बिहार निवडणूका २०२५ आणी प्रशांत किशोर
नमस्कार,
दिनांक ६ आणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार विधानसभेसाठी निवडणूका होत आहेत. निवडणूकीचे निकाल १४ नोव्हेबर २०२५ रोजी येतील.
निवडणूक निकालांवर मिपावरील बरेच सदस्य लक्ष ठेऊन असतीलच तर निकालांची कारणीमिमांसा करणारे काही लेख १४ नोव्हेंबर २०२५ नंतर मिपावर येऊ शकतील.
मला मुख्यतः महाराष्ट्र विधानसभा आणी राष्ट्रीय स्तरावरील लोकसभेच्या निवडणूकांमधे विशेष रस असतो. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणूकांबद्दल रस निर्माण झाला ते केवळ एका व्यक्तीमुळॅ ते म्हणजे प्रशांत किशोर पांडे ! (बिहार मधे आडनावाचा उल्लेख सार्वजनिक जीवनात केला जात नाही मात्र मराठी वाचकांसाठी आणि 'तुही जात कंची ?' या प्रश्नात रस असणार्यांसाठी 'पांडे' असण्याचा विशेष उल्लेख !
भारतातील राजकीय निवडणू़कांचा अभ्यास करणार्या व्यक्ती आणी संस्थांसाठी प्रशांत किशोर उर्फ पीके हे नाव अगदी ओळखीचे आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीची आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघ (युनोच्या) अंतर्गत 'सार्वजनिक स्वास्थ्य कार्यक्रम' योजनेअंतर्गत काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून अनेक राजकीय पक्षांसाठी काम केले. मला स्वतःला त्यांना राजकीय रणनीतीकार म्हणण्यापेक्षा राजकीय व्युव्हरचनाकार म्हणणे जास्त संयुक्तिक वाटते.
त्यांच्या राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून काम करण्याच्या कार्यकाळात त्यांनी केलेली आणि प्रसिद्ध पावलेल्या कामांची यादी खालीलप्रमाणॅ.
भाजपा : गुजरात विधानसभा आणी लोकसभेसाठी २०१२ आणि २०१४ मधे काम केले. त्यांच्या "चाय पे चर्चा", 'रन फॉर युनिटी' "3 डी रॅली' सारख्या संकल्पना कमालीच्या यशस्वी ठरल्या.
जनता दल (युनायटेड) : २०१५ मधे नितिश कुमार आणि महागठबंधनसाठी काम केले. २०१५ मधे प्रशांत किशोर आणी इतर काही जणांनी मिळून Indian Political Action Committee (I-PAC) नावाची संस्था स्थापन केली. ह्या संस्थेने मग अनेक राज्यात आणी अनेक पक्षांसाठी निवडणूका जिंकण्यासाठी काम केले.
पंजाब काँग्रेस : २०१७ मधे पंजाबमधील निवडणूकांमधे कॅप्टन अमरींदर सिंह यांचेसाठी 'पंजाब दा कॅप्टन' मोहीम राबविली.
उत्तर प्रदेश काँग्रेस : '२७ साल बेहाल', "खाट पे चर्चा" अशा मोहिमा राबविल्या. मात्र सभेसाठी जमलेल्या लोकांनी त्या खाटा पळविल्याने ही मोहिम वेगळ्या कारणाने गाजली. या निवडणूकीत कॉंग्रेसला आणी पीके टीम ला विजय मिळवता आला नाही.
वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी : यांचेसाठी २०१९ आणि २०२४ मधे निवडणूक मोहिम (२०२४ मधे वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी चा पराभव होऊन तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले).
शिवसेना (अखंड शिवसेना, आताची उबाठा शिवसेना) : पीके आणी (I-PAC) यांनी यांचेसाठी काम केले. या कामाची फी म्हणून प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की तुमच्या राजवटीत बिहारी मजुरांना शिवसेनेकडून मारहाण होऊ नये याची काळजी घ्या.
२०२० मधे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी दिल्लीसाठी काम केले.
