गच्च मिठी शहारलेली
हळुवार कातरवेळी
गच्च मिठी शहारलेली
चंदेरी किणार ल्यालेली
आकाशी ओढणी रंगबिरंगी
तव गालावर रेशमी
किरणांची केशरी लाली
जांभुळनयनात हरवली
गच्च मिठी शहारलेली
सोहळा रजनीगंधाचा
स्पर्श रेशमी आनंदी ..
लाजुनी दडला सूर्य
ओठांची निशब्द बोली..
---- शब्दमेघ (१४ डिसेंबर २०१०)
* अवांतर :
१. जांभुळनयन हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे, कदाचीत आश्चर्य वाटु शकते, पण माझ्या एका मैत्रीणेचे मोठे काळे पाणीदार डोळे पाहुन मला नेहमी जांभळाचीच आठवण यायची .. ही कविता त्या जांभुळनयनांना अर्पण ....
काव्यरस
मिसळपाव