मस्कतच्या उलेमांनी त्याची भेट घेऊन त्याच्या राज्यात इस्लाम बलवान करण्याच्या त्याच्या कार्याचा गौरव केला होता असेही वाचले आहे. ज्ञानपिठ पुरस्कारप्राप्त गिरीश कर्नाड ह्यांनी सामाजिक एकोपा राखण्याऐवजी दोन धर्मियांमधील तेढ वाढविण्याच्या कार्यास हातभार लावावा ह्याचे सखेद आश्चर्य वाटले. टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांची तुलना करता. टिपू सुलतानाचा राज्याभिषेक झाला तेंव्हा त्याला त्याचे वडिल सुलतान हैदर अली ह्यांच्याकडून वारसा म्हणून भलेमोठे साम्राज्य मिळाले. मात्र महाराजांना तत्कालीन तीन शाह्यांशी, पोराटोरांचे सैन्य जमवून, प्राणपणाने लढून झगडून, राजनितिक आणि सामरीक धोरणे राबवीत महाराष्ट्र राज्याची उभारणी करावी लागली. टिपू सुलतानचे राजकिय-प्रशासकिय कौशल्य, रणांगणावरील यश, इंग्रजांशी चिवट झुंज वगैरे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण अत्यंत विरुद्ध परिस्थितीवर मात करीत शून्यातून एक राज्य निर्माण करण्याची शिवाजी महाराजांची यशस्वी कारकिर्द जास्त कौतुकास्पद आहे असे मला वाटते.

मोगा नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

हेच लॉजिक लावले तर संभाजीमहाराजानाही वारसाहक्काने राज्य मिळाले होते. त्यांचे कौतुक करायचे की नाही ?

आरोह नवीन

स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याकडे इतिहासाचे जाणूनबुजून/पद्धतशीरपणे distortion, manipulation करण्यात आले.ते का करण्यात आले हे सर्वांनाच माहीत आसवे.त्यामुळे फायदा झाला(कोणाचा) कि तोटा झाला हा एक स्वतंत्र विषय आहे.कोणीतरी म्हटलंय ना " Those who do not learn from history, are doomed to repeat it " एव्हढं बोलून मी माझं भाषण संपावतो.. धन्यवाद

उगा काहितरीच नवीन

टिपु सुलतान मांजा (पतंग उडवन्यासाठीचा दोरा) लै भारी असायचा . कुणाला आठवतो काय ? -(नॉस्ट्याल्जीक) आन्न्या.