२०२१ मधे तामिळनाडू मधे एम. के. स्टॅलीन साठी काम केले.
२०२१ आणी २०२४ मधे प.बंगालमधे तृणमुल कॉग्रेस साठी निवडणूक मोहिमेत भाग घेतला. (प्रशांत किशोर यांनी मात्र २०२१ मधेच राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून आपल्या कामातून निवृत्ती घेतली आणी त्यांनी आपले पुर्ण लक्ष बिहारवर केंद्रीत केले.
२०२२ मधे त्यांनी जनसुराज आंदोलन चालू केले आणी त्या बॅनरखाली जवळ्जवळ दोन वर्ष ३००० किलोमीटर पदयात्रा करुन पुर्ण बिहार उभा आडवा पिंजून काढला, गावोगाव फिरले आणी बिहारची स्थिती जाणून घेतली आणी आपण राजकीय पक्षाची स्थापना करु असे जाहिर केले. पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर सुरुवातीला गांधीजीची प्रतिमा होती.
२ ऑक्टॉबर २०२४ गांधीजयंतीच्या दिवशी आपण "जनसुराज पक्ष" ची स्थापना करत असून त्या नावाखाली निवडणूका लढवू असे जाहिर केले. आता पक्षाच्या झेंड्यावर गांधीजींसोबत बाबासाहेबांची देखील प्रतिमा आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह "स्कुल का बस्ता" म्हणजे "शाळेचे दप्तर" आहे.
उद्याच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास सगळ्याच मतदारसंघांमधे (२४३ पैकी २३८ जागांवर) उमेदवार दिले आहेत. जवळपास सगळेच उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. बरेचसे उमेदवार चागले शिकलेले, प्रशासकीय पदावरून किंवा चांगल्या पदावरुन निवृत्त झालेले आहे. मात्र मुस्लीम, मागासवर्गीय आणि अगदी तळागाळातील जातीतील उमेदवार देखील दिले आहेत.
त्यांची बिहार स्थितीबद्द्लची बरीचशी अनुमाने सटीक आहेत व विचार करण्यास प्रवृत्त करतात. उदा.
१. बिहार मधे कागदावर दिसते त्यापेक्षा जास्त गरीबी आहे.
२. बिहारी मतदार जातीपातीवर आधारीत मतदान करतात हा गैरसमज आहे. देशातील बाकी मतदार जितका जातीपातीचा विचार करुन मतदान करतात तेवढाच विचार बिहारी मतदार करतात.
३. ज्यांनी लालूंचे जंगलराज अनुभवले आहे ते केवळ ते जंगलराज परत येऊ नये म्हणून नितीश कुमारांना आणि (एनडीए ला) मतदान करतात.
४. मुसलमानांना भाजपाची भीती वाटते त्यामुळे बरेचशे नाईलाजाने लालूंच्या पक्षाला मतदान करतात.
५. देशातील सगळ्यात जास्त आय एस / आय पीएस हे बिहारमधून येतात हा मोठा गैरसमज आहे. हे बिहारी मुळातच बिहारमधून निघून इतरत्र स्थायिक झालेत व तिकडे त्यांना जे चांगले वातावरण लाभले आहे त्याच्या परीणाम म्हणून आपल्याला जास्त बिहारी सरकारी नोकरीत दिसतात.
६. बिहारी मजूर म्हातारपणी थकल्यावर तरी आपल्या घरी परत येईल मात्र शिकला सवरलेला बिहारी आजची परिस्थिती पाहता बिहार मधे येण्याची शक्यताच नाही.
७. दक्षिण भारतातील राज्ये प्रगत होण्याचे एक मोठे कारण म्हणजे तिथले मतदार भाकरी फिरवितात. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कोणताच पक्ष सत्तेवर राहत नाही. त्यामानाने बिहारमधे पर्याय नसल्यामुळे मतदार आलटून पालटून लालू किंवा नितिश यांनाच मते देतात.
मतदारांना तिसरा व चांगला पर्याय मिळावा म्हणून आपण जनसुराज पक्षाची स्थापना केल्याचे ते सांगतात आणी बिहार मधून पोटपाण्यासाठी बाहेर पळणार्यांना बिहार मधे रोजगार उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावे हे त्यांचे मुख्य कार्यक्रम आहेत असे ते सांगतात.
निवडणूकांमधे त्यांना किती जागा मिळतील त्याच्या अंदाज सांगताना ते म्हणतात की मुळात बिहार ची परिस्थिती सुधरु शकते हा विश्वासच तेथील लोक गमावून बसले आहेत. जनसुराज पक्ष हा तिसरा पर्याय आहे याची त्यांना व्यवस्थित जाणीव झाली तर १५० पेक्षा जास्त जागा येऊ शकतील आणि नाही झाली तर १० जागांच्या आतमधेच त्यांचा खेळ संपेल असे अनुमान ते सार्वजनिक रित्या वर्तवतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प़क्षाला ३० ते ६० दरम्यान जागा येऊ नयेत असे त्यांना वाटते कारण त्यामूळे इंडिया किंवा एनडीए ला घोडेबाजार करायला उत्तेजन मिळेल आणी त्या गोंधळात जनसुराज चे विजयी उमेदवार इतर पक्षांच्या वळचणीला जाऊ शकतील आशी भिती त्यांना वाटते.
युट्यूबवर त्यांच्या बर्याच चित्रफिती आहेत, अधिक माहितीसाठी त्या इच्छूकांनी बघाव्यात.
"इस बार अपने बच्चों के भविष्य के लिए वोट दो" हे त्यांचे निवडणूक घोषवाक्य आहे.
मी भाजपासमर्थक असलो तरी प्रशांत किशोर आणि जनसुराज पक्षाला बिहार मधे चांगले यश मिळावे असे मनापासून वाटते.
नितीश, तेजस्वी किंवा काँग्रेस यांचेपैकी कुणाकडेही सत्ता गेल्यास मागील पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागेल.
लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान देखील एक उत्तम नेते आहेत त्यांना देखील चांगले यश लाभावे असे वाटते. त्यांचा पक्ष २८ जागांवर लढत आहे.
प्रशांत किशोर यांचेकडे अनेक निवडणूकांची रणणिती तयार करणे, इतर राजकीय पक्षाची रणणिती माहित असणे, उत्तम वक्ता असणे, चांगले व्यक्तीमत्त्व, भारदस्त आवाज, दुर्दम्य मात्र आंधळा नसलेला आशावाद, आणि हे सगळे गुण आहेत.
मात्र ते ब्राह्नण असणे, प्रत्यक्ष राजकीय पक्ष चालविण्याचा अनुभव नसणे, पक्षात इतर लोकप्रिय नेते नसणे अशा काही कमतरता आहेत.
शेवटी एक बिहारी सब पे भारी पडतो, की मागे पडतो, की उठून अजून संघर्ष करतो हे १४ नोव्हेंबर आणी त्यानंतर येणारा काळच ठरवू शकतो.
मात्र बिहारला तिसरा पर्याय हवा हे बिहारींच्या आणि इतर देशासाठी देखील महत्वाचे आहे.
वर्गीकरण
वाचने
17263
वाचनखूण
प्रतिक्रिया
130
प्रशांत किशोर एक चांगला माणूस
बिहार मध्ये यादव 14.26% आणि
In reply to बिहार मध्ये यादव 14.26% आणि by विवेकपटाईत
काहीही हं श्री !
बिहारी मतदारांची मानसिकता
In reply to बिहारी मतदारांची मानसिकता by चंद्रसूर्यकुमार
केजरीवालांच्या अनुभवामुळे
In reply to केजरीवालांच्या अनुभवामुळे by कपिलमुनी
दिल्लीत कोणीही केजरीवालची
In reply to बिहारी मतदारांची मानसिकता by चंद्रसूर्यकुमार
बिहारच्या मतदारांची मानसिकता कळणे अवघड आहे.
