Skip to main content

अद्भुतरस

नाचरी गाय - (आधारित)

लेखक चित्रा यांनी बुधवार, 31/03/2010 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववरच्या लोकांसाठी याआधीही मी कवितेसारखे काही तरी लिहीणे नवीन नाही! त्यातलाच हा एक प्रकार आहे तो समजून घ्यावा. ही कविता (किंवा जे काही आहे ते) लिहीण्यामागे माझी जरा मजबुरी आहे. दातात पेरूची बी अडकल्याप्रमाणे झाले आहे, त्यामुळे ती काढल्याशिवाय पुढे जाता येत नाही!
काव्यरस

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 20/03/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

फर्निचर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 17/01/2010 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
ईंटरनेटच्या जाळ्यात मुली शोधीत असता चॅटींगच्या सेशनात एकमेका अजमावता कुणी एक घराविषयी विचारत होती सगळे म्हणाली जुने फ़र्निचर आहे तुम्ही ठेवले? म्हटले अग सारे नवीनच घेतले लग्नाच्या तयारीनेच प्लॅन केले तशी म्हणाली ओ गॉश! विकत मिळणाऱ्या नव्हे आधीच्याच जुन्या फ़र्निचरचे विचारते मी आहे अग आमच्याकडे जुने सामान नाही जुने ठेवायला येवढी जागाही नाही तशी म्हणाली हे ऐकून बरे वाटले आपले मत ह्या बाबतीत बरोबर जुळले लग्नानंतर जागेची मला गरज भासणार सांग तू केव्हा आईबाबांना बाहेर पाठवणार? जुने फ़र्निचर!!!

क- कवितेचा

लेखक बाबुराव यांनी गुरुवार, 14/01/2010 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमी येतो मिसळपाववर आन, चाळा म्हणून क्लिक करतो, लेख,कविता, आन पाककृतीवर. आवडलेल्या वळींवर फिरत राहतो कितीतरी येळ, आलटून-पालटून शांतपणे. आन बांधाबांध करतो मनातल्या प्रतिसादाची. असह्य कोंडमारा होऊन टाकता आला नाय प्रतिसाद तर, लॉगऑफ करुन, पाहत बसतो मॉनिटर कितीतरीवेळ अस्वस्थपणे.

ती

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 05/01/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
ती समीप माझ्या येते, निसटुन जाते मी स्तब्ध, बावरी मलाच विसरुन जाते ती देउन जाते अर्थ नवे शब्दांना जोजवते हृदयी सृजनाच्या स्वप्नांना संध्यारंगांसह नभात मिसळुन जाते तळहाती रेखुन अलगद हलकी रेषा तनमनी जागवुन नवी अनामिक भाषा ती मोहरलेल्या क्षणांत हरवुन जाते मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही ते मनासारखे कधीच उमटत नाही ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी, ती कविता, आराधना, साधना माझी निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते
काव्यरस

गीत रामायण- बाबुजी आणि गदिमांचे

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 27/12/2009 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यश्लोकी जे मुनी वाल्मीकी गदिमा होऊन आले लोकी लाख मनांना वेड लाविती बाबुजी रामायण गाती नित्य उपासक ते प्रतिभेचे भाविक पूजक स्वर-शब्दांचे चरित सांगती जगतपित्यचे तारे हे सूर्या ओवाळिती बाबुजी रामायण गाती हे भक्तीचे कोरीव लेणे कोजागिरीचे धवल चांदणे ह्रद्यकुपीतून आले गाणे संगती लाखो जन रंगती बाबुजी रामायण गाती फुलापरि ते शब्द उमलती सुगंध पसरे विश्वाभोवती इतुके याचे वेड लाविती नास्तिका भक्ती रस पाजती बाबुजी रामायण गाती पूर्णपणाची कृतार्थ चौकट कसे जगावे पुरुषोत्तमपट विस्मयकारक अतिव उत्कट ऐकुनी श्रोतुजन नादती बाबुजी रामायण गाती मुग्ध जाहले लाखो जनमन तृप्त म
काव्यरस

नव्या दशकाचे बडबडगीत.

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 22/12/2009 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
कडाडणार्‍या कडकलक्ष्मीची खमाजातली ख्यालीखुशाली ... गाता गळा गजरी गातो गरीब गावाच्या गजाली घर घर घोरे घाट घन घामेजलेली चकचकीत चमके समचा चांदीचा छननन छमके छंद छुपा छत्रीचा जपतच जातो जीव जुन्या जरीचा झुणझुण झांझर झपताल झंकारी तकक्डान्धा..तत्कारे तबला तिहाई थुई थुई थंडीत थोडासा थरार... दर्या दुंदुभी ...दीनवाणा दमलेला दुकानदार.... धगधगीत धवल धरेला धीर ना धरवला नाकारीत नन्नाचा नखरा.... टकमक टवळी ....टपोरी टोपली..... ठायी ठेगणी ठुशी ठेवली... डमडम डमरु डोकी डावी... ढसा ढसा ढोसूनी....
काव्यरस

बुधवारची कविता: (टारोबा तुज शहीद केले)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 02/12/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कवितेची प्रेरणा मिसळपावावरच्या तर्रीत तिखट कांदा खाडकन उडवतो रेवडी करतो वांदा त्या झालेल्या वांद्याची चुगली झाली न् टारोबा , तुज शहिद केले हलक्या हलक्याश्या खसखशी पिकवणारे, सहीतच हाणोनी विडंबन करणारे ते प्रतिसाद लोपूनी दुर्मिळ झाले टारोबा , तुज शहिद केले बाईवत वरवर भासवणारी आयडी, गजबजलेल्या खवत खरड पाडी, तू हिणकसलेल्या संतापाने त्यांस ठोकले टारोबा , तुज शहिद केले तू हवाहवासा, शान टार्‍यासमर्थकांची तू नडशी के व ळ मस्त कॅलेंडर्वडीशी तुजला जे नडले सगळे चुलीत गेले टारोबा , तुज शहिद केले तू एक दिनी आलास टेंपरवारी तू पुरावेच ठेवलेस माल
काव्यरस

(वार्धक्य)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 26/11/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गिरीश भाउंचं वार्धक्य पाहुन मिपावर काहिजणांना अचानक आलेल्या वार्धक्याबद्दल वाईट वाटलं तरी ते लवक परत तरुण व्हावेत ही संत तात्याबा चरणी प्रार्थना ;) असो.. ************************ ************************ नडलो तुला पिळुन, राजरोस मनुष्या हे तुला विडंबन, आता सोस मनुष्या बुधवारचा अन् शनिवारचा उतारा झाला टंकलेस शब्द किती भरघोस मनुष्या वाचक टवाळ 'बनले', झिंगुन नाचले घातला प्रतिसादांचा ऐसा हैदोस मनुष्या टेकले सगळ्यांनी हात, अन निर्ढावलेही सह्या विडंबयचास, आता नुसतेच +१ मनुष्या आता कुजकेच उरले, मालक ओळखुन आहे सह्यांचे झमेले, झाले रे, ओस मनुष्