मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थोडेसे ज्वलनशील

अभ्या.. · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी, माझं गाव सोलापूर. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा इतर मोठ्या गावाप्रमाणेच बोजवारा उडालेलं. अर्थात खाजगी वहाने बेसुमार. पुण्यानंतर कदाचित जास्त टूव्हीलरचं गाव सोलापूर असावे हे सतत बदलत्या आरटीओच्या सिरिजमुळे लक्षात येतंय. लहान खड्डेमय रस्ते असलेले गाव आता बदलतय. काही रस्त्यांचे काम चालूय पण गावातील बरेच रस्ते खूप चांगले झालेले आहेत. अगदी पुण्यामुंबईच्या तोडीस तोड असे. एमेमआरडीए ची कृपा. पण ह्यासाठी आम्हाला इतर शहरापेक्षा जास्त सेस भरावा लागतो. पेट्रोलच्या भावात तो वसूल केला जातो. त्यामुळे इतर शहरांपेक्षा सोलापुरात पेट्रोल महाग आहे. मोदीकाकांच्या कृपेने अच्छे दिन अनुभवतानाच १ जूनला झालेल्या भाववाढीनुसार आधी ६६.५२रु. प्रतिलिटर असलेले पेट्रोल आज ७०.५८ रु. प्रतिलिटर झालेय. शहरात पेट्रोलचे दोन भाव चालतात. नाक्याबाहेर सेस बसत नसल्याने पेट्रोल ३-४ रुपयाने स्वस्त आहे. शहरातील पेट्रोल पंपचालकाचा दावा आहे की शहरातील पेट्रोल बीएस थ्री प्रकारचे पुरवले जाते पण नाक्याबाहेरील पंपावर बीएस टू दर्जाचे. शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी हे केले जाते. पैसे वाचवण्यासाठी नागरिक सर्रास शहराबाहेरील पंपावर पेट्रोल भरुन येतात. टूव्हीलरचे ईंजिनास ह्या पेट्रोलमुळे किती फरक पडतो? बरेचसे मेकॅनिक इंजिनाच्या पार्ट आणि दुरुस्तीसाठी पेट्रोलला दोषी ठरवतात. शिवाय शहरात इंडीयन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिन्दुस्तान पेट्रोलियम आणि एस्सार असे चार कंपन्यांचे पेट्रोल पुरवले जाते. त्यात फक्त इंडीयन ऑइलच्या पंपावर १० टक्के इथेनॉल मिक्स असे स्टीकर्स आहेत. त्या पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिन लाईफ आणि परफोर्मन्सवर काही फरक पडेल काय? इथेनॉल मिक्स केल्याने पेट्रोलच्या किंमतीत काही फरक पडत नाही का? इथेनॉल मिक्स करणे हे फक्त फॉसिल प्रॉडक्ट्सला पर्याय म्हणून आहे की त्यापेक्षा स्वस्त पर्याय आहे? नुसते इथेनॉल वापरले तर वाहनांना चालू शकेल का? त्यासाठी काही फॉर्म्युला सरकारकडून ठरवला गेला असल्यास फक्त ईंडीयन ऑइलच्या पंपावर हे कसे उपलब्ध? सर्वच शहरात हे आता चालू झाले आहे का? असल्यास ते सर्वच कंपन्यांना सक्तीचे करायला हवे. स्पीड, पॉवर सारखी काही अ‍ॅडीटिव्ह मिक्स ची पेट्रो उत्पादने वापरा म्हणून केलेल्या जाहीराती आजकाल दिसत नाहीत. त्या पर्पजली थांबवल्या गेल्या आहेत का? समाधानकारक उत्तरे आणि चर्चेसाठी अग्रीम धन्यवाद.