In reply to बिहारच्या मतदारांची मानसिकता कळणे अवघड आहे. by धर्मराजमुटके
पीके
In reply to बिहारी मतदारांची मानसिकता by चंद्रसूर्यकुमार
पीकेंची तिसरा पर्याय उभा
मतदानाची टक्केवारी वाढलीय.
In reply to मतदानाची टक्केवारी वाढलीय. by शाम भागवत
एस.आय.आर चा किती वाटा असेल?
In reply to एस.आय.आर चा किती वाटा असेल? by चंद्रसूर्यकुमार
एस.आय.आर
In reply to एस.आय.आर चा किती वाटा असेल? by चंद्रसूर्यकुमार
नुसत्या टक्केवारीचा विचार
In reply to नुसत्या टक्केवारीचा विचार by शाम भागवत
तरीही हरियाणातून बिहारला एका
In reply to तरीही हरियाणातून बिहारला एका by आग्या१९९०
:)
In reply to तरीही हरियाणातून बिहारला एका by आग्या१९९०
हरियाणातून बिहारला एका दिवसात
In reply to हरियाणातून बिहारला एका दिवसात by सुबोध खरे
ह्या स्पेशल गाड्यांची घोषणा
In reply to ह्या स्पेशल गाड्यांची घोषणा by आग्या१९९०
मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला)
In reply to मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला) by सुबोध खरे
सणासुदीला सोडल्या जाणाऱ्या
In reply to सणासुदीला सोडल्या जाणाऱ्या by आग्या१९९०
जरा गुगलून पहा कि रेल्वे
In reply to जरा गुगलून पहा कि रेल्वे by सुबोध खरे
म्हणून तर म्हटलं की स्पेशल
In reply to म्हणून तर म्हटलं की स्पेशल by आग्या१९९०
उत्तराच्या प्रतीक्षेत. आता
In reply to उत्तराच्या प्रतीक्षेत. आता by आग्या१९९०
तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय
In reply to तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय by सुबोध खरे
तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय
In reply to तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय by आग्या१९९०
बवोर्र्र
In reply to बवोर्र्र by सुबोध खरे
बवोर्र्र
In reply to मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला) by सुबोध खरे
पण आमची एक मुंबई -नाशिक-
In reply to नुसत्या टक्केवारीचा विचार by शाम भागवत
शेवटची काडी
In reply to शेवटची काडी by अभ्या..
:)
In reply to :) by शाम भागवत
सनातनी प्रो मॅक्स
In reply to सनातनी प्रो मॅक्स by अभ्या..
:)
In reply to :) by शाम भागवत
थ्यान्क्यू भागवत साहेब
In reply to थ्यान्क्यू भागवत साहेब by अभ्या..
अभ्याजी,
In reply to अभ्याजी, by शाम भागवत
रोचक
In reply to रोचक by स्वधर्म
:)
In reply to :) by शाम भागवत
उपाय सांगा
In reply to उपाय सांगा by स्वधर्म
तुमच्या प्रश्नाचं उत्तर
In reply to तुमच्या प्रश्नाचं उत्तर by शाम भागवत
तो प्रश्नच नव्हता
In reply to तो प्रश्नच नव्हता by स्वधर्म
मी फक्त मत देतो.
In reply to अभ्याजी, by शाम भागवत
धन्यवाद भागवतसाहेब
मोदींना विरोध करण्याची अयशस्वी पध्दत मोदी विरोधक बदलत नसतील तर मला हसायला येत.विरोध मोदींना नाहिये हे माहीत असतानाही फक्त मोदींनाच पुढे करण्याच्या प्रत्येक पध्दतीचे मला हसू येतं. तुमची ती विश्वप्रसिध्द स्मायलीच वापरावी वाटते.नेहमी नाही पण बऱ्याच वेळेस मला उचकावण्यासाठी उत्तरं दिलेली असतात. पण माझं काम झालेलं असतं. त्यामुळे काही करण्यासाठी उरलेलं नसतं. मग स्मायली टाकणं पुरेसं असतं.पण माझ्या स्माईलीमुळे लिहीणाराच जास्त चिडीला येतो असा माझा अनुभव आहे. हा दुसरा फायदा आहे.काय आहे तुमचं नेमकं काम? लिहिणार्यांना चिडीला आणण्यात तुमचा काय फायदा? मग नुसत्या स्मायली टाकणं एवढेच का करत नाही? ;)माझी राजकारणाकडे पाहाण्याची पध्दत वेगळी आहे. मी फक्त मतदान टक्केवारीला महत्व देतो. त्या टक्केवारीचा दिर्घकालीन कल लक्षात घेतो.राजकारणाकडे पाहण्याच्या पध्दतीतल्या हा बदललेल्या ह्या दीर्घकालीन कलाशी मी चांगलाच परिचित आहे. मूळ विरोध साध्यांना नाही, साधनांना आहे.पण या तत्वाकडे दुर्लक्ष झालं तर राजकीय नेत्यांच्या खेळीमागची रणनिती लक्षात येऊ शकणार नाही असं माझं मत आहे. तसंच एखादा नेता हे तत्व कशा पध्दतीने साधतो हा माझा अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे त्याबाबतच्या वादविवादात मी पडत नाही.ह्या वादविवादात पडणार नसाल तर छानच. आधीचे उत्तर त्यासाठीच आहे. राहता राहिला पेरे पाटलांबद्दल मुद्दा. भेटलेलो आहे, पाटोद्याशी परिचित आहे सो....तेही तुमच्या अभ्यासाच्या विषयात येत आहेत तर ह्या बदलाबद्दल मनापासून शुभेच्छा.तुम्ही एक प्रामाणिक व कष्टाळू व्यक्ति आहात असं माझं मत बनलेलं आहे. फक्त पटकन राग येणं हा तुमचा स्वभाव असावा असंही वाटत आलेलं आहे. पण तुम्ही खोलवर विचार करण्याची क्षमता बाळगता असं वाटल्याने हे एवढं सगळं लिहीलं आहे. अन्यथा एक स्मायली पुरेशी होती.प्रामाणिकपणे सांगतो, इतके लिहावेसे वाटले तुम्हाला. चांगलेच आहे. माझी बायकोही माझ्या पटकन राग येण्याद्दल बोलते. तुम्ही दुसरे. खोलवर विचार करण्याच्या क्षमतेचा वापर अजून वाढवायला पाहिजे ह्याची पुन्हा जाणीव झाली. तो करावा लागू नये अशीच स्वभावसुलभ इच्छा असते पण काय करणार? संविधानाची इमोजी करायला हवी. वापरायला आणी समजावयाला सोपी अशी. :)In reply to धन्यवाद भागवतसाहेब by अभ्या..
धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद.
In reply to धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद. by शाम भागवत
एक लिहायचं राहीले. पेरे पाटील
In reply to धन्यवाद भागवतसाहेब by अभ्या..
पेरे पाटलांवा भेटून
In reply to शेवटची काडी by अभ्या..
हत्तीला सात सोंडा असल्या तर
In reply to नुसत्या टक्केवारीचा विचार by शाम भागवत
आकडे
मतदानाची टक्केवारी वाढलीय.
In reply to मतदानाची टक्केवारी वाढलीय. by धर्मराजमुटके
वरील अंदाजाला पुष्टी देणारी बातमी
In reply to वरील अंदाजाला पुष्टी देणारी बातमी by धर्मराजमुटके
लिंक चालत नाही.
In reply to लिंक चालत नाही. by चंद्रसूर्यकुमार
बातमीचा दुवा
अकरा तारखेला रात्री अंदाज
public memory is short
In reply to public memory is short by सुबोध खरे
ही माहिती वाचून वाईट वाटले.
