Skip to main content

भूछत्री

(गेम)

लेखक धन्या यांनी बुधवार, 02/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: प्रेम गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! गेम झाली तर माणूस गेला नाही झाली तर माणूस वाचला गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! एक टपकला की दुसरा दुसरा टपकला की तिसरा गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! लपायला अजिबात जंगल नाय सावली आहे ती वड पिंपळाची गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! एकडे आहे मंद मोर ज्याला सापडत नाही लांडोर ! गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते!

नजर

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 10/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेत कुणा भक्ती,नजरेत कुणा विरक्ती, नजरेत कुणा मोका,नजरेत कुणा धोका , नजरेत कुणा वासना ,नजरेत कुणा कामना , नजरेत कुणा युक्ती,नजरेत कुणा सक्ती, नजरेत कुणा संस्कार ,नजरेत कुणा दुत्कार , नजरेत कुणा जरब,नजर कुणाची खराब, नजरेत दिसे व्यथा ,नजरेत दिसे कथा, नजरेत प्रगटे ज्ञान ,नजर मनाची शान
काव्यरस

चारोळी

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 13/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य शोधण्या हवे मन कोमल हास्य शोधण्या हवे मन निर्मल प्रेम शोधण्या हवे मन गंभीर दुखः झेलण्या हवे मन खंबीर काव्य हे स्फुराया हवे हास्य हे फुटाया हवे विचार हे प्रगटाया हवे भाव हे फुलाया हवे
काव्यरस

हादडाया दाही डिश्या

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 08/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स समस्त मिपाकरहो, मिपाकाव्यरत्न "मोकलाया दाही दिश्या" वर काव्य कधी करू असे आमच्या स्वप्नातही आले नव्हते. पण अखेरीस ही जिल्बी तळून तयार झालीदेखील!! खाली प्रेरणजिल्ब्यांचा उल्लेखही केला आहेच. वरिजिनलची सर याला नसणार हे मान्य आहेच, पण "राजहंसाचे चालणे" इ.इ. मुळे मुआफ करावे ही विणंती. निसतेले हाद पोलितुन ते मल कुन्वित आहे वास घेत्तो मोकले की मी आता हादे खात आहे एक द्य मज आनुन तुपल वफल हय्दराबादि बिरियनि मझि लळवलेलि जिभ भोगेल ति हजारो रुचिकल्कनि रत्रिच्य तिमिरत फोदलि कनकेचि अल्लद अवरने त्यन्सोबत गिरवी कुथाय? गिरवी कुथाय?
काव्यरस

धरण उषाला कोरड घशाला

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 03/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
खिशामध्ये हात घालुन काही तरी खात होता एका हातात हांडा घेऊन घाईघाईने जात होता रखरखीत ऊन्हात वहात होत्या घामाच्या धारा विचारले आम्ही त्याला कुठे जातोयस रे पोरा त्यानेही अगदी सहजतेने आम्हाला उत्तर दिले घरी आहेत आई वडिल तहाणेने व्याकुळलेले कष्ट करुन त्यांना आलेय थोडी कणकण पाण्यासाठी आमची होतेय अशी वनवन शेजारच्या गावामध्ये म्हणे टँकर येतोय दोनदा बघतो तिथे मिळ्तोय का पाण्याचा एखादा हंडा तसं तर धरण पण आहे आमच्या गावाच्या उषाला पण म्हणतात ना धरण उषाला अन कोरड घशाला आमच्या ही बाबतीत असच काही तरी घडलय धरणातले पाणी शेजारच्या जिल्ह्यांना सोडलय तुमच तर काय साहेब बिसलेरी बाटलीवर भागत हांडाभर पाण्यासाठी आम
काव्यरस

दृष्टी दोष

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बदलली नजर तुझी लेन्स लावूनी, हसत होतीस त्या आधी मला बघोनी, नयनात तुझ्या सदा मी होतो आधी , जडली कशी तुज नजरेची व्याधी लावलास जसा तू कॉनट्याक्त लेन्स नजरेत तुझ्या झालो मी नोन्सेन्स . ,
काव्यरस

(तू)

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 29/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बोटांवर चिकटलेल्या फेविक्विकच्या थेंबासारखा तू . पापण्यांच्या कोपर्‍यांवर साठणार्‍या घाणीसारखा तू . रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन भरकटलेल्या बेवड्यासारखा तू . हवा मारुन मारुन न पेटणार्‍या रॉकेल संपलेल्या स्टोव्हसारखा तू . हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखा तू . टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून वाहणार्‍या घामाच्या धारेसारखा तू . सूर्यास्ताच्या वेळी हटकून नेहमीच्या जागी पाय वळणारा तू . तोंडी नाव आलं तरी ठसठसणार्‍या विखारी जखमेसारखा तू .... तू, तू आणि तू ... सांग रे नालायका, हो तूच तू कुठे चचला आहेस?

राशी चक्रम

लेखक राजा सोव्नी यांनी शुक्रवार, 26/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मेष पुसे वृषभा ,सिह दिसला का तुला , वृश्चिक पाहुनी कन्या पळती , कर्क,मीन,कुंभात दडती , धनु पाहुनी मकर विचलित होतो, मिथुन जना आनंद
काव्यरस

स्वप्नांची शाळा

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 21/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांच्या शाळेत झालो मी भरती ,झालो ससाणा पोचलो ढगा वरती, दिसला ससा धरती वरी ,झेप घेतली त्यावरी, ससा झाला कावरा बावरा,माझा झाला बैजूबावरा , घेऊ लागलो तान-लकेर ,क्षणात झालो मी फकिर , दुसऱ्या क्षणी होतो मी राजा,वाजू लागला सनई-बाजा, झालो मी राजाचा रंक ,कधी झालो येसाजी कंक , आला हाती दाणपट्टा माझ्या ,चिरू लागलो ताज्या भाज्या, मौजेची ती स्वप्ने पडती ,स्वप्नात माझ्या झाडे उडती, गजर झाला जाग मला आली ,स्वप्नांच्या शाळेची सुट्टी झाली .
काव्यरस