Skip to main content

अद्भुतरस

साम्य

लेखक चित्रा यांनी सोमवार, 28/02/2011 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
नॅशनल जिऑग्राफिकमधील (फेब्रुवारी २०११) 'अंडर पॅरिस' या लेखामुळे आणि त्यातील काही छायाचित्रांमुळे सुचलेले हे मुक्तक.
काव्यरस

मी माझ्यात बंद ....!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 14/02/2011 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
[सर्दीने अचानक बेजार झालो होतो. खूप दिवसांनी अशी जीवघेणी सर्दी. डोके सुन्न .कान बधीर मन कासावीस . आणि अचानक जाणवले की हे सुन्नपण मस्त वाटतेय. ऐकू येत नाही .छान वाटतेय. हा कोलाहल हा गोंधळ दुरून बघतोय. मी माझे तात्पुरते सुन्नपण एन्जोय करीत होतो.तेच शब्दात मांडण्याचा प्रयत्न ] डोके सुन्न ....! बधीर ….!! सर्दीने हैरान ....!!! काहीच ऐकू येत नाही झाडाची पाने हलत असतात कावळे कावकाव करीत झाडावर बसलेली मला त्यांच्यां चोची फाकलेल्या दिसतात पण आवाज येत नाही ऐकायला मी सुन्न बधीर...!
काव्यरस

प्रतिक्रीया.. की अवांतर??

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 11/02/2011 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा. माझा हा मिपा वरील नेहमीचा प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकवण्याची आवश्यकता नाही.. तुम्हा टूकार लोकांकडून मार्गदर्शन मिळावे अशी तर अज्जीबात ईच्छा नाही.

कट्टी अलमट्टीशी

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 04/02/2011 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
चारा वैरण नेसून पैरण विकसित मार्गा ऊर्जा भक्षण नकोनको ते एकलजीवन बुद्धी नेव्हर वांछी अट्टल चोरा कत्तल साची डिंडिमवृद्धी फ़ुटाफ़ुटाची कशास मागे धावून पाहे उंची अलमट्टीची तवंग कट्टर भालाबरची प्रवेशचंचू मृगेन्द्रकैची नोनचिचुंद्री कुरतडचीची गोचीड पंखी लोभस गोची सांगा सत्वर .... कुठे वाढली किती जाहली ................उंची अलमट्टीची ??? आर्द्रलाकडे बोलटभीरू भल्या पहाटे उठला मोरू दिव्या काव्या बेहतरनारू कॉकसस्ट्रेप्टो कीड विखारू तोडमोजड्या सलज्जचोच्या कलादुगाण्या गोरजमिथ्या पत्रीगोत्री अट्टलभोज्ज्या जळूवाकडे द्विदलकुपथ्या उजाडबागी तद्धितझोला हटयोग्याचा स्वतंत्र चेला अटकेपारी तुरुंग लोला तख्

स्वप्नांचे पान मुंबई

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 27/01/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचे पुर्णत्व येथे स्वप्नांचे पान मुंबई तरुणाईची सळसळ येथे तारुण्याची जान मुंबई वृत्तीतली धगधग येथे जिवाचे रान मुंबई मनामनाची ओढ येथे मनातली जाण मुंबई प्रीतीतला गोडवा येथे प्रीतीचे गान मुंबई लावण्य रुप्-सौंदर्य येथे लावण्याची खाण मुंबई नजर घायाळ होती येथे नजरेचा बाण मुंबई लखलखता श्रुंगार येथे नटलेली छान मुंबई क्षणाक्षणांस महत्त्व येथे वेळेचे भान मुंबई भविष्याची उज्वलता येथे भविष्याचे ध्यान मुंबई व्यवहारातली कुशलता येथे व्यवहाराचे ज्ञान मुंबई ध्येयाचे शिखर येथे प्रगतीचे यान मुंबई कष्टकरी हात येथे हाताचे त्राण मुंबई जीवनातले अनुभव येथे अनुभवाचे दान मुंबई मराठीचे अस्तित्व येथे
काव्यरस

चंद्रावरती बांधलाय बंगला ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 26/01/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रावर मी बांधलाय एक बंगला फार जुनी झालीय हकीगत जाहिरात आली होती [आठवतंय का ..?] चंद्रावर जमीन मिळतेय तेव्हाच घेऊन ठेवलीय दहा रुपये एकरने चक्क वीस एकर घेऊन ठेवलीय माझ्याकडे कागद पत्र आहे कालच चंद्राचा सेल आला बंगला बांधून तयार आहे कधी येताय राहायला ..? हुरळून गेलो कसा असेल बंगला चंद्राने "ई"मेल केलाय . मस्त बंगला..!
काव्यरस

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुचलेली एक कविता.....

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 15/01/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली आली.... मकरसंक्रांत आली!... भोगीच्या दुसर्‍या दिवशी, किंक्रान्तीच्या आदल्या दिवशी... संक्रान्त आली! संक्रान्तीला फुलतो काटेरी हलवा! आसपासच्या बायकांना हळदीकुन्कवाला बोलवा.... हळदीकुंकू म्हटलं, की आठवते- काळ्यांची आशा आणि कुबलांची अलका... स्त्री-मुक्तीची चळवळ पूर्वी त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही का? :-? पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल! उतरत्या वयातही नवर्‍याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल" रेड वरून आठवलं "कलमाडी हाऊस" आणि झालं कॉमनवेल्थ बदनाम! "जितम्"जितम्" केलं दादांनी, कधी नव्हे तो कपाळावरच्या आठीला पडला आराम!

मी पण एक कविता करणार आहे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 13/01/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा मित्रानो ..!! थोडेसे क्षणभर थांबा दम घेउद्या मला सूर जराशे लावूद्या अन बघा मी काय करतोय ते मित्रानो..!
काव्यरस

मन!

लेखक राघव यांनी बुधवार, 12/01/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं! जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास! जशी कोकीळाची साद अन्‌ नुसताच त्रास!! मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप.. जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप! मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार.. जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर! मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड! जशी पावसाची सर..अलगद..अलवार.. मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात.. जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!! राघव
काव्यरस

शब्दांचे भरघोस पिक ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 12/01/2011 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांचे भरघोस पिक येऊ लागले आहे कोठेही पेरा मनात ते मस्त तरारून येतात शब्द पेरा नि वाहSवा चे नुसते खत घाला प्रचंड फुलून येतात मनाची नि नेटची जमीन अंतहीन आहे कितीही पेरा भरपूर जागा शिल्लक आहे शब्दाचे बियाणे कोठेपण पेरा वाळवंटात पेरा पाण्यात उधळा त्याला पटकन कोंब फुटून कशे तारार्रून येतात बघत रहा शब्द कसे का असेना अक्षर कसेका असेना यडे...! गबाळे ...!! कुरूप....!!
काव्यरस