In reply to ही माहिती वाचून वाईट वाटले. by रामचंद्र
गायपट्टा
In reply to गायपट्टा by स्वधर्म
हे त्यांच्या मातृसंस्थेने
In reply to हे त्यांच्या मातृसंस्थेने by रामचंद्र
बरोबर
In reply to गायपट्टा by स्वधर्म
अनेक सुशिक्षित राजकीय
अनेक सुशिक्षित राजकीय दृष्ट्या जागृत लोक तरीही अशा पक्षांचे हिरिरिने समर्थन करत आहेतसुशिक्षित आहे म्हणजे जागृत असतीलच असे नाही, गोबरयुगाचे, अशिक्षित नेत्याचे, त्याच्या खोट्या गोष्टींचे उघद समर्थन करतात!In reply to अनेक सुशिक्षित राजकीय by अमरेंद्र बाहुबली
बहुतेक अनेकांना शिक्षित आणि
In reply to अनेक सुशिक्षित राजकीय by अमरेंद्र बाहुबली
नेता अशिक्षित आहे, त्याला
In reply to गायपट्टा by स्वधर्म
आपल्या महाराष्ट्रात जेवढा
In reply to आपल्या महाराष्ट्रात जेवढा by विवेकपटाईत
जातीयवादाचा सुरवंट
महाराष्ट्रात गायपट्टा कुठे
In reply to महाराष्ट्रात गायपट्टा कुठे by कंजूस
जिथे जिथे भाजप चे उमेदवार
पाच वाजता ६७.१४ % मतदान
In reply to पाच वाजता ६७.१४ % मतदान by शाम भागवत
आता अबा, अभ्या, आग्या व
पूर्व विश्लेषण राहू द्या
लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी
धर्मराज मित्रा - १४ तारखेनंतर
In reply to धर्मराज मित्रा - १४ तारखेनंतर by खटपट्या
धन्यवाद मित्रा !
ऍक्सिस माय इंडिया नुसार 90%
पी.के. म्हणजे केजरीवाल नव्हे.
बालबुद्धिची "बालदिनी" ५/६१ भेट!
पण ज्या चुना आयोगामुळे एवढा
In reply to पण ज्या चुना आयोगामुळे एवढा by अमरेंद्र बाहुबली
आमच्या सोसायटीत फटाके फुटले.
In reply to आमच्या सोसायटीत फटाके फुटले. by विवेकपटाईत
शिक्षित
In reply to शिक्षित by चंद्रसूर्यकुमार
"बंगाली समाज - विशेषतः
In reply to "बंगाली समाज - विशेषतः by टर्मीनेटर
वा वा
In reply to वा वा by अभ्या..
आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद...
In reply to "बंगाली समाज - विशेषतः by टर्मीनेटर
आणि उजवे विचारतात गांधीजींनी
In reply to आणि उजवे विचारतात गांधीजींनी by आग्या१९९०
भगतसिंग आणि कट्टर कम्युनिस्ट .... ?
In reply to भगतसिंग आणि कट्टर कम्युनिस्ट .... ? by गामा पैलवान
क्रांतिकारक भगतसिंगांना
In reply to क्रांतिकारक भगतसिंगांना by आग्या१९९०
काहीच गैर नाही.
In reply to काहीच गैर नाही. by गामा पैलवान
तुम्हाला भगतसिंग समजलाच नाही.
In reply to तुम्हाला भगतसिंग समजलाच नाही. by आग्या१९९०
तुम्ही या कि उजव्यांच्या
In reply to तुम्ही या कि उजव्यांच्या by सुबोध खरे
अधिकृत पदवीधर असल्याने
In reply to अधिकृत पदवीधर असल्याने by आग्या१९९०
मग अतिजरठ विभागात बसा
In reply to मग अतिजरठ विभागात बसा by सुबोध खरे
:)
In reply to भगतसिंग आणि कट्टर कम्युनिस्ट .... ? by गामा पैलवान
श्री० गा०पै०
In reply to श्री० गा०पै० by युयुत्सु
ए० आय० च्या मदतीने गीतेतल्या
In reply to श्री० गा०पै० by युयुत्सु
अलिकडचा संदर्भ
In reply to शिक्षित by चंद्रसूर्यकुमार
भद्रलोक म्हणजे अभिजन. या
समजा बिहार सरकारने महिलांना
PK तेरी मोरनी को मोर ले गये...
