Skip to main content

समजत नाही...

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 14/02/2013 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://www.misalpav.com/node/23918 क्रांतीतैची परवानगी घेउन हा प्रयत्न सादर करत आहे,मला गझलच काय कविता सुद्धा करता येत नाही,तरीसुद्धा पण हा एक प्रयत्न , मुड बदलाचा. त्या दोन आसवांना मज हुलकावयास आले आनंदले एवढे की त्याचे अश्रु टाळता न आले सलावे काटे दु:खाचे, कितीदा मनात आले कमलवेलींतुन सुखांच्या मज निसटता न आले निंमिषात नाती अतुट भंगली आरश्यापरी निमिषात कवड्श्यांच्या रंगात दंगले मी जगण्याचा मुखवटाच फसवा,जेंव्हा कळाले मला मृत्युच्या उत्तुंग क्षणाची वाट पाहणे आवडले मला अनुकुलता प्रतिकुलता हे व्दंद पाहिजे टाळले सूचना अन आर्जवांचे गजरे मी हरदिनी माळले असण्याहुनी सुखाचे नसणेच असावे ठीक सुख भोगुनी वाटताना मज हे ब्रम्हज्ञान झाले या सागरी सुखाच्या लाटा अमाप उठती ना नव्या ना जुन्या वेदना सांभाळणे न जमले. हा नव्हे प्रयत्न विडंबनाचा माझा खरेच आहे पा-याची टा़ळुन बाजु मी आरशांत पाहे. ५० फक्त....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3726
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

५० रावचे लिखाण काव्य विभागात बघितले आणि जरा आश्चर्यच वाटले. पण तुम्ही चांगलाच धक्का दिलात ५० राव
जगण्याचा मुखवटाच फसवा,जेंव्हा कळाले मला मृत्युच्या उत्तुंग क्षणाची वाट पाहणे आवडले मला
व्वाह!! ते वृत्तबित्त मरु दे तिकडे, पण काय सही मांडणी केलीये, वाह. अजुन लिहा ओ.

हा नव्हे प्रयत्न विडंबनाचा माझा खरेच आहे पा-याची टा़ळुन बाजु मी आरशांत पाहे.
हे नसतं तरी चाल्लं असतं. बाकी कविता चांगली आहे, तुम्ही मनावर घेतल्यास कथांची सफाई यातही येईल हेवेसांनल.

भावना चांगल्या प्रकारे व्यक्त झाल्यात. वृत्त आणि छंद ही काहीशी कारागिरी म्हटली तरी चालेल. तालात म्हणून बघ. तुलाच जास्त योग्य शब्द सुचतील.

तरीही उत्तेजनार्थ मात्र नक्किच दिला पहिजे... तुमच्या ओरिजनल कवितांच्या तिव्र प्रतिक्षेत. क्रांतीतैंच्या लिखाणाची बातच और आहे | ५० फक्त मात्र शब्द योजुनी प्रतिभा वाहे...||

मस्त ओ ५०, बाकी ती कथामालिका का उगा अडवून ठेवलीय? लवकर येऊ द्यात पुढचे भाग.

In reply to by बॅटमॅन

मी काय म्हन्तो वल्ली... कुणी कुणी कोणते कोणते लेख अपुरे ठेवलेत त्याची यादी करूया का रे..? सुरुवात ब्याटम्यानापासून.. ;-)

छान जमली आहे कविता. जगण्याचा मुखवटाच फसवा,जेंव्हा कळाले मला मृत्युच्या उत्तुंग क्षणाची वाट पाहणे आवडले मला अनुकुलता प्रतिकुलता हे व्दंद पाहिजे टाळले सूचना अन आर्जवांचे गजरे मी हरदिनी माळले असण्याहुनी सुखाचे नसणेच असावे ठीक सुख भोगुनी वाटताना मज हे ब्रम्हज्ञान झाले हे खासच लिहिलं आहेस!

अरे वा. कविता आणि चक्क पन्नासरावांची. मस्तच एकदम छान जमलीय दादा. अजून येऊ दे. :)

५० रु . याच्या क्षमतेला काय झालय ??? मला तरि निदान हि कविता कम गझल बोर्डावर टाकण्या इत्पत रुचली नाहि . ५० फक्त तुमच्याकडनं अजुन चांगल्या अपेक्षा आहेत ओ ...

असण्याहुनी सुखाचे नसणेच असावे ठीक सुख भोगुनी वाटताना मज हे ब्रम्हज्ञान झाले
विरक्तीकडे वाटचाल ?