हास्य
(ऐन दुपारी!)
ऐन दुपारी वाचायच्या 'टनाटन दुपार' ह्या पेश्शल पाक्षिकाचा धागा मास्तरांनी आज भादव्याच्या पहिल्याच दिवशी काढला आणी ऐन दुपारी आमच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली! ;)
ऐन दुपारी, प्रभू विचारी, 'टनटन' पहा काढली
अहो त्याची विनायकी मोडली!
हिम टाकून ती रम भरताना
कुठून अचानक आली कल्पना
गुपचूप येऊन जालामागुन, 'परा' 'बिका' ओढली
दिसता लेखक त्याला अडवा
हात 'अवलिया' त्याचा उजवा
'रंग्या' नडला, इरेस पडला, चूड पहा लावली
-चतुरंग
काव्यरस
(तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!)
प्रेरणा शाहरुख ह्यांची 'तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!'
कोनी एका ओळिचं धागं काडाया कायबी जुळिवतंय
आनी पब्लिक त्येच्यावर येड्यावानी परतिक्रिया देतंय
आमानी नाय कवा परतिसाद देयाचं वाटनांर
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!
लोकं लावत्यात कौल अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात हानतुय दगुड, फोड कौलं तिच्यामारी
लावली तुमी कौलं सोन्याची तरी आमी फाट्याव मारनार
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!
परत्येक अवांतर परतिसादाव येक चांदनी मोजत्यात
आनी मार्केटातल्या दलालावानी बेरीज वजाबाकी करत्यात
आसला काय बी हिसाब आमी नाय मांडनार
तरीबी तिच्यायल
काव्यरस
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
कोनी 'ट' ला 'ट' आनि 'क्ष' ला 'क्ष' जुळिवतंय
आनी पब्लिक त्ये आगदी आतून आलंय म्हनतंय
आमानी नाय कवा काय आतून आल्यागत वाटनांर
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
लोकं लिवत्यात कोड्यात अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात म्हनतुंय हाय काय ही भानगड तिच्यामारी
असली आमची भाषा गावंढळ तरी शिंपल शिंपल लिवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
परत्येक वळीतला काना मात्रा उकार येलांट्या मोजत्यात
आनी साळंतल्या बीजगनितावानी बेरीज वजाबाकी करत्यात
आसलं काय गनित आमी नाय मांडनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी
आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमद
काव्यरस
बायको बरोबर भाजीला गेलो...
बायको बरोबर भाजीला गेलो, पिशवी तिच्या हातात होती
खरेदीला घेतलेल्या पैशाची, माझ्या खांद्यावर जड पोती
आलं, कडीपत्ता, भाजीवाल्यानं सहज पिशवीत सारला
दोन किलो वांगी दे म्हटल्यावर, पॅन नंबर विचारला
तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता
पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता.
कडधान्याच्या दुकानात बॅंकांचे प्रतिनिधी वाटत होते अर्ज
तूरडाळ खरेदीसाठी सवलतीच्या दरात मिळत होते कर्ज
डाळीचा मग नाद सोडला, चिकन आणलं भाराभर
त्यादिवशी मला पटलं, `घर की मुर्गी दाल बराबर'
दाल मे कुछ काला है, मोठा कठीण आलाय काळ
महागाईसमोर कुणाचीच शिजेनाशी झालीय डाळ
आमच्या संसाराचं चाक असं महागाईत फसल
काव्यरस
कविता लिहिताना!
लिहीताना विचार करू नये लिहीत जावं
अनेक चुका होतात पण पुढे जाव
विचार करायची वाट का बघायची
येत नसेल तर कविता का करायची ?
अगदीच हट्ट असेल कशीतरी यमके जुळवायचा
तर असाच कसा तरी शब्दाला शब्द मिळवायचा
अहो सुंदर कविता का सगळ्याना जमते
आपण म्हणावं प्रत्येक कविता सुंदर असते
पण कधी कधी काहीच सुचत नाही
म्हणुन का आम्ही कविताच करायची नाही ?
अरे हट , नाही जमले तरी बेहत्तर!
कोण वाचेल हा विचार करू नंतर
चला एक प्रयत्न .........