वाचने 9141 वाचनखूण प्रतिक्रिया 27

तुषार काळभोर Sat, 06/04/2016 - 10:29
स्पीड/पॉवर पेट्रोल विषयी एका वाहनाविषयी शोमध्ये (भौतेक एनडीटीव्हीवर टुटू धवन) असे ऐकले होते: 'चणे खिलाने से गधा कभी घोडा नही बनता' हाय ऑक्टेन पेट्रोल ची उपयुक्तता व कार्यक्षमता जास्त असेलही, पण त्यासाठी आपली गाडी तो उपयोग करून घेणारी असावी. मला वाटते 100-150 सीसी च्या गाड्यांना साधं पेट्रोल व स्पीड पेट्रोल यात फारसा फरक पडत नसावा. बीएस (भारत स्टेज)2-3-4 हे इंजिनचे व्हर्जन्स आहेत. ते पेट्रोलचे प्रकार असावेत असं, नाही वाटत. ते गावातल्या पम्पवाल्यांचं निगेटिव्ह मार्केटिंग असावं.(किंवा गावातलं पेट्रोल महाग असल्याचं लंगडे कारण) गाडीच्या/इंजिनच्या काळजीसाठी चांगलं ऑइल( castrol 4t किंवा शेल 3/5/7), चांगलं पेट्रोल व 4000-5000 किमीला बेसिक सर्विसिंग या किमान गोष्टी हव्यात.

In reply to by तुषार काळभोर

तुषार काळभोर Sat, 06/04/2016 - 10:33
नावावरून धर्म, जात, राजकारण, लिंगभेदभाव असं काहीतरी असेल असा अंदाज होता. तो चुकवून आमचा Mike Gatting केल्याबद्दल जाहीर आभार!

In reply to by तुषार काळभोर

अभ्या.. Sat, 06/04/2016 - 12:25
मग तसं म्हणलं तर इथेनॉलने पण फरक पडायला नको. इव्हन जुन्या राजदूतला रॉकेलवर चालवून फक्त स्टार्टला पेट्रोल घुट्टी देत होते ती आयडीया पण बरीच आहे की. विकी म्हणतय :India currently has two fuel quality standards: one that applies to places that meet BS IV and other for the once that follows BS III. Nearly half of the country now requires 50 ppm sulfur and gasoline[1]. The rest of the country allows up to 150 ppm sulfur gasoline and 350 ppm sulfur diesel. सो पेट्रोलला बीएस स्टॅन्डर्डायझेशन आहे हे नक्की. कारण शहरातील पंपवाल्यानी प्रेस कॉन्फरन्स घेउन वरंवार ह्या गोष्टीवर संपाचे हत्यार उपसलेले आहे. स्पीडचा मला वैयक्तिक अनुभव चांगलाय. जवळपास ५ किमीचा मायलेज मध्ये फरक पडतो. १०० सीसीला. (पॅशन प्रो) १५० सीसी चे इंजिन (सीबीजी एक्स्ट्रीम) जास्त स्मूद चालते. पिकप पण जास्त जाणवतो. मला इथेनॉल मिक्सिंगचे फायदे तोटे आणि भावफरक कोणी सांगेल काय? पुण्या मुंबईत इथेनॉल मिक्स असते का इंडीयन ऑइल पंपावर? का गुपचूप केले जातेय आणि आपल्याला काही खबर नाही?

प्रचेतस Sat, 06/04/2016 - 11:04
ह्याबाबतीत काही कल्पना नै. पण मी इथे मात्र शेल कंपनीचेच पेट्रोल वापरतो. बाईकचं मायलेज वाढल्याचा अनुभव आहे. मापात फसवाफसवी नाही आणि भेसळमुक्त पेट्रोल.

In reply to by प्रचेतस

नाखु Sat, 06/04/2016 - 11:53
आहे आणि नेहमीचा प्रशन कितना देती है (मायलेज) कारण घोडं पक्षी गाडी तिथेच पेंड (पुन्हा पक्षी पेट्रोल) खातं. शेलबद्दल ऐकून आहे भराव का नाही अश्या द्विधा अवस्थेतला नाखु चाकरमानी

In reply to by प्रचेतस

तुषार काळभोर Sat, 06/04/2016 - 13:41
शेलमुळे माझी CD100 72-75द्यायची. आता युनिकॉर्न 50-55 देते. 8 वर्षे जुनी 50000+ पळालेली. ऑइल पण शेलचंच टाकतो. युनिकॉर्नची शप्पथ, मस्का स्मूथ चालते गाडी!

In reply to by तुषार काळभोर

नाखु Sat, 06/04/2016 - 15:20
पैलवानानी दिलेली दाद म्हणजे "हिंमत ए मर्दाच की" या वेळीपासून पडताळा घ्यावा म्हणतो. साध्या (विना गीअर) दिचाकीवाला नाखु

भीमराव Sat, 06/04/2016 - 12:12
'सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा इतर मोठ्या गावाप्रमाणेच बोजवारा उडालेलं' सोलापुरच्या आकारमानामुळे smt पेक्षा टमटमच जास्त चालतय बघा, ए चला आसरा- विमानतळ- सातरस्ता कुठ जायच.... वाहनांमुळे होनारं प्रदुषण आणि सोबतीला धुळ वर कडी करायला बेक्कार ऊन, आतापावसाळा येईल परत शिवाजी पुतळा, चौपाड, भैया चौक असल्या ठिकाणी स्विमींग पूल होतय का नाही बघ, तस पाहीलं तर सायकल वापरायला आमची हरकत कधीच नाही पन आसलं उन्हाळा असल्यावर बाईकवर नको होतय, सायकल च काय, ई- बाईक हा छान पर्याय होईल अस वाटतय

चांदणे संदीप Sat, 06/04/2016 - 13:24
भ्हल्तच प्टेलय कई ओ ईव्षय!! मज्साख्रे CD100 व्ले प्त्रोल च ईव्चर् न्ही क्रत! ;) ५०० रु अठव्ड... हओदया क्रच्च!! सयन्डई

टवाळ कार्टा Mon, 06/06/2016 - 13:53
http://mrunal.org/2012/10/economy-ethanol-blending-in-petrol.html इथेनॉल मिक्स केलेल्या पेट्रोलची किंमत खरेतर थोडी कमी हवी...पण मायलेजवर जास्त फरक पडत नाही

अभ्या.. Wed, 08/03/2016 - 18:15
इथल्या सर्वच पंपांवर बोर्ड लागलेत. अगदी बीपीसीएल, एच्पी, आयओ, एस्सार सगळ्याच. " पेट्रोलमध्ये इथेनॉल असल्यावर टाकीत पाणी गेले असता ते खाली जमा होत राहते. कॉर्ब्युरेटर वेळच्या वेळी चेक करावा. इंजिनच्या नुकसानीस अथवा स्टार्टिंग ट्रबलची तक्रार पंपावर करु नये. त्यासाठी आम्ही जबाबदार नाही"

