Skip to main content

काथ्याकूट

मिपावर आय डि न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

लेखक नया है वह यांनी शुक्रवार, 15/01/2016 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
२०१६व्या वर्षात आय डि/ डु आय डि मिळणे अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे.... बदलती मानसिकता: : लेखातील विचार पटत असतील तरच प्रतिसाद द्या. विचार वेगळे आहेत, पटत नाही असे वाटले तर वेगळे लेख लिहा, अशी संकल्पना रुजत आहे. सामाजिक बदल : आज लेखक उच्चशिक्षित आणि वैचारिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी आणि माझे लेखन सक्षम आहे तर मी का प्रतिसाद लिहायचे, असे लेखकांचे म्हणणे असते. बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात(लेखक-वाचक) दरी निर्माण होत आहे. तरुण लेखकांच्या-वाचकांच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत.

धुम्रपानविषयक धाग्याचा सिक्वेल.

लेखक शान्तिप्रिय यांनी बुधवार, 16/12/2015 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागील धाग्यात आपण धुम्रपान आणि चित्रपट याविषयी चर्चा केली. या धाग्यात धुम्रपानाविषयी अधिक विचारमंथन करुया. टीप: १. समाजात धुम्रपान कमी व्हावे हाच या चर्चेचा उद्देश असावा. २. अर्थातच मी स्वत: कधीही धुम्रपान केले नाही आणि करणार नाही. उलट धूम्रपानाचे वाइट परिणाम समाजाला सांगायचा माझा प्रयत्न असतो. ३. प्रतिसाद विषयाला धरून असावेत. ४.प्यासिव्ह स्मोकिंग घडवणे हे पाप असलेने, धुम्रपानाबद्दल माझी Hate the sin and not the sinner अशी भूमिका आहे. चर्चा: मी बऱ्याच वेळा असे निरीक्षण केले आहे की १. शेकडो मैल गाडी चालवणारे , रात्री गाडी चालवणारे लोक विरंगुळ्यासाठी धुम्रपानाचा आस्वाद घेतात.

भारत आणि इन्डिया

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 01/12/2015 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो , आपल्या देशाच्या नावाबद्दल हा धागा उघड्तोय. आपली मते मांडावीत . वितंडवाद नसावा. नावात काय असते? हे मत देशाच्या बाबतीत तरी लागू होऊ नये असे माझे मत आहे. आपल्या देशाची दोन किंवा तीन नावे असणे आता सवयीचे झाले असले तरी माझ्या अंतरमनाला ते अजिबात पटत नाही. आजकालची पिढी देशाचे भारत हे नाव घ्यायला एकतर कमीपणाचे समजते किंवा त्यांना ते फारच छापील वाटत असावे. सगळीकडे इंडिया इंडिया नावाची चालती आहे.

अध्यात्म-विज्ञान समन्वय ?

लेखक यनावाला यांनी सोमवार, 26/10/2015 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे.

अलाहाबाद न्यायालयाचे सामाजिक भान

लेखक नमकिन यांनी बुधवार, 19/08/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला हा आगळावेगळा निर्णय- Allahabad HC orders UP officials, politicians to send their kids to government schools http://a.msn.com/r/2/BBlQU4H?a=1&m=EN-IN श्री म्हात्रे यांच्या नेमाडे बडबडले या धाग्यावरील प्रतिसादातुन येथे स्वतंत्र धागा काढण्याचे प्रयोजन शीर्षक. तेच लिहिलंय न्यायाधीश ने की सरकारी कर्मचारी चे मुले सरकारी शाळेत गेली की आपोआप धोरण आखणी, अंमलबजावणी, शालेय वस्तु पुरवठा, पुस्तक छपाई, वितरण, शिक्षक निवड व नेमणूक, निवडणूक व तत्सम गैर शैक्षणिक कामातुन सुटका, सर्व सुरळीत होईल. येथे टीकाकार न्यायाध

बाहुबलीच्या निमित्ताने …

लेखक अभिदेश यांनी मंगळवार, 21/07/2015 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला .

इन्फोसिस व विप्रो (नारायण मूर्ती आणि अझीम प्रेमजी ) यांनी अभियंत्यांचे नुकसान केले कि फायदा ?

लेखक दा विन्ची यांनी सोमवार, 20/07/2015 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
इन्फोसिस व विप्रो (नारायण मूर्ती आणि अझीम प्रेमजी ) यांनी अभियंत्यांचे नुकसान केले कि फायदा ? मी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. गेली अकरा वर्षे या व्यवसायात आहे व त्या आधी १० वर्षे उद्योग क्षेत्रात होतो. माझ्या व त्या आधीच्या काळी अभियंते कोअर ( ज्या क्षेत्रातली पदवी, त्याच क्षेत्रातली) कंपनी मिळवण्यासाठी अतिशय उत्सुक असत. सध्या मात्र जवळपास सर्व अभियंते थोडा जास्त पैसा, मोठ्या शहरातील राहणीमान, परदेश गमनाची संधी या व अश्या अनेक कारणासाठी माहिती व तंत्रज्ञानं क्षेत्रातील नोकरीला सुवर्णसंधी समजून त्या क्षेत्रात नोकरी करत आहेत .

स्त्रीधन

लेखक शंतनु _०३१ यांनी बुधवार, 15/07/2015 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीधन " भेंडीच्या भाजीत कांदा ?? " ठेवणीच्या स्वरातील प्रश्न वजा नावड दर्शवणारे वाक्य "तिला " उद्देशुन तोंडातून निघून गेले, आता संसार सुरु झाला अस आईचे खोचक ( की सूचक ?) वाक्य आणि तिची अतीव प्रेमाच्या नजरेला एकाच वेळेस तोंड द्यावा लागलं. पुढच्या गंभीर परिणामांची कल्पना घेवून थोडा मावळ सूर आवळला आणि उसन (धाडसी ) अवसान आणून " हि अशी भाजी मी आजपर्यंत खाल्लीच नाही ” असा स्वत: चा बचाव केला. " पण आमच्याकडे अशीच करतात हो " ( बिटवीन द लाईन : खावून घ्या असा धमकी वजा प्रेमळ सल्ला ) मिळाला. अरे खा की तिनं तिच्या पद्धतीने केलीये टेस्ट तर कर .