अनुत्तरित प्रश्न तर मनात साचलेले असतात
उत्तरे मिळवताना आपले केस पिकतात!
अरे वा सुरुवात तरी बरी(च) झाली
म्हणता म्हणता माझीही कविता तयार झाली..!
काव्यरस
जन उडाण संपाचे
मायेच्या हिरव्या वाढीने मिटते,
वाट्यांच्या मोहात धुंद ओसरते
जन उडाण संपाचे, नित्य पावसाते,
का होते बेफाम, कसे चळवळते !
आवाजी नेत्यांच्या हरपून भान उठती,
गुरगुरत्या हाकेला कधी रोखठोकच भिडती
बोंबलती, कोकलती, उडती, धडपडती का लढती ?
कधी आयोगी मागण्यांवर जन हे वेडे झुलती
जन सवंग होऊन रस्त्यावरती फिरती
अन् गळ्यात फलका आवर्जूनी धरती !
जन उडाण संपाचे, नित्य पावसाते,
का होते बेफाम, कसे चळवळते !
गडगडती, बडबडती, कधी फोडती, अडवती
कधी धरणे मोर्च्याच्या नादात पार चिडती
वळवळती सारखे शासना सहजच ना ते भुलती
कधी मोक्याच्या चार अटींना जन हे अडून बसती !
जाणती परी ते नित्य नेमे का पिडती ?
त्रासवी तरी त्यागाचा आ
काव्यरस
(थांब ना..)
प्राजु ताईंची सुंदर कविता " थांब ना " http://misalpav.com/node/8842 वाचुन हे सुचले
सर्द आहे खाट माझी, तू जरासा थांब ना
दाटले रे मूक मय हे, सोबतीला थांब ना
साठली गर्दी दुचाक्यांची चहू बाजूस या
सापडे एखाद 'घर' ते, पाहूनी तू थांब ना
एवढाही रेट नाही सांग ते रे मजकडे
पाहुनी तारुण्य माझे, आज थोडा थांब ना
रात्रवेळा होत आली, झोपल्या या बावळ्या
भास्कराची माय निजली, रात्र तू रे थांब ना
राहिले सारेच व्यापारी जगी हे पाहिले
सापडे "फंटूश" येथे, या ठिकाणी थांब ना
रंगल्या खाणा खुणा या, थुंकणार्याच्या जरी
मोगरा/घोगरा सांगेल सारी, ही कहाणी थां
काव्यरस
(डांबिस पिवळा)
मूळ प्रेरणा: हिंदोळा
ह. घ्या...
लघु-गुरू लयाला जाती
पडले निष्प्राण गणमात्रा
कविता वाचूनि तात्या
आक्रंदतो ढसाढसा
तप्त शब्दवर्षा
विडंबनाची नसे आशा
दिसे दीनवाणा
साक्षात केसुराणा
तुझा फसफशीत उत्साह
सोसवेना मिपाकरां
संहत नायट्रिक आम्ल
पिऊन मरतील आता
तुझ्या दुर्धरी
वेदनेचे समूळ उच्चाटन
प्राजक्ता
जयवी
करण्या एकत्र आसुसल्या
आणि एकटाच
डोलणारा
अती आनंदे
डांबिस पिवळा!!!
:)
(निवेदनः ही जबरदस्त मूळ कविता लिहून आम्हा मिपाकरांची सप्तपदी, ओबामा वगैरे चिखलातून सुटका केल्याबद्दल कवयत्रीचे जाहीर अभिनंदन!!!!!)
काव्यरस
'नांदा सौख्यभरे' (राखी तू मांडले। तुझे स्वयंवर)
राखी तू मांडले। तुझे स्वयंवर
'वर' अनावर। देशोदेशी
'टीआरपी'साठीच। मिडियाचा स्टंट
प्रसिद्धी इंस्टंट। मिळे तुला
आपुल्या देहाचा। मांडसी बाजार
कैसा हा आजार। राखी तुझा
भारतीय नार। आहेस तू राखी
संस्कृतीची 'राखी'। लाज थोडी
देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा
एकाशीच 'नांदा। सौख्यभरे'
-अविनाश ओगले
काव्यरस
मिसळपाव