Skip to main content

पण कधीतरी अमेरिकेच्या / पाश्चिमात्यांच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 20/01/2023 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
उपयोजक यांन्च्य्या धाग्यात :" पण कधीतरी अमेरिकेच्या (पाश्चिमात्यांच्या " दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी" असे होते , त्यातून हि विचार मांडत आहे आधीच क्षमा मागतो कि हे अमेरिके बद्दल नाही .. याच कारण कि "पाश्चिमात्य देश म्हणजे काही फक्त अमेरिका नव्हे " कानडा , ऑस्ट्रेल्यात , न्यू झीलंड इत्यादी देश याशिव्या जुने इंग्लंड आणि आजकाल बरेच जण आयर्लंड ला हि स्थलांतरित होतात ... याशिवाय इंग्रजी भाषा ना बोलणारे काही इयूरोप मधील देश आणि सिंगापोर आणि जपान सारखया प्रगत देशात हि लोकं कायमचे राहायला गेले आहेत ...

ह्या दोन बातम्यांमध्ये एवढा विरोधाभास का आहे?

लेखक शानबा५१२ यांनी मंगळवार, 27/12/2022 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : 'चर्चा' ह्या लेखन प्रकाराखाली दीलेले हे खालील आवाहन, सुचना वाचली आहे. व ते लक्षात ठेऊन लिहत आहे.
केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल.
नमस्कार मिपाकरांनो, मी विओन (WION) ह्या युट्युबवरील बातमी देणा-या चॅनलचा फॅन आहे म्हणजे मला ते चॅनल फार आवडते. त्यातल्या पल्की शर्मा ह्या आता ते चॅनल सोडुन गेल्या.

उजव्यांकडून होणारा सिनेमा बहिष्कार तार्किक आहे का?

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 17/12/2022 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या काही काळापासून काही सिनेमांवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतातील उजव्या गटांकडून / हिंदुत्ववादी विचारप्रवाहाकडून होताना दिसते.‌ हिंदुत्ववादी सामान्य नागरिक, समर्थक, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री इ. अशा सिनेमांविरोधात बहिष्कारचे आवाहन करताना दिसून येतात.‌ सध्या अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या पक्षाची सरकारे आहेत.‌ असे असतानात असे केवळ बहिष्काराचे आवाहन तार्किक आहे का?

ब्रम्हास्त्र किंवा फुसकीअस्त्र ?

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 08/09/2022 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
उध्या ब्रम्हास्त्र रिलीज होणार आहे. हिंदूस्थानी लोक खरंच या चित्रपटाचा बहिष्कार करतील का ? बॉयकॉट मोहिम चालवणार्‍यांचा प्रयत्न सफल होईल का ? सर्वात महत्वाचे म्हणजे कॉपीवुड चा जो कोट्यावधीचा पीआर आहे त्यांच्या ताकदीला अपयश येईल का ?

ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ४)

लेखक मदनबाण यांनी रविवार, 21/08/2022 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या धाग्याचे २००+ प्रतिसाद झाल्याने हा धागा उघडला आहे. कॉपीवुड ची लोकांनी व्यवस्थित ठासणे सुरु केले आहे, चड्डी सिंग सुपर डुपर फ्लॉप झाल्याचा मला विशेष आनंद झाला आहे. :) जे जे माज करतात त्यांची ठासणे हे सध्या पाहण्यात येत आहे.एक महाफ्लॉप व्यक्तीने [ त्याला अभिनेता म्हणणे इतपत देखील त्याची पत नाही ] लोकांना चक्क धमकावायचा प्रयत्न केला. याच बरोबर दोबारा ला पहिल्या बारीतच घरी पाठवले. या पुढे बॉयकॉट कसे होईल ? तसे करण्यास यश मिळेल का ?

डिंक म्हणजे DINK (double income no kids)

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 19/08/2022 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
डिंक डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे. हा एक चर्चेचा विषय आहे आणि याबद्दल मिपावर धागा काढण्याबद्दल चर्चा झाली होती. ते वाचूनच मी हि सुरुवात करतो आहे. सध्या बऱ्याच स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा आणि स्त्रियांच्या स्वावलंबित्वाचा स्तर वाढत आहे हि एक सकारात्मक बाब आहे. यामुळे काही जोडप्यांची आपल्याला मूल नको अशी मनोवृत्ती होती / होत आहे किंवा झाली आहे. पूर्वी फारशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करत नव्हत्या. त्याबद्दल समाजाची मनोवृत्ती सुद्धा तयार झालेली नव्हती.

ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग १)

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 01/08/2022 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्ट २०२२ हा महिना सुरू झाला असल्याने ताज्या घडामोडींचा नवा धागा काढत आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल. या निवडणुकीत भाजपकडून बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकड आणि तृणमूल काँग्रेस सोडून इतर सगळ्या विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा हे उमेदवार आहेत. मार्गारेट अल्वांची उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही या कारणाने तृणमूल काँग्रेस हा एक प्रमुख विरोधी पक्ष मतदानात भाग घेणार नाही. तसेच बिजू जनता दलानेही जगदीप धनकड यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे ते देशाचे पुढचे उपराष्ट्रपती बनतील हे जवळपास नक्की आहे.

द कश्मिर फाईल्स चित्रपटाच्या निमित्ताने

लेखक धर्मराजमुटके यांनी शुक्रवार, 18/03/2022 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच बहुचर्चित 'द कश्मिर फाईल्स' हा बहुचर्चित चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या अनुषंगाने माध्यमांमधे उलट सुलट बातम्या दोन्ही बाजूंनी दोषारोप आपण अनुभवले. उत्तर प्रदेश निवडणूक आणि त्यानंतर हा चित्रपट यांच्या चर्चेमुळे युक्रेन युद्धाला भारतीय माध्यमांत मिळणारे महत्त्व कमी झाले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जे अस्वीकरण (डिस्क्लेमर) दाखविले त्यात हिंदी भाषांतराच्या अनेक चुका आढळल्याने पहिल्याच घासाला खडा लागावा असे झाले. चित्रपटाचा एकंदर कालावधी अंदाजे २ तास ५० मिनिटाचा आहे. मला स्वतःला चित्रपटाचे शेवटचे १५ मिनिट सोडले तर उर्वरीत चित्रपट अगदी संथ वाटला.

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 01/01/2022 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांचे २०२२ मध्ये नववर्षाभिनंदन! या वर्षात उत्तरप्रदेशासहित इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवेल असा निष्कर्ष काढणारी एक कल चाचणी प्रसिद्ध झाली आहे. अर्थात, अशा कल चाचण्यांची विश्वासार्हता हा चर्चेचा विषय असतो.