बहुगुणी Wed, 08/03/2016 - 19:46
अभ्या: थोडीशी जालीय माहिती E10 वापरतांना घ्यायची काळजी (माहीत असेलच, पण इथे 'गॅस' म्हणजे गॅसोलिनचा शॉर्ट्फॉर्म आहे) E10 असलेलं पेट्रोल ३० दिवसांत वापरावं, अन्यथा त्याने एंजिनला नुकसान पोहोचू शकतं. तुम्ही वरती पंपांवर जे बोर्ड लावले आहेत म्हंटलंय, त्यामागे phase separation हे कारण आहे. आधिक माहिती इथे मिळेल, थोडक्यात, हे हवेतील आणि पेट्रोल पंपावरील आर्द्रतेमुळे आणि एंजिनच्या तापमानातील बदलामुळे घडतं असं दिसतं. मुळात E10 वापरात का आलं याचा इतिहासही मनोरंजक आहे. १९७९ च्या सुमारास अमेरिकेत वाहनांच्या वापराने हवेत उत्सर्जित होणार्‍या कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण कमी व्हावं म्हणून MTBE (methyl tertiary butyl ether) वापरलं जायला लागलं. इंधनाचं octane rating वाढावं आणि engine knocking थांबावं म्हणून हा oxygenator वापरला जायला लागला. पुढे मग हे MTBE भूजलात आढळायला लागलं, आणि उच्च प्रमाणात ते कदाचित कर्करोगकारक असेल अशा शास्त्रीय शोधांनंतर त्याला पर्याय म्हणून २००६ नंतर एथॅनॉल वापरात आलं. त्यामागे दुसर्‍या बुश साहेबांचा आशीर्वाद होता (आणि अर्थातच अमेरिकेतील मका-उत्पादक [म्हणजे त्याद्वारे अल्कोहोल-उत्पादक] लॉबीचं वजन! कारण क्रूड इंधनाच्या परदेशी अवलंबित्वावर हा म्हणे स्वदेशी पर्याय होता). आता त्यानंतरच्या संशोधनानंतर भूजलात आढळणार्‍या प्रमाणात MTBE हे कर्करोगजन्य नाही असं सिद्ध झालंय, म्हणून 'MTBE ला पर्याय म्हणून आलेल्या एथॅनॉलचं तरी काय काम' असा प्रश्न विचारला जातोय! असा हा वापर चालूच रहाण्यामागे पुन्हा मका-उत्पादक [म्हणजे त्याद्वारे अल्कोहोल-उत्पादक] लॉबीचा स्वार्थ असण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि भारतातही असे अल्कोहोल उत्पादक (बहुतेक उसापासून) राजकीय "वजनदार" आहेतच!

In reply to by बहुगुणी

अभ्या.. Wed, 08/03/2016 - 20:00
यस्स बहुगुणीमालक, लॉबिंग हे आहेच पण त्याचे सुपरिणाम्/दुश्परिणाम आपल्यावर किंवा गाडीवरच होणारेत. इथेनॉल मिक्स इ१० आणि प्योर पेट्रोल ह्यातले फायदेतोटे सरकारने किंवा अराईसारख्या संस्थांनी डिट्टेलात द्यायला हवे. किंवा ह्या निर्णयामागचा उद्देश तरी. फक्त पेट्रोलच्या किंमतीसाठी रस्त्यावर येणार्‍य जनतेला ह्याचे महत्त्व कळलेले दिसत नाही. किंवा हा विषय सोयीचा नसावा.

कंजूस Wed, 08/03/2016 - 20:08
सगळी केमिस्ट्री आहे ती.हवेचे मिश्रण कमी जास्ती करून इंधनाचा पूर्ण वापर करता येतो.आठ कार्बन अ़ॅटमच्या रेणूत दोन कार्बन असलेला ( एथनॅाल)टाकून काही उपयोग नाही.कमी सल्फरवाले इंधन वापरले तर नॅाझल्स जास्ती स्वच्छ राहातील.

सुबोध खरे Wed, 08/03/2016 - 20:30
आठ कार्बन अ़ॅटमच्या रेणूत दोन कार्बन असलेला ( एथनॅाल)टाकून काही उपयोग नाही सहमत नाही कमी कार्बनचे अणू असलेली इंधने जास्त पूर्णपणे जळतात पण त्याची ऊर्जा निर्मितीची क्षमता कमी असते. उदा. नैसर्गिक वायू (cng) हा तर मिठाने असतो एकच कार्बनचा अणू असलेला (CH ४). परंतु तो जाळतो तेंव्हा एका कार्बन डाय ऑक्साइड च्या रेणू बरोबर दोन पाण्याचे रेणू तयार होतात. त्या तुलनेत पेट्रोलमध्ये (C ८ H १८) मध्ये आठ कार्बन डाय ऑक्साइड च्या रेणू बरोबर नऊ पाण्याचे रेणू तयार होतात. अल्कोहोल C २ H ५ OH यात (C २ H ४) +(H २ O) मधून दोन कार्बन डाय ऑक्साइड च्या रेणू बरोबर तीन पाण्याचे रेणू तयार होतात. या संयुगांची ऊर्जानिर्मिती क्षमता कमी असल्याने (उदा. CNG's volumetric energy density is estimated to be 25 percent that of diesel fuel.त्याने इंजिनची शक्ती कमी होते.) यामुळेच अल्कोहोलचे पेट्रोल मध्ये १० % च मिश्रण करून वापरले जाते. मका लॉबी, साखर कारखाने आणि मद्यार्क निर्मिती हा "राजकारणाचा/ अर्थकारणाचा" विषय आहे.

