Skip to main content

काथ्याकूट

ताज्या घडामोडी - जून २०२०

लेखक गामा पैलवान यांनी बुधवार, 17/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
परत एकदा ताज्या घडामोडी हे सदर सुरू करावं म्हणतोय. दिनू रणदिवे गेले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला एक मोहरा गेला.

स्वयंपूर्ण भारत: कोरोनापश्चात संकटातील संधी

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 12/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या भाषणात लॉकडाऊन ४.० चे सुतोवाच करताना दोन निखर्व (वीस लाख कोटी) रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे.

चालू घडामोडी : जानेवारी २०२०

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 01/01/2020 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अ. महाराष्ट्रातील नवीन सरकारचा दुसरा शपथविधी नुकताच पार पडला आहे. लवकरच खातेवाटप होऊन कारभार मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. तिन्ही पक्षांत, विशेषतः शिवसेनेत अंतर्गत कुरबुरी सुरु आहेत त्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्ग काढतात हे पाहणं रोचक ठरेल. बाकी, हे त्रिघाडीचं सरकार १ जानेवारी २०२१चा सूर्योदय पाहील का? आ. केंद्र सरकारपुढील या वर्षातील उद्दिष्टे / आव्हाने - १.

हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर

लेखक विनोदपुनेकर यांनी शुक्रवार, 06/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर डॉ. प्रियांका रेड्डी या एका भगिनींवर पाशवी बलात्कार झाला नंतर स्वाभाविक आणि नेहेमी प्रमाणे जनमाणसातून त्या चार नराधमांना भर चौकात फाशी ते अजून बाकी देशातील बलात्कार प्रकरणातील शिक्षेचे दाखले देत त्यांना कठोर शिक्षा (खरे तर मरण) द्यावी हि सगळ्या भारतीयांची अपेक्षा ते हि लवकरात लवकर हि अपेक्ष होती कारण दिल्ली तील निर्भया बलात्कार आरोपी आजपर्यंत कोर्ट कचेरी त्यांचा जगण्याचा अधिकार आदी कारणांनी जिवंत आहे त्यात त्या निर्भयाची आई कोर्ट कचेरीत अजूनही तिला न्याय मिळावा म्हणून कोर्टात फेऱ्या मारत आहे.

शेतकरी अन्नदाता कि अन्ननिर्माता

लेखक आकाश कंदील यांनी सोमवार, 26/11/2018 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी अन्नदाता कि अन्ननिर्माता हल्ली शेतकऱ्याचे मोर्चे / महामोर्चे / संप (नवीन प्रकार) अजून नित्यनियमाचे झाले नसले तरी बऱ्यापैकी नियमित झाले आहेत. यात बऱ्यापैकी राजकारण आहे आणि काहींबाबतीत सच्चाई सुद्धा आहे. या बाबत मला काही मुद्दे मांडावेसे वाटतात १. शेतकरी अन्नदाता कि अन्ननिर्माता ? : बरेच जण अगदी वर्तमानपत्र सुद्धा शेतकऱ्यांना अन्नदाता संबोधतात पण व्यावहारिकदृष्ट्या (व्याकरणदृष्ट्या नाही) माझ्या मते दाता म्हणजे दान देणारा. आणि तोच दाता श्रेष्ठ मानला जातो काहिही अपेक्षा न ठेवता दान देतो यात शेतकरी बसत नाही म्हणून तो फक्त अन्ननिर्माता होऊ शकतो. २.

चालू घडामोडी - जुलै २०१८

लेखक विशुमित यांनी बुधवार, 04/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
‘शाकाहारी’ दहशतवाद्यांनी थांबवली बोकड निर्यात! http://www.bigul.co.in/bigul/2650/sec/8/goat%20export ==== खाऊन माजलेली बोकडं कष्टकरी जनतेच्या हिताचा विचार करणार आहेत की नाही ?

विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला

लेखक यनावाला यांनी शुक्रवार, 02/02/2018 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला (भाविक आणि विवेकवादी यांच्यातील संवाद. यात श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा या तीन संकल्पनांच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न आहे. "आजचा सुधारक" चे संस्थापक-संपादक दि.य.देशपांडे यांनी आ.सु.च्या एका अंकात या व्याख्या थोडक्यात दिल्या आहेत. त्यांचा विस्तार या संवादात केला आहे.) भाविक: परवा तुमचा एक लेख वाचला. त्यात "श्रद्धाभावना नसावी." असे तुम्ही म्हटले आहे. श्रद्धेवर तुमचा एवढा राग का ? श्रद्धा का नसावी? विवेकवादी: श्रद्धा का नसावी ? श्रद्धेमुळे माणसाची कोणती हानी (नुकसान) होते ? या प्रश्नांविषयीं त्या लेखात विवेचन केलेच आहे.

श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.

लेखक यनावाला यांनी बुधवार, 17/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।....यनावाला ............................................................................................................. भगवद्गीतेतील 4 थ्या अध्यायात पुढील दोन श्लोक आहेत : 1) श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तीं अचिरेणाधिगच्छति ॥39॥ अन्वय:- संयतेन्द्रिय: , तत्पर: , श्रद्धावान् ज्ञानं लभते । ज्ञानं लब्ध्वा (स:) अचिरेण (एव) परां शान्तिं अधिगच्छति । अर्थ : -- जितेंद्रिय आणि साधनपरायण अशा श्रद्धावंताला ज्ञान प्राप्त होते.

भाव तेथे(च) देव:......यनावाला

लेखक यनावाला यांनी सोमवार, 18/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
भाव तेथे(च) देव:......यनावाला आमच्या कोकणात गणेश चतुर्थीचे महत्त्व अन्य धार्मिक सणांच्या तुलनेत सर्वाधिक असते. उत्सव दीड दिवसाचाच, पण त्या काळात गणपतीच्या मूर्तीला सतत जिवापाड जपावे लागते. मूर्तीला कुठे तडा गेला, टवका उडाला, देवापुढील समई-निरांजन विझून अंधार झाला तर ते अगदी अशुभ मानतात. लहानपणी मी एकदा आईला विचारले," आई, या मूर्तीत खरोखरच देव असतो का? " त्यावर ती म्हणाली, " अरे, मानला तर देव. नाहीतर मातीचा बाहुला." ......म्हणजे देव हा केवळ मानण्यावर आहे. काल्पनिक आहे. त्याला खरे अस्तित्व नसावे. असे मला तेव्हापासून वाटू लागले.

श्रद्धेमुळे विकृती

लेखक यनावाला यांनी शुक्रवार, 01/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धेमुळे विकृती........यनावाला ................................ रविवारच्या वृत्तपत्रात -(दि.२०-मार्च-२०१६)-"नातवासह आजोबांचा अंत" ही बातमी वाचून मन सुन्न झाले. आजोबा ( सुधीर शहा, वय ६५ वर्षें ) यांनी पहाटेच्या वेळी नातू (जिनय, १० वर्षे) याचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आठव्या मजल्यावरून खाली उडी टाकून आत्महत्या केली. मृत्युपूर्वीच्या पत्रात त्यांनी लिहिले., "कोर्टातील खटल्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे.