मल्हारसांज
लेखनविषय:
- Read more about मल्हारसांज
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मल्हारसांज गर्भारलेली
उदरी निशा अशांत ओली
दिशांची दिशांना पुन्हा आर्त साद
डोहाळे पुरवी जलांच्या पखाली
घनभार हल्के जाता झरून
कृष्णांबरही झुके सावरून
आड धुक्याच्या घेई विचारून
गिरीराजाची ख्याली खुशाली
घनन घनन घनवृंद घुमा
सागर पाश क्षितिजी गनिमा
पश्चिमा सलज्ज निरखे प्रतिमा
लहरींच्या अधरी, पवनाच्या चाली
घुले श्यामरंगी, नभाची निळाई
विरत्या परिघा, समीपाची घाई
अधीरल्या प्रभेची कवडशी धिटाई
रवी पांघरूनी निजे मेघशाली