कंजूस Fri, 08/05/2016 - 06:01
केमिस्ट्रीचं एक खातं उघडलं एवढंच.आणखी लॅाबी इंट्रेस्ट आहेच.तिसरा मुद्दा क्रूड ओइल डिस्टिलेशन मधले बाइप्रॅाडक्टसची विल्हेवाट इतर मुद्दे,अर्थशास्त्र,परकी चलन,गाड्यांच्या एंजिनांची सुदृढता वगैरे. सामान्य वापरकर्ता म्हणतो एवढ्या रुपड्यात गाडी किती चालणार ते बघेन. छोटी खेळण्यातली विमानं असतात( टु स्ट्रोक)त्यात पेट्रोल अधिक इथर वापरतात कारण अतिजलद रेटा हवा असतो.रेल्वे/ट्रकांसाठी जलद नव्हे तर दमदार रेटा हवा असतो तिथे डिझल लागते.जेट एंजिनांसाठी भरपूर इक्झॅास्ट गॅस होणारे इंधन लागते त्याचबरोबर सल्फर नको कारण नॅाझल्स खराब होतात.

अभ्या.. Fri, 08/29/2025 - 19:58
९ वर्षे झाली ह्या धाग्याला. १० टक्के इथेनॉल चे प्रमाण सरकारने हळूहळू २० टक्य्यापर्यंत नेले. आता ते जवळपास ३० टक्के म्हणजे ई२७ पर्यंत न्यायचे सरकारचे मनसुबे आहेत. २०२३ नंतर आलेल्या कार्स आणी बाइक्स नी ई २० पेट्रोल कम्प्लायंट इंजिने बनवली आहेत म्हणे. ब्राझील बिझिल उदाहरणे देउन झाली पण त्यांनी फ्लेक्स फ्युएल सिस्टीम कशी राबवलीय आणि तेथेही ग्राहकांच्या मागणीनुसार शुध्द पेट्रोल ते पूर्ण इथेनॉल अशी रेंज मिळते आणि वाहने ही तशी बनवली गेली हे विसरले गेले. इथेनॉलची किंमत कमी असली तरी ह्या पेट्रोलच्या किंमतीत काहीही कमी नाहिये. इंजिनांचे नुकसान चालूच आहे. मेकॅनिक म्हणतात फ्युएल मुळे होतंय, पंपवाले म्हणतात असेच येते पेट्रोल मग सरकारी कंपन्या असो की खाजगी. वाहन कंपन्या म्हणतात ग्यारन्टी फक्त २०२३ न्म्तरच्या वाहनांना, आधिच्या वाहनाना नाही. आणि परत ई ३० आले तर नव्या वाहनांना तेही नाही. वाटल्यास तुम्ही नवीन गाड्या घ्या. असे ना तसे गाड्या स्क्रॅपची मोहीम सरकारतर्फे चालूच आहे. पेट्रोलमधल्या इथेनॉलने प्रदूषण आणि इंजिन चे नुकसान चालूच आहे. एकूण्च पैशाची बचत, प्रदूषणाला आळा आणि आत्मनिर्भरता ह्या सगळ्याच हेतूला हरताळ फासला गेला आहे. विमा कंपन्यांनी ऑलरेडी हात वर केले आहेत. आता एक जनहित याचिकेनुसार सुप्रीम कोर्टाने १०० टक्के शुध्द पेट्रोल ची उपलब्धता आणि इथेनॉल मिक्सिंगचे दर्शक स्टीकर पंपावर मिळेल असे सांगितलेय. . बड्या बड्या बाता वाले बडे गडकरी साब आता काय नवीन इ वाहनांची नीती आणून नवीन काय ठासताहेत ते बघायचे. :(

कंजूस Fri, 08/29/2025 - 22:49
आता परवडणारे नसलेलं इंधनही काही वर्षांनी गरजेचं वाटू लागेल. म्हणजे कसंही करून इंधन हवेच ही गरज असेल. इलेक्ट्रिक कार, स्कूटर आल्या पण बोटी आणि विमानाचं काय? त्या खनिज तेल पिणारच. वीज साठवायला मोठ्याल्या बॅट्रीज हव्यात.

गणेशा Sat, 08/30/2025 - 09:54
इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण हळूहळू वाढवून E80% पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. यामागचं खरं कारण म्हणजे क्रूड ऑइलवरील आयात अवलंबित्व कमी करणे. ‘शेतकऱ्यांचा फायदा होईल’, ‘प्रदूषण कमी होईल’ अशा गोष्टी या जास्त करून प्रचारासाठी सांगितलेल्या गोष्टी आहेत. त्या अंशतः खऱ्या असू शकतील, परंतु मूळ उद्दिष्ट म्हणजे क्रूड ऑइलवरील खर्च कमी करणे हाच आहे. इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं, आणि इथेनॉलसाठी वापरल्या जाणाऱ्या पिकांना (उदा. ऊस) प्रचंड पाण्याची गरज असते. आपण EV बद्दल बोलतो आणि त्याला पर्यावरणपूरक मानतो, पण हे पूर्णपणे खरं नाही. EV साठीच्या लिथियम-आयन बॅटऱ्या तयार करण्यासाठी लिथियम, कोबाल्ट, निकेल, ग्रॅफाइट यांचं खाणकाम आणि प्रक्रिया करावी लागते, ज्यामुळे प्रचंड प्रमाणात CO₂ उत्सर्जन होतं. त्यातच जर वीज कोळसा-आधारित ऊर्जा प्रकल्पांमधून आली, तर EV अप्रत्यक्षरित्या अजूनही मोठ्या प्रमाणात CO₂ सोडतं. EV खरंच "ग्रीन" ठरावं, तर wind, solar, hydro यांसारख्या स्वच्छ ऊर्जेतून वीज यायला हवी. तसंच, जसा आपण क्रूड ऑइलसाठी परदेशांवर अवलंबून आहोत, तसाच लिथियमसाठी चिली, बोलेव्हिया, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि प्रोसेसिंगसाठी चीनवर अवलंबून राहणार आहोत. NALCO आणि Hind Copper यांना खनिज उत्खननाचे आदेश मिळालेत, पण तेवढ्यावर खूष राहणं हा वेगळाच वादाचा मुद्दा आहे. थोडक्यात, EV वापरात प्रदूषण कमी असलं तरी उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं, हे मुद्दाम दाखवणं टाळलं जातं. अवांतर वयक्तिक- ईथेनॉल ब्लेंडिंग प्लांट बनवणाऱ्या आणि बॅटरी रीसायकलिंग करणाऱ्या कंपन्यां आणि खनिज उत्खनन कंपन्या मध्ये मी स्वतः गुंतवणूक केली आहे. आणि, EV कार घेण्याऐवजी पेट्रोल कार वापरण्याला मी प्राधान्य दिलं आहे.(त्यात मी फक्त ९४ मानांकित(शेल पॉवर) हेच पेट्रोल टाकतो) - गणेशा

In reply to by गणेशा

आग्या१९९० Sat, 08/30/2025 - 10:33
कच्चे तेल आयात करूनसुद्धा पेट्रोलचा उत्पादन खर्च हा इथेनॉल उत्पादन खर्चापेक्षा बराच कमी आहे. शुद्ध इथेनॉल मिळवण्यासाठी ऊर्जा वापरली जाते ती विचारात घेतली तर इथेनॉल वापरण्याच्या मर्यादा स्पष्ट होतात.