हे असे घडणार काही वाटले नव्हते कधी
पोळले तुज चांदणेही वाटले नव्हते कधी
ठरविले वेडा जगाने ना तयाचे दु:ख पण
तू मला वेडा म्हणावे वाटले नव्हते कधी
बेत काही मी उद्याचे योजिले माझ्या मनी
पण उलट पडतील फासे वाटले नव्हते कधी
भेटण्यासाठी तुला मी आतुर जेवढी इथे
तेवढा आहेस तू ही वाटले नव्हते कधी
चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा
मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी
सोबती नुरले कुणीही शेवटी सोडेल ती
सावलीही साथ माझी वाटले नव्हते कधी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3802
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय जबरी आयडी आहे! "नाहिद"चा
आणि नालबंद चा अर्थ पण सांगा
In reply to काय जबरी आयडी आहे! "नाहिद"चा by आदूबाळ
नालबंद हे मुसलमान समाजातील
In reply to आणि नालबंद चा अर्थ पण सांगा by खटपट्या
सुंदर ग़ज़ल!
मस्तच.
सुंदर गझल!!
वृत्तात अजुन खटक्यात बसायला
मग काय वाटले होते?
ठरविले वेडा जगाने
मी हेच म्हणणार होतो … अकारण
In reply to ठरविले वेडा जगाने by सस्नेह
छान आहे. आधी वाचायची राहिली.
वा !
शोधत शोधत वाचत वाचत मागे आल्यावर , जवळपास अशीच पण ही नाहीत अशा