Skip to main content

बलम पिचकारी कि केशर कि बारीशे.

लेखक पाटील हो
Published on शुक्रवार, 12/08/2016
शीर्षक काय द्यायचा हीतून सुरवात करतो. बलम पिचकारी.... कि.... केशर कि बारीशे. परवा ऑफिस ला येतेवेळीची किस्सा आहे . सकाळी मस्त आवरुन बस स्थानकावर बस ची वाट पाहत थांबलेलो . तशी ऑफिस बस कधी वेळेत येत नसल्यामुळे थोडा वेळ थांबव लागतो . तेवड्यात अजून दोन तीन टाळकी जमतात, माज्यासाखी ऑफिस ला जाणारी. मग बस येऊपरीयंत गप्पा चालू होतात . हे तर रोजचच आहे. तर त्या दिवशी अस्याच गप्पा चालू होत्या अचानक "पच्चकन अंगावर काहीतरी आलं, पटकन पहिला तर लक्ष्यात आलं कि कोणीतरी जाणाऱ्या दुसऱ्या गाडीतून सरळ माज्या अंगावर पान /गुटखा खाऊन थुंकुकलंय" ..... ....... संतापाने त्या जातेल्या गाडीकडे बगुन फक्त येवडंच म्हणू शकलो कि "" तुज्या आईची XX रांडच्या "" ह्यापलीकडे काही म्हणण्या आगोदर गाडी गेलेली . शी ....... कसल घाण वाटत होतं , कधी एकदा घरी जावून कपडे बदलतो झालेलं . मित्रांना सांगितले तुम्ही निगा मी येतो कपडे बदलून . सरळ घराचा रास्ता पकडलो . अश्या लोकांना आवरण्यासाठी काहीतरी पर्याय असला पाहिजे . मला तर वाटतंय - १) थोबाड रंगवली पाहिजेत नालायकांची . २) पयतनाने / व्हानाने मारले पाहिजे . संताप झालाय नुसता , कोणीतरी असा रंगेहाथ नबगता/निष्काळजीपणाने थुंकताना सापडला तर नक्कीच त्याची मस्ती जिरवली पाहिजे ( काश त्या दिवशी दुचाकी असतीतर पाठलाग करून त्याची जिरवली असती ) अस्या लोकांना कसा आवर घालायचं कोणी सांगेल का ? ? ? खबरदारी म्हणून : सध्यातरी रोड पासून चार हात लांबच थांबतो जेणेकरून पिचकारी च्या रेंज मध्ये येणार नाही . दुचाकी असेल तर सिग्नल ला बस शेजारी थांबायला नको वाटते, टीव्हीवर ती केशर कि बारीशे ऍड पाहिल्यावर जखमेवर मीठ चोळल्यासारख वाटते .

वाचन संख्या 1850
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

असला तरी भाषा अत्यंत अयोग्य आहे हे निरीक्षण नोंदवित आहे Rather त्या माणसापेक्षा तूमचा गुन्हा किंवा चूक जास्त मोठी आहे

पाटील, आदी तुमी नेम्बाजी चा कलास लावा न मंग बन्दुक घिवुन फिरत जावा, लागल त्याला लागल गोळी. थुंकला की ठोकला, चुकिला माफी नाय, पाटलांचा नाद करायचा नाय, केला नाद जिदगी बरबाद, वरनं हाणायचे/फेकाय/मारायचे डायलाग.