In reply to PK तेरी मोरनी को मोर ले गये... by टर्मीनेटर
PK ला ६ टक्के मते मिळाली असती
In reply to PK तेरी मोरनी को मोर ले गये... by टर्मीनेटर
बाकी पेमेंट मिळणार नाही.
सुवर्णकाळ
इकडे कशाला ** घालायला येतात ?
In reply to इकडे कशाला ** घालायला येतात ? by सुबोध खरे
कसलं वैफल्य?
कॉन्ग्रेस
In reply to कॉन्ग्रेस by माईसाहेब कुरसूंदीकर
फक्त हात बांधून मान
In reply to कॉन्ग्रेस by माईसाहेब कुरसूंदीकर
??
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
आणि लालूप्रसादांना २५
In reply to कॉन्ग्रेस by माईसाहेब कुरसूंदीकर
तेजस्वीची मतं कॉंग्रेसकडे
In reply to तेजस्वीची मतं कॉंग्रेसकडे by शाम भागवत
तेजस्वी पार्टीला प्रति जागा
अवांतर : आम्हांस भगतसिंग समजलाच नाही ....
In reply to अवांतर : आम्हांस भगतसिंग समजलाच नाही .... by गामा पैलवान
ज्यांनी इंग्रजांची अनेकवेळा
In reply to ज्यांनी इंग्रजांची अनेकवेळा by आग्या१९९०
त्यांनी माफी मागितली म्हणून
जे स्वतंत्रता सैनिक होते ते
In reply to जे स्वतंत्रता सैनिक होते ते by आग्या१९९०
२७२ हूर निवडणूक आयोगाच्या
In reply to २७२ हूर निवडणूक आयोगाच्या by आग्या१९९०
"Old wine in new Bottle, Shape and Colour of the bottle is chang
In reply to "Old wine in new Bottle, Shape and Colour of the bottle is chang by टर्मीनेटर
ह्यात नवीन असे काहीच नाही...
In reply to "Old wine in new Bottle, Shape and Colour of the bottle is chang by टर्मीनेटर
'Whores' (सो कॉल्ड 'हूर/
'Whores' (सो कॉल्ड 'हूर/ हूरें')येक लंबर, टर्मी भौ!आजतागायत कुणी वीर चक्र,
In reply to आजतागायत कुणी वीर चक्र, by सुबोध खरे
हे २७२ दगडाखाली हात अडकल्याने
गोरी काकी च्या मतिमंद मुलाची
In reply to गोरी काकी च्या मतिमंद मुलाची by सुबोध खरे
शिशुवर्गाच्या आजीवन
In reply to शिशुवर्गाच्या आजीवन by आग्या१९९०
अतिजरठ पणाचे लक्षण असते
In reply to अतिजरठ पणाचे लक्षण असते by सुबोध खरे
:)
राहुल गांधींना हे कोर्टात का
In reply to राहुल गांधींना हे कोर्टात का by सुबोध खरे
:)
In reply to :) by आग्या१९९०
रागा २०२९ च्या लोकसभा
In reply to :) by आग्या१९९०
तुम्ही टंकत राहा राहुल गांधी
In reply to तुम्ही टंकत राहा राहुल गांधी by सुबोध खरे
तुम्ही आयुष्यभर कण्हत कुथत
In reply to तुम्ही आयुष्यभर कण्हत कुथत by आग्या१९९०
एक सर्वेक्षण केले की 2029
राहुल गांधी हे भाजपचे स्टार
चेन्नईत कॉलेजकन्यकांसमोर
काँग्रेसचे लोकं अजूनही राहुल
ए आई लेखावर प्रतिसाद देताना
मोशांचा राजकीय विमा
पंतप्रधान
In reply to पंतप्रधान by हणमंतअण्णा शंक…
मला पण! अमितशा नाही हू देत पण