मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी गझल

इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
आता नकोत गप्पा खोट्या पराक्रमाच्या येथे कितीक गाथा माझ्या पराभवाच्या खांद्यावरी रुढींच्या जो वाहतो पखाली इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या येती कितीक येथे मशहूर रोज होती गझला अजून माझ्या आधीन काफियांच्या लुचतात स्वार्थ होउन 'हव्यास' माणसाला विरते सदैव निष्ठा गर्दीत गारद्यांच्या झिम्माड पावसाचे दिसते न दु:ख कोणा लपतो विरह नभाचा धारेत आसवांच्या माथ्यावरी सुखांचे ओझे 'विशाल' झाले आधार शोधतो मी समवेत वेदनांच्या विशाल...

एक केवळ बाप तो

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:

एक केवळ बाप तो


तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो

तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो

अंतरात्म्याचा दुरावा वाढला जर फ़ार तर
अंतराला अंतराच्या अंतराने कापतो

वाचणारा वाचतो पण; का? कशाला? जाणतो?
वाढवाया आत्मगौरव छापणारा छापतो?

आसवांच्या आसवांना धीर द्याया धावतो
निर्भयाला अभय ज्याचे एक केवळ बाप तो

...देव आहे अंतरी

अजय जोशी ·
लेखनविषय:
काव्यरस
गझल... तू मला टाळून कळले, लपविले जे अंतरी.. आणखी आणू नको तू आव कुठले अंतरी..! दूर तू असतेस आता, काळजी कुठली नसे... भेट की भेटू नको विश्वास आहे अंतरी..! मन तुझे कळले मला शब्दांविना स्पर्शातुनी.. फारही सांगू नको तू ठेव थोडे अंतरी..! मी तुला भेटायला इतके मुखवटे चढविले.. आणि ओळखलेस तेंव्हा भाव फुलले अंतरी..! ती गुलाबाची कळी पाहून मी स्मरले तुला.. फुलत गेले आठवांचे रोम हर्षे अंतरी..! आज तू पुसलेस अश्रू, पायही दमले तुझे.. केवढे छळलेस पूर्वी, काय पिकते अंतरी..? घोषणा केलीस तू भेटायचे आहे पुन्हा.. पण मिठीच्या आत कळले फोलपण जे अंतरी..! या मनाच्या वावराला दु:ख जळण्याचे नसे.. पण कुणी समजून घ्या ह

पाहून घे महात्म्या

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:

पाहून घे महात्म्या

पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते

वाटले नव्हते कधी

नाहिद नालबंद ·
लेखनविषय:
काव्यरस
हे असे घडणार काही वाटले नव्हते कधी पोळले तुज चांदणेही वाटले नव्हते कधी ठरविले वेडा जगाने ना तयाचे दु:ख पण तू मला वेडा म्हणावे वाटले नव्हते कधी बेत काही मी उद्याचे योजिले माझ्या मनी पण उलट पडतील फासे वाटले नव्हते कधी भेटण्यासाठी तुला मी आतुर जेवढी इथे तेवढा आहेस तू ही वाटले नव्हते कधी चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी सोबती नुरले कुणीही शेवटी सोडेल ती सावलीही साथ माझी वाटले नव्हते कधी

नाटक वाटू नये

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:

नाटक वाटू नये


थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

एक जिलबी पाडायचीच

वेल्लाभट ·
लेखनविषय:
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं... आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं... यमक जुळतं का बघावं म्हटलं... तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी a सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच होईल बहुदा पानिपत,

चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला -

विदेश ·
लेखनविषय:
चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला "चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला .. आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला .. एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला .. हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला लेउनीया साज आली कामिनी थाटात ती तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला

काळजावर मोगर्‍याचे वार झाले

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
आज डोळा आसवांचे भार झाले वेदनांचे मोकळे कोठार झाले दुश्मनांची राहिली ना जरब काही ओळखीचे चोर येथे फार झाले देवभोळा साव आता मी न उरलो दैव माझे यारहो गद्दार झाले भ्रष्ट का अंधारही होतो अताशा..? चंद्र तारे कां निशेचे, 'जार' झाले? आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले काळजावर मोगर्‍याचे वार झाले वाचले जे झुंजले जगती 'विशाला' पाठ दावुन धावले ते ठार झाले ! *********************************** (वृत्त:मंजुघोषा)

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
*********************************** किती वाकुडे बोल बोलून झाले स्वत:च्याच सत्वास गाळून झाले धरा सांगताहे कथा पावसाची किती थेंब पदरात झेलून झाले ? जरी भोवती 'माणसे' फार झाली तरी एकट्यानेच 'खेळून' झाले नको रोकडा, दागिनेही नकोसे बियाण्यासवे सत्व तोलून झाले जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ? चकोरापरी प्राण उधळून झाले कसा रे मुरारी तुझा हा अबोला? सुरांवर तुझ्या आज भाळून झाले 'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे' पुन्हा आरशालाच टाळून झाले किती राहिले श्वास देहात बाकी ? 'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ? *********************